After bin Laden was killed, did local people occupy the Pakistan Presidential Palace?लादेन चा खात्मा झाल्या नंतर, स्थानिक लोकांनी पाकिस्तान राष्ट्रपती भवन वरती केला होता कब्जा?
तारीख होती 2 मे 2011 जेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष news चॅनेल वरती होते, कारण या दिवशी ओसामा बिन लादेन नावाचा आतंकी मारला गेला होता आणि अमेरिकेचे राष्ट्रपती यांनी ही news दिली होती.
ओसामा बिन लादेन चा खात्मा कसा झाला यावर भरपूर पुस्तके आणि tv डिबेट झाली होती. चित्रपटातुन सुद्धा या वरती दाखवले गेले होते.पण ही घटना घडल्या नंतर पाकिस्तान मध्ये जी राजकीय अशांतता घडली होती त्यावर कदाचित कोणीही चर्चा केलेली नाहीये.
काही दिवसा पूर्वी पाकिस्तान मध्ये एक पुस्तकं प्रकाशित झाले त्या पुस्तका मध्ये यावर चर्चा करण्यात आली आहे.
2मे 2011 या दिवशी सकाळी साडे सहा वाजता पाकिस्तान चे राष्ट्रपती जरदारी चे एडीसी ने फरह तुल्ला बाबर याला फोन करून सांगितले कि एका बैठकी साठी राष्ट्रपती भवन मध्ये त्याने यावे.
या पुस्तकात लिहिले कि पाकिस्तानी राष्ट्रपती हे राष्ट्रपती भवनात दुपारी अकरा वाजता येत असतात.आणि इतक्या सकाळी म्हणजे सकाळी सहा साडे सहा ला बाबर याला बोलावले म्हणजे काही तरी भयंकर घटना घडली असणार असे लेखक बाबर यांना वाटले.
लेखक बाबर हे सांगतात कि इतक्या सकाळी मला बोलावले म्हणजे काही तरी मोठी घटना घडली आहे, हे मला माहित होते पण नेमकी कोणती घटना घडली असेल हे मला माहित न्हवते.
बाबर याने विदेश मंत्री हिन्ना रब्बानी यांच्याशी संपर्क साधला पण बाबर यांना कोणत्याही प्रकारे अंदाज आला नाही कि पाकिस्तान मध्ये कोणती मोठी घटना घाडली.
त्यानंतर बाबर याच्या मोबाईल वरती एक फोन आला होता. तो फोन होता कराची मधील एका पत्रकाराचा त्या पत्रकारचे नाव होते मजहर अब्बास.
पत्रकार मजहर अब्बास याने बाबर ला सांगितले, कि अमेरिका सरकार ला समजले होते कि ओसामा बिन लादेन हा आबाटाबाद मध्ये होता.त्या नंतर बाबर याने अंदाज लावायला सुरवात केली कि इतक्या सकाळी त्याला राष्ट्रपती भावनात का बोलावले.
सर्वात पहिले कोणाला माहिती मळाली
Nepal Gen Z protest :नेपाळ मधील आंदोलनाची संपूर्ण कहाणी
त्यानंतर फराहतुल्ला बाबर ला समजले कि राष्ट्रपती चे एडीसी चे लीडर जलाल राष्ट्रपती भवन मधून आल्या नंतर सुद्धा जागीच होते.कारण त्यांना माहित झाले होते कि रात्री अडीच वाजता एबाटाबाद मध्ये एक हेलिकॉपटर क्रॅश झाले होते.पाकिस्तान चे ते वायू सेनेचे पायलट असल्या मुळे त्यांना प्रश्न पडला कि एबाटाबाद च्या एवढ्या पहाडी जागेत हेलिकॉप्टर का उडत असेल?आणि पाकिस्तान मधील pपायलट ला रात्री हेलिकॉप्टर उडवण्याची बंदी होती.
