Russian Revolution and its consequences:रुस क्रांती आणि परिणाम
Russian Revolution and its consequences
1917रुस क्रांती ही 20व्या शतकातील सर्वात मोठी आणि विस्फोटक क्रांती होती.या हिंसक क्रांती ने ‘रोमानोव राजवंस’आणि सदी पासून रशिया मध्ये जे राजशाही शासन चालू होते त्याचा अंत झाला.
आर्थिक कठीनाई, अन्ना ची कमतरता आणि सरकारी भ्रष्टाचार ने झार निकोलस 2 ची सत्ता संपुष्टात आणली.Russian Revolutionरुसी क्रांती च्या वेळेस ‘वामपंथी ‘क्रांतिकारी व्लादमीर लेनिन यांच्या नेतृत्वात बोल्षेविकांनी सत्ते वरती कब्जा केला.आणि झारवादि सत्ता संपुष्टात आणली.बोल्शेविक नंतर सोवियत संघाची कम्युनिस्ट पार्टी बनले.
Russian Revolution and its consequences:
Operation Rising Lion: इसराईल चा इराण वर हल्ला, परमाणू आणि सैन्य ठिकाणावर हल्ले
रुसी क्रांती केव्हा झाली
1917 मध्ये दोन क्रांत्या झाल्या, ज्या मुळे सदी पासून चालत आलेली सम्राज्यवादी विचारधारा संपूस्टात आली, आणि रुस मध्ये राजनीतिक अथवा सामाजिक परिवर्तन सुरु झाले.आणि याच्या परिणामा मुळे सोवियत संघांचे गठन झाले.
या दोन्ही क्रांतिकारी घटना 1917मध्ये काही महिन्याच्या फरकाने झाल्या होत्या.पण रुस मधील सामाजिक अशांती मागील भरपूर वर्षा पासून दिसत होती.
1900च्या दशकात रुस हा यूरोप मधील सर्वात गरीब देश होता.आणि त्या वेळी रुस मध्ये सर्वात जास्त शेतकरी वर्ग होता.आणि त्याच वेळेला औद्योगिक क्रांती झाल्या मुळे श्रमिकांची संख्या वाढत होती.आणि हा श्रमिक वर्ग खूप गरीब होता. बाकी युरोप हा रुस ला अविकशीत आणि गरीब देश समजत होते.
रुसी सम्राज्यात 19व्या शतका पर्यंत ‘दास’ प्रथा प्रचलित होती.सामंतवादाचे एक रूप होते ते भूमिहीन लोकांना श्रीमंत वर्गाची सेवा करण्या साठीच असतात असे समजत होते.आणि यांची सेवा करण्यासाठी किंवा सर्व शेतीतील कामे करण्यासाठी या गरीब वर्गाला मजबूर केले जात होते.ही प्रथा केवळ रुस मध्ये न्हवती तर पश्चिम युरोप मध्ये सुद्धा होती पण कालांतराने पश्चिम युरोप मधील ही प्रथा संपुष्टात आली होती.
1861मध्ये रुस मधल्या सम्राज्याने ही प्रथा समाप्त केली, आणि ही दास प्रथा समाप्त झाल्या मुळे रुस मधील शेतकरी एकत्र आले. आणि त्यांना संघटित होण्यासाठी अधिक स्वातंत्र्य भेटले.
रुस मधील क्रांतीचे कारण काय होते?
रुस मधील औद्योगिक क्रांती ही पश्चिम युरोप आणि अमेरिकेच्या खूप नंतर आली होती.रुस मध्ये औद्योगिक क्रांती 20 व्या शतकाच्या शेवटी झाली होती.आणि ही औद्योगिक क्रांती जेव्हा रुस मध्ये आली तेव्हा या क्रांती ने आपल्या सोबत राजकीय आणि सामाजिक बदल आणले होते.
