Persian Gulf War:आखाती (खाडी )युद्ध ज्यामुळे अमेरिकेला मध्यपूर्वेत आपले पाय रोवता आले
आखाती युद्ध (खाडी युद्ध ) एक जागतिक संघर्ष होता. 1990 मध्ये सद्दाम हुसेन ने आपला शेजारी देश कुवेत वर आक्रमण केले होते. तेव्हा संयुक्त राष्ट्राने याचे खंडन केले होते. जेव्हा इराक ची सेना कुवेत मध्ये होती तेव्हा अमेरिका आणि 34 अन्य देशांची भागीदारी झाली होती.जागतिक युद्ध आणि शीत युद्धाच्या समाप्तीनंतर हे जगातील सर्वात मोठे सैन्य अभियान होते त्यामुळे विश्वयुद्धाची सुद्धा भीती होती.
काय होते आखाती युद्ध?
आखाती युद्धात इराक च्या विरुद्ध 35 राष्ट्रांनी अमेरिकेच्या नेतृत्वात सैन्य हमला केला होता. हा हमला म्हणजे कुवेत विरुद्ध जे इराक ने केले होते त्याचा बदला होता.
इराक इराण युद्धानंतर इराक हा कर्जात बुडाला होता आणि कुवेतचे इराक वरती 14 बिलियन डॉलर एवढे कर्ज होते. इराक हा कुवेतला इराक चा भाग समजत होता. पण यामध्ये एवढे तथ्य नव्हते. इराकी राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांनी कुवेतला आपले कर्ज माफ करा म्हणून सांगितले. सद्दाम हुसेन यांनी सांगितले होते इराण हा विस्तारवादी देश आहे आणि तो संपूर्ण अरब वरती आपला विस्तार करू पाहत होता. पण इराकने त्याला थांबवले. म्हणजे इराकने संपूर्ण अरब राष्ट्राचे रक्षण केले. त्यामुळे इराक वर जे कर्ज आहे ते माफ व्हावे.
पण सद्दाम हुसेन यांच्या बोलण्याकडे संपूर्ण खाडी देशानि दुर्लक्ष केले. म्हणजे अप्रत्यक्षरीत्या ते कोणत्याही प्रकारचे कर्ज माफ करणार नव्हते. पण सैन्यामध्ये कमजोर असलेला शेजारी देश कुवेतला सद्दाम हुसेन ने धमकी द्यायला सुरुवात केली. बारबाह आणि बुबियान द्विपावरती कबजा करण्याची आणि यासाठी युद्धाची सुद्धा धमकी दिली.
हे द्वीप इराक साठी खूप महत्त्वाचे होते कारण की खावर अब्दुल्लाह वरती स्थित त्याच्या बंदरगाला सुरक्षा मिळाली असती.
फारस खाडीपर्यंत जाणारा जलमार्ग जो इराक इरान युद्धात बंद होता आणि त्यांच्यासाठी हा एक मात्र जलमार्ग होता .इराक आणि कुवेत मध्ये जो संघर्ष होता. तो बुबियान आणि बारबाह द्विपा वरूनच होता.
1961 मध्ये जेव्हा युनायटेड किंगडम ने कुवेत वरून आपले संरक्षण समाप्त केले. तेव्हा इराकी पंतप्रधान जनरल ‘अब्द अल करीम ‘ नि एक दावा केला होता.
की कुवेत इराक चा अभिन्न भाग आहे. कारण ‘अल बसरा’ च्या पूर्वी तो ऑटोमन साम्राज्याचा भाग होता.
त्या वेळेला इराकने कुवेत वरती कब्जा करण्याची धमकी दिली होती. पण कुवेत मध्ये ब्रिटिश फौज असल्या कारणाने इराकला माघार घ्यावी लागली होती.
पण त्यानंतर इराकच्या सत्तेवर जे आले त्यांनी कुवेतला मान्यता दिली आणि ह्या संघर्षावर पूर्णविराम दिला.
पण नंतर इराक वर पाच पक्षाची सत्ता आली तेव्हा दोन्ही देशात सीमा विवाद पुन्हा नव्याने चालू झाला.