त्याने विचार केला कि हे जर पाकिस्तानी हेलिकॉप्टर नाही तर मग हे हेलिकॉप्टर कोणाचे आहेत?याच विचाराने ते पुन्हा एकदा आपल्या ऑफिस मध्ये गेले.त्या वेळेला सकाळ चे तीन वाजले होते.त्यानंतर त्यांनी पाकिस्तान च्या वायू सेनेमधील काही अधिकाऱ्यांना फोन केला.
osama bin laden
राष्ट्रपती भावनातील जलाल हे पहिले वेक्ती होते ज्यांना या ऑपेरेशन बद्दल सर्व
कयानी च्या पायाखालची जमीन सरकली

जलाल याने ही बातमी कायानी याला सांगितली कारण जलाल याला माहित होते थोड्या वेळात राष्ट्रपती भवन मधली हॉटलाईन घंटी वाजणार आहे.
त्याने सूचना दिली कि सेनाअध्यक्ष कायानी हे राष्ट्रपती भवना कडे रवाना झाला आहे.आणि तत्या नंतर लेखकांने असे सांगितले कि अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा हे पाकिस्तानी राष्ट्रपती सोबत फोन वरती बोलले होते.
ओबामा चा झरदारी ला फोन

Operation Neptune Spear)
ओबामा ने आपल्या पुस्तकात लिहिले कि पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारी ला फोन करून सांगणे ही खूप कठीण गोष्ट वाटत होती.
ओबामा यांनी लिहिले त्यांना वाटतं होते पाकिस्तानी राष्ट्रपती हे त्यांना पाकिस्तानी वायू सीमा उ्लंघन केले म्हणून काही बोलतील, पण असे न म्हणता त्यांनी पाकिस्तान सरकार हे अमेरिके सोबत आहे, आणि या ऑपरेशन ला पाकिस्तान सरकार सपोर्ट करते असे त्याने सांगितले.
आणि त्याने सांगितले त्याची पत्नी बेनझीर भुटो ला त्याच लोकांनी मारले ज्यांचा अल कायदा सोबत संबंध होता.
ऍडमिरल मलेन यांनी कायानी सोबत फोन वरती चर्चा केली
ओबामा यांनी पाकिस्तानी राष्ट्रपती यांना फोन लावायच्या पहिले. ऍडमिरल माईक मलेन यांनी कायानी सोबत फोन वरती बोलणे केले होते.ऍडमिरल मलेन यांनी कायानी याला सांगितले, अमेरिकेने ओसामा बिन लादेन याच्या राहत्या ठिकाणी हल्ला करून त्याला ठार केले आहे.
त्यानंतर लगेच आईएसआईएस च्या एका कर्नल ने आपल्या बॉस ला या ऑपरेशन बद्दल माहिती दिली.
cia चे प्रमुख लिओन पणेटा आपल्या पुस्तकात लिहितात. ही बातमी एकताच कायानी याचे पहिले वाक्य होते.चांगले झाले तुम्ही त्याला पकडले.त्यानंतर मलेन यांनी सांगितले लादेन ला पकडले नाही तर त्याला ठार केले, आणि लादेन हा मागील पाच वर्षा पासून एबटाबाद मध्ये राहत आहे. हे एकूण कायानी हा थोडा अचम्बीत झाला.
CIA आणि ISI मध्ये बातचीत
मलेन यांच्या फोन नंतर राष्ट्रपती ओबामा यांनी पाकिस्तानी राष्ट्रपती आणि अफगाण राष्ट्रपती यांना फोन लावला. पनेटा यांनी सुद्धा isi च्या प्रमुखांला फोन लावला आणि या विषयी बातचीत केली.
त्यानंतर पनेटा यांनी isi च्या प्रमुखांला अहमद शुजा पाशा ला फोन लावला.आणि पनेटा यांनी अहमद शुजा याला सांगितले हे जे ऑपरेशन झाले आहे या ऑपरेशन पासून आम्ही तुम्हाला मुद्दाम हुन दूर ठेवले होते.
त्यानंतर अहमद शुजा म्हणाला कि लादेन मारला गेला हे खूप चांगले झाले, जेव्हा अहमद शुजा असे म्हणाला तेव्हा त्याच्या बोलण्या मध्ये थोडा राग होता, कारण लादेन ला पाकिस्तान चा पूर्णपणे सहयोग होता.
त्यानंतर साकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटाला ओबामा यांनी टेलिव्हिजन वरती येऊन सांगितले, अल कायदा विरोधात पाकिस्तान आम्हाला सहयोग करेल.अशी अपेक्षा अमेरिका करतो आहे.