1890ते 1910च्या मध्ये सेंट पीटर्सबर्ग आणि मास्को सारख्या प्रमुख शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत होती, त्यामुळे या शहरात औद्योगिक श्रमिकांचा एक नवा वर्ग तयार झाला,पण या नवीन श्रमिक वर्गासाठी कोणतीही सुविधा न्हवती, कमी जागेत राहणे, गरिबी, बिमारी, या मुळे त्यांची अवस्था दयनीय झाली होती.
19व्या शतकाच्या शेवटी रुस मध्ये लोकसंख्या खूप वाढली होती. रुस च्या उत्तरेकडे जलवायू मुळे वातावरणात बदल,आणि ‘क्रिमिया’ युद्धामुळे सुरु झालेले खूप महाग युद्ध या मुळे विशालकाय असलेल्या रुस मध्ये खाद्यान्न ची कमी होत होती.
त्यावेतिरिक्त 1891आणि 1892 ला रुस मध्ये दुष्काळ पडला होता त्यामध्ये 400,000पेक्ष्या जास्त लोक दगावले होते.
1904-1905मध्ये रुस चे जपान सोबत युद्ध झाले होते त्या मध्ये रुस ची हार झाली होती, त्यामुळे रुस आणि शासक ‘झार निकोलस द्वितीय ‘ ची स्तिती खूप कमजोर झाली होती.
या युद्धामध्ये रुस चे खूप नुकसान झाले होते आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर रुस ची प्रतिष्ठा खूप कमी झाली होती.
रुस मध्ये खूप प्रमाणात गरिबी, लाचारी, आणि भ्रष्टाचार सुरु होता. त्या उलट पश्चिम यूरोप आणि अमेरिकेमध्ये सामाजिक प्रगती आणि वैज्ञानिक उन्नती होत होती.हे बघून रुस मधील काही शिक्षित लोक झार शाहीचा विरोध करत होते.कारण त्यांच्या लक्षात येत होते, झार आणि रुस मधील कुलीन वर्ग रुस मध्ये भ्रष्टाचार करून तेथील जनतेला भिकेला लावत आहे.
1905मधील रुसी क्रांती
Russian Revolution and its consequences
1905मध्ये राजशाही विरुद्ध प्रदर्शन होत होते, हे विरोध प्रदर्शन श्रमिकांनी सुरु केले होते.आणि हे प्रदर्शन एवढे त्रिव झाले होते कि झार च्या सैनिकांनी निहात्ते श्रमिकावर हल्ले करून त्यांना मारले, या मध्ये भरपूर श्रमिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि शेकडो प्रदर्शनकारी घायाळ झाले. या संपूर्ण घटनेला खुनी रविवार असे म्हटले जाते.
या खुनी रविवार ने 1905च्या क्रांतीला जन्म दिला, या मध्ये रागावलेला श्रमिकांनी संपूर्ण रुस मध्ये मोर्चे काढले.या आंदोलना मध्ये शेतकरी, कामगार वर्ग आणि सैनिक सुद्धा होते.ज्या मुळे या कामगाराच्या वर्चस्वासाठी एका परिषदेचे गठन झाले.आणि त्या परिषदेचे नाव होते ‘सोवियत परिषद ‘.
निकोलस द्वितीय आणि प्रथम विश्व युद्ध
वर्षे 1905हे वर्ष रुस मध्ये खूप उथल पुथलं घेऊन आले होते.त्या वर्षी रुस मध्ये रक्तपात झाला होता आणि त्यासोबतच जपान सोबत रुस ची झालेली अपमान जनक हार ह्या मुळे झार निकोलंस चे सिहासन डगमत होते.त्या मुळे निकोलस द्वितीय ने रुस मध्ये काही सुधारणा आणल्या होत्या.त्या मध्ये ‘अभिवेक्ती स्वतंत्र ‘आणि एक प्रतिनिधी सभा ‘ड्युमा ‘चे गठन होईल असे आस्वासन दिले होते.