इराक इराण युद्ध झाले तेव्हा इराक वरती आर्थिक संकट कोसळले होते जुलै महिन्यात सद्दाम हुसेनने कुवेत आणि संयुक्त अरब अमिरात वर पेट्रोलियम निर्यातक उत्पादक (ऑपेक )कोटा तोडल्याचा आणि कच्च्या तेलाचा जास्त उत्पादन केल्याचा आरोप लावला.
आणि यामुळे तेलाच्या किमती कमी झाल्या त्यामुळे इराक वरती आर्थिक संकट आले. इराक ने कुवेत वरती आणखी एक आरोप लावला की कुवेत इराक सीमा भागा वरती लागून असलेल्या रुमालयातील क्षेत्रातून तेल चोरत आहे. आणि सद्दा हुसेन ने ही सुद्धा मागणी केली की कुवेत बुबियान आणि बारबाह द्विपाचे नियंत्रण इराकला द्याव.
इराक अमेरिका संघर्ष
त्याच वेळेला संयुक्त राज्य अमेरिका आणि इराक चे संबंध बिघडत चालले होते.
इराकने संयुक्त राज्य अमेरिका आणि इजराइल वरती आरोप लावले. कुवेतला तेलाची किंमत कमी करण्यासाठी या दोन्ही देशांनी प्रोत्साहित केले. कारण इराक यामुळे कमजोर होईल.
जेव्हा जुलै 1990 मध्ये इराकने कुवेतला धमकवायला सुरुवात केली. त्यामुळे अमेरिकेने आखातीमध्ये युद्ध अभ्यास सुरू केला. त्या त्या मागचा उद्देश होता की इराकने कुवेत आणि संयुक्त अमीरात वरती सैन्य हल्ला करू नये. अमेरिकी राष्ट्रपती जॉर्ज एच डब्ल्यू बुश ने इराक सोबत आर्थिक आणि राजनीतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.
12 एप्रिल 1990 ला सिनेटर ‘रॉबर्ट डोल’ च्या नेतृत्वात अमेरिकी सिनेटरचा एक प्रतिनिधी मंडळ हुसेनला भेटण्यासाठी पाठवले.
सिनेटर डोल व्हाईट हाऊस मधून एक संदेश घेऊन आले होते. त्यामध्ये होते अमेरिका इराक सोबत आपले संबंध चांगले करू इच्छितो आहे.
इराक कुवेत संघर्ष
IRAK WAR
2 ऑगस्ट 1990 मध्ये एक लाख सैन्य घेऊन इराकने कुवेत वरती हमला केला. आणि काही तासाच्या आत इराक ने कुवेत वर कब्जा केला.
कुवेत वर हमला केल्याच्या कारणाने इराक वर ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने’ प्रतिबंध लावले.
अमेरिका आणि गटबंधन देशांनी इराक वरती हमला केला हा हमला हवा आणि जमिनीवरून होता.
16 जानेवारी 1991 ला युद्धाची सुरुवात झाली आणि 28 फेब्रुवारी 1991 ला इराक हरला आणि कुवेत मधून सद्दाम हुसेन ला माघार घ्यावी लागली. या सोबतच इराक हे युद्ध हरला.
IRAK AMERIKA WAR
खरं तर अमेरिकेला इराक च्या धमकी विषयी माहिती होते. पण इराक सैन्य कारवाई करेल याची थोडीशी सुद्धा कल्पना नव्हती. इराक रिपब्लिकन गार्ड कुवेत शहराकडे गेली आणि इराकी विशेष बलांनी वारबा आणि बुबयान द्विपा वरती कब्जा केला. इराकि आक्रमन जेव्हा झाले तेव्हा कुवेत चा प्रतिरोध फक्त काही प्रमाणात होता. पण इराकी सैनिकांनी कुवेत वरती सहज कब्जा केला.
