trump -putin meet :अलस्का मध्ये ट्रम्प आणि पुतीन यांची झाली भेट, भेटीत काय घडले
trump -putin meet :अलस्का मध्ये ट्रम्प आणि पुतीन यांची झाली भेट, भेटीत काय घडले
trump -putin meet राष्ट्रपती पुतीन आणि अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची अलस्का मध्ये भेट झाली.ही भेट तीन घंटे होती, पण या भेटीत युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध विराम विषयी कोणतीही सहमती झाली नाही.
trump -putin meet
पुतीन यांनी संघर्ष संपवण्याची बोलणी केली पण महत्वाचे कारण दूर ठेवण्यात आले आणि पुढची भेट मास्को मध्ये असेल असे सांगितले.
या भेटीदरम्यान पत्रकारांचे प्रश्न घेतले नाही.
terrorist asif munir :असिफ मुनीर वर्दी मधला आतंकवादी
सुरवातीला रुसी राष्ट्रपती पुतीन आणि अमेरिकी राष्ट्रपती ट्रम्प यांच्यात बातचीत होणार होती पण त्या नंतर शेवटच्या क्षणी बदलावं झाला आणि थ्री ऑन थ्री मुलकात झाली, म्हणजे दोन्ही राष्ट्रपती सोबत दोन दोन सलाहकार होते.
अमेरिकेकडून अमेरिकेचे विदेश मंत्री ‘मार्को रुबीओ ‘आणि स्टिव्ह विटकोफ हे होते.तसेच रुस कडून विदेश मंत्री ‘सर्गेई’ आणि विदेश नीती सलहकार’ युरी ‘हे होते.
या सर्व चर्चे मध्ये एक महत्वाची बाब ही होती कि या मध्ये युक्रेन चे ‘राष्ट्रपती जेलन्सकी’ किंवा युक्रेन देशाचा एखादा प्रतिनिधी असे कोणीही न्हवते.
युक्रेन चे राष्ट्रपती जेल्सकी यांनी या भेटी पूर्वी सांगितले होते या भेटी मध्ये ‘युद्ध विरामचा’ कोणताही संकेत दिसत नाही.
मूळ कारण समाप्त करा युद्ध संपेल -पुतीन
अलस्का मध्ये तीन घंटे मिटिंग चालू होते या मध्ये रशियन राष्ट्रपती पुतीन यांनी सांगितले, युक्रेन मध्ये जो ‘संघर्ष ‘चालू आहे तो जर संपला तर रुस सुद्धा संघर्ष संपवेल आणि ‘रुस च्या इमानदारी ‘वरती कोणीही शंका घेऊ शकत नाही.
trump -putin meet
राष्ट्रपती पुतीन यांनी सांगितले युद्ध एक त्रासदी आहे पण या युद्धात जे मूळ कारण आहे ते जर संपले तर युद्ध सुद्धा नक्कीच संपेल.

राष्ट्रपती पुतीन यांनी सांगितले कि या मिटिंग मध्ये जर युक्रेन किंवा युरोप ने काही बाधा आणू नये कारण हा एक शांती समझोता आहे.आणि त्यांनी हे सुद्धा सांगितले ही मिटिंग म्हणजे युद्ध समाधानासाठी एक ‘स्टार्टींग पॉईंट ‘आहे.
पुतीन यांनी ट्रम्प सोबतचे आपलें संबंध हे वेवसायिक असल्याचे सांगितले.आणि त्यांनी हे सुद्धा सांगितले जर 2020च्या निवडणुकीत ट्रम्प हे विजयी झाले असते तर नक्कीच हे युद्ध सुरु झाले नसते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले दोघां मध्ये भरपूर मुद्द्यावरती सहमती झाली पण काही मुद्दे असे आहेत जे आणखीन सुद्धा बाकी आहेत.
त्यांनी हे सुद्धा म्हटले जो पर्यंत एखादा समझोता होत नाही तो पर्यंत कोणताही समझोता होत नाही.
अमेरिकी राष्ट्रपती च्या म्हनन्या नुसार या मिटिंग मध्ये प्रगती झाली आहे. पण संघर्ष विराम पर्यंत आम्ही आतापर्यंत पोहचलो नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले ते नाटो आणि जेलन्सकी यांच्या सोबत बातचीत करणार आहेत.त्यांनी सांगितले या संघर्ष्याचा शेवटचा फैसला त्यांच्यात हातात आहे.
ट्रम्प यांनी या सर्व मिटिंग चा शेवट पुतीन यांना धन्यवाद देऊन केला आणि रुसी राष्ट्रपती पुतीन यांना, व्लादमीर म्हटले. त्यांनी सांगितले आम्ही पुन्हा एकदा नक्कीच भेटू आणि लवकर पुन्हा एकदा मिटिंग करू.त्यानंतर पुतीन यांनी इंग्लिश मध्ये सांगितले या नंतर आपण मास्को मध्ये भेटू.
त्या नंतर दोन्ही नेते पत्रकारां समोर आले आणि त्यांनी काही फोटो दिले त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एक दुसऱ्याला हात मिळवले, काही पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही नेत्यांनी पत्रकारांना नजर अंदाज केले आणि मंच्याकापासून दूर गेले.