ऑगस्ट 1914मध्ये रुस ने प्रथम विश्व् युद्धात भाग घेतला आणि फ्रान्स, ब्रिटिश, सर्बो या देशाला समर्थन दिले.या विश्व् युद्धात रुस साम्राज्य विनाशकारी मार्गाने जात होते.
या युद्धात जर्मनी ही रुस पेक्ष्या खूप ताकतवर होती, कारण जर्मनी मध्ये औद्योगिकरन आले होते त्या मुळे जर्मनी ही रुस ला वरचढ होत होती.या युद्धात रुस ची जी जीवित हानी झाली ती मागील सर्व युद्धापेक्षा जास्तच होती.
या युद्धामुळे रुस मध्ये इंधन आणि खाद्यान्न ची भरपूर कमी होत होती. रुस ची अर्थवेवस्था पहिलेच कमजोर होती आणि या युद्धामुळे रुस मध्ये जास्त बेकारी आणि महागाई वाढत होती.
झार निकोलस ने 1915मध्ये रुसी सैन्याचा मोर्चा सांभाळन्यासाठी रुसी राजधानी सेंट पिटर्सबर्ग सोडली होती.1914मध्ये रुस ने शाही शहराचे नाव बदलून पेट्रोग्राद ठेवले होते. कारण सेंट पिटर्सबर्ग हे नाव जर्मन वाटत होते.
रासपुतीन आणि जारीना
आपल्या पतीच्या अनुउपस्तितीत जर्मन मूळ ची असलेली एक महिला जी रुस मध्ये अलोकप्रिय होती, ‘जारीना एलेक्जेद्रा ‘ने निर्वाचित अधिकाऱ्यांना बरखास्त करायला सुरवात केली.त्याच वेळेला जारीना चे सलाहकार “ग्रीगोरी रासपुतीन ‘ने रुस वर आपला प्रभाव वाढवायला सुरवात केली.
रासपुतीन चा प्रभाव एवढा वाढला होता कि रासपुतीन कोणतेही निर्णय घेत होता आणि कोणाच्याही विरोधात जात होता,त्याच वेळेला रुस च्या काही श्रीमंत लोकांनी 30डिसेंबर 1916ला त्याची हत्या केली.तोपर्यंत रुस च्या जास्तीत जास्त लोकाचा झार शाही वरील विस्वास उडाला होता.
तोपर्यंत सरकारी भ्रष्टाचार खूप वाढला होता, रुसी अर्थव्यवस्था खूप कमजोर झाली होती.आणि त्यातच झार निकोलंस ‘ड्युमा ‘ला भंग करत होता.आणि 1905च्या क्रांती नंतर स्थापित केलेली संसद काहीच करत न्हवती.
त्यानंतर लवकरच रुस मधील जनता झार च्या विरोधात गेली, आणि झार शाहिला नष्ट करण्याची चर्चा करू लागली.
फेब्रुवारी क्रांती Russian Revolution and its consequences

8मार्च 1917 ला रुस मध्ये फेब्रुवारी क्रांती सुरु झाली (जुलीयस कॅलेंडर नुसार 23फेब्रुवारी ला सुरु झाली, )
भाकरीच्या मागणीसाठी प्रदर्शनकारी पेट्रोग्राद च्या रस्त्यावर उतरले.हे प्रदर्शन एवढे त्रिव होते कि प्रदर्शनकरी ज्या मध्ये औद्योगिक श्रमिक होते. त्यांची पोलिसांसोबत झडप झाली, तरी सुद्धा ते हटायला तयार न्हवते.
11मार्च पर्यंत प्रदर्शन खूप त्रिव झाल्यामुळे पेट्रोग्राद आर्मी ला बोलवण्यात आले, या मध्ये प्रदर्शनकारी आणि आर्मी मध्ये झडप झाली त्यानंतर आर्मी ने प्रदर्शनकारी लोकांवर गोळीबार केला या मध्ये काही प्रदर्शनकारी लोक मारल्या गेले. तरी सुद्धा ते रस्त्यावरून मागे सरकले नाहीत.