MIDDLE EAST WAR
Persian Gulf War:आखाती (खाडी )युद्ध ज्यामुळे अमेरिकेला मध्यपूर्वेत आपले पाय रोवता आले
इराकी आक्रमण झाल्यानंतर कुवैती शाही परिवार सौदी अरबाला पळून गेला. तिथून त्यांनी आंतरराष्ट्रीय समर्थनाची अपील केली. 28ऑगस्ट ला इराक ने घोषणा केली कि कु्वैत इराक चा 29 वा प्रांत आहे.
इराक ने कुवेत वरती आक्रमण केल्यानंतर सर्व देशांनी इराक ची निंदा केली होती. त्यानंतर काही दिवसांनी अमेरिकेने आंतरराष्ट्रीय गटबंधन करण्यासाठी नेतृत्व केले.
या गटबंधन ने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद च्या माध्यमातून इराकने लवकरात लवकर कोणतीही शर्त न लावता कुवेत मधून वापस जावे ही मागणी केली.
आणि हा प्रस्ताव 660 मध्ये पारित झाला. प्रस्ताव 661 मध्ये इराक वरती आर्थिक प्रतिबंध लावले. आणि प्रस्ताव 663 मधून कुवेत चे इराक मध्ये केलेले विलय अमान्य करण्यात आले.
अमेरिका आणि सौदी अरब यांनी प्रायद्विपच्या रक्षणाकरिता अमेरिकी सैन्य सौदी अरब मध्ये तैनात करण्यात आले.
त्यासोबत अमेरिका आणि गटबंधन ने इराक वरती दबाव टाकला की कुवेत मधून इराकने बाहेर पडावे.
पण इराक मे याकडे दुर्लक्ष केले. आणि संपूर्ण कुवेत मध्ये लूटपाट करायला सुरुवात केली.
30 ऑक्टोबर पर्यंत बूश सरकारने हा निर्णय घेतला होता. इराक जर कुवेत मधून बाहेर निघत नसेल तर अमेरिका सैन्य शक्तीचा उपयोग करून इराक ला कुवेत मधून हाकलून देईल.
अमेरिकेने सैन्यशक्ती वाढवली आणि इराक वरती हल्ला करण्यासाठी सज्ज झाले.
इराकला कुवेत मधून वापस जाण्यासाठी 45 दिवसाचा अवधी दिला होता. पण या वेळेत सुद्धा इराक कुवेत मधून बाहेर पडला नाही.
त्यामुळे अमेरिकेने इराक वरती हवाई हमले करायला सुरुवात केली होती.
24 तासात अमेरिका आणि गटबंधन सैनिकांनी इराक च्या हवाई क्षेत्रात ताबा मिळवला आणि इराक च्या प्रत्येक महत्त्वाच्या जागी हवाई हामले करून उध्वस्त केले.
Persian Gulf War
याला उत्तर म्हणून सद्दाम हुसेन ने इजराइल विरोधात आणि सौदी अरब मधील जे गटबंधन सैनिक होते त्यांच्या वरती मिसाईल हमले केले.
पण इजराइल ने या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. 34 देशाच्या गटबंधन सैनिकांनी मिळून कुवेत देशाला इराक पासून स्वातंत्र्य केले . इथून पुढे इराकी सैन्य वापस जायला लागले.
दोन मार्चला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद प्रस्ताव 686 पारित केला. यामध्ये युद्धविरांमासाठी काही शर्ते लागू केले आणि इराकला मान्य करण्यासाठी बाद्य करण्यात आले. ज्यामध्ये इराक ने प्रतिबंध आणि युद्धातील खर्च देण्यात यावा हे होते.
संयुक्त राज्य अमेरिका ने संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून इराक वरती दबाव टाकायला सुरुवात केली.
यामध्ये सुरक्षा परिषदेच्या प्रस्ताव 687 ला पारित केले. ज्यामध्ये इराक ची रासायनिक आणि जैविक हथियार क्षमतांची निरीक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र विशेष आयोग (युएनएससीओएम ) ची स्थापना करण्यात आली.
युद्धानंतर दक्षिण इराक मध्ये शिया विद्रोह आणि कुर्द विद्रोह होत होते. पण नंतर ते विद्रोह दाबण्यात आले.