12मार्च ला ड्युमा ने एक अंतिम सरकार चे गठन केले, त्यानंतर काही दिवसांनी झार निकोलंस ने आपल्या सिहासनाचा त्याग केला.ज्यामुळे रुसी रोमानोव शासनाचा अंत झाला.
अलेक्जेडर करेन्सी
युवा रुसी वकील अलेक्जेडर करेन्सी सहित अंतिम सरकारच्या नेत्यांनी अभिवेक्ती स्वातंत्रता, कायदा, सक्षम समानता, संघटन आणि संप सारखे अधिकार देण्याचा निर्णय घेतला, त्यांनी हिंसक प्रदर्शन चा विरोध केला.
युद्ध मंत्री असल्याने अलेक्जेडर केरेन्सी यांनी रुस मध्ये युद्धभ्यास सुरु ठेवला. प्रथम विश्व् युद्धात रुस ची हानी झाल्या नंतर सुद्धा हा युद्धभ्यास चालू होता.त्यामुळे रुस ची आर्थिक परिस्तिथी आणखीन बिघडली होती.त्यानंतर पुन्हा रुस मध्ये दंगे सुरु झाले.
बालशेविक क्रांती
Russian Revolution and its consequences

6आणि 7आक्टोबर 1917 मध्ये (जुलीयस कॅलेंडर नुसार 24 आणि 25आक्टोबर )बालशेवीक नेता व्लादमीर लेनिन यांच्या नेतृत्वात वामपंथी क्रांतिकाऱ्यांनी ड्युमा च्या विरोधात रक्तहीन तक्तापलट केला.
रुस मधील पुंजीवादी नेत्यांच्या गटाने एक अंतिम सरकार चे गठन केले होते.पण लेनिन यांनी एक सोवियत सरकार स्थापन करण्याची मांग केली.ज्यामध्ये शेतकरी, श्रमिक आणि सैनिक यांच्या परिषद द्वारा शासित असेल.
Russian Revolution
Russian Revolution and its consequences
बाल्शेवीक आणि त्यांचे सहयोगी यांनी पेट्रोग्राद मध्ये सरकारी इमारती वरती कब्जा केला आणि लवकरच लेनिन यांच्या नेतृत्वात एक नवीन सरकार बनविले. लेनिन जगातील पहिले सम्यवादी नेता बनले ज्यांच्याकडे सरकार होते.
रुस गृह युद्ध
बाल्शेवीक क्रांती नंतर 1917च्या शेवटी रुस मध्ये गृह युद्ध चालू झाले. या युद्धात लाल आणि पांढरे सैनिक होते.
लाल सेना लेनिन साठी लढत होती,श्वेत सेना रुस मधील पुंजीवादी आणि लेनिन विरोधी कडून लढत होती.
16 जुलै 1918मध्ये बाल्शेवीकांनी ‘रोमानोव’ ला मारले,रुसी गृह युद्ध 1923 मध्ये समाप्त झाले, जेव्हा लाल सेना ने जिंकण्याचा दावा केला आणि सोवियत संघाची स्थापना केली.
रुस मध्ये भरपूर वर्षे हिंसा आणि राजकीय अशांती नंतर रुस मध्ये क्रांती झाली,आणि या क्रांती ने संपूर्ण जगात सम्यवादाचा मार्ग प्रश्यस्त केला.जाने रुस ला जागतिक स्तरावर एक ताकतवर देश बनवण्यासाठी तयार केले.
त्यानंतर रुस हा जागतिक स्तरावर अमेरिके सोबत भिडणार होता आणि दुसऱ्या म्हसयुद्धा नंतर शीत युद्ध (cold war )होणार होते. यात अमेरिका आणि रुस च्या संघर्षात संपूर्ण जग होरपळून निघणार होते.