Pahalgam Attack 2025:पाकिस्तानी संघटन TRF ला अमेरिकेने आतंकवादी संघटन घोषित केले,पहलगाम मध्ये 26 नागरिकांची केली होती हत्त्या.
पाकिस्तान समर्थीत आतंकवादी संघटन लस्कर -ए -तैयबा सोबत असलेले आतंकवादी संघटन द रेजीस्टेन्स फ्रंट (TRF)ला अमेरिकेने आतंकवादी संघटन म्हणून घोषित केले आहे.
अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबीयो ने सांगितले ‘हे पाऊल म्हणजे पहलगाम मध्ये 26निर्दोष नागरिक मारले त्याचा न्याय आहे, आणि भारता सोबत सहयोग सुद्धा आहे.
विस्तारणे
अमेरिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे, पाकिस्तान मधील आतंकवादी संघटन लस्कर -ए -तैयबा सोबत असलेले आतंकवादी संघटन द रेजीस्टेन्स फ्रंट (TRF)ला अमेरिकेने विदेशी आतंकवादी संघटन म्हणून घोषित केले आहे.अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबीयो ने गुरुवारी ही माहिती दिली.
मार्को रुबीयो ने सांगितले ही कारवाई राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प कडून पहलगाम अंतकी हमल्याचा न्याय आहे असे सांगितले.
TRF हे आतंकवादी संघटन आहे जाने 22एप्रिल ला जम्मू काश्मीर मधील पहलगाम Pahalgam Attack 2025 मध्ये झालेल्या आतंकी हमल्याची जिम्मेदारी घेतली होती. या हल्ल्यात 26 नागरिक मारल्या गेले होते.
रुबीयो ने सांगितले हे भारता सोबतचे सहयोगाचे प्रमाण आहे.

अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबीयो ने सांगितले 2008 च्या मुंबई हमल्या नंतर, पहलगाम हा सर्वात मोठा भारतीय नागरिकांवर आतंकी हल्ला होता.
त्यांनी हे सुद्धा सांगितले ही लढाई अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा, आतंकवादी विरुद्ध लढाई, आणि भारता सोबत सहयोगाचे प्रमाण सुद्धा आहे.
या सोबत अमेरिकचे विदेश मंत्री मार्को रुबीयो यांनी हे सुद्धा सांगितले या आतंकवादी संघटनेला विशेष चिन्हित वैश्विक आतंकवादी संघटन म्हणून घोषित केले आहे.
TRF आणि त्यासोबत असलेले नाव LET च्या आतंकवादी सूची मध्ये टाकले गेले आहे.ते म्हणाले LET लस्कर ए तैयबा ला आतंकवादी संघटन म्हणून कायम ठेवले आहे.
Israel v Syria इस्राईल ने सिरियाई सेना मुख्यालय वरती हल्ला केला,पुन्हा एकदा युद्ध भडकणार?
TRF चा प्रमुख शेख सज्जाद गुल ला भारताची एजेंसी NIA ने पहलगाम हमल्याचा मास्टर माईंड सांगितले होते.
TRF ने भारतात भरपूर आतंकवादी हमले केले आहेत.ज्यामध्ये 2024ला सुरक्षा बलावर सुद्धा आतंकवादी हल्ला केला होता.
ऑपेरेशन सिंदूर

Pahalgam Attack 2025
जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये TRF च्या आतंकवादीसंघटनेने निहात्ते पर्यटकावर हल्ला केला होता.22एप्रिल ला झालेल्या या कायराना आतंकवादी हल्ल्यात 26 नागरिकांचे प्राण गेले होते.
त्यानंतर भारतीय सेने ने या हल्ल्याचे प्रतिउत्तर देण्यासाठी ऑपेरेशन सिंदूर सुरु केले.सहा आणि सात मे ला पाकिस्तान मधील नऊ आतंवादि ठिकाणावर हल्ले केले.
पहलगाम हल्ला झाल्या नंतर भारताने प्रतिउत्तर दिले आणि या सेने च्या कारवाई ला आतंकी घटनाचे उत्तर मानल्या गेले.
भारतीय सेना च्या कारवाई वेतिरिक्त भारताचे सात सर्वदलीय प्रतिमंडळ 33देश्याच्या दौऱ्यावर गेले होते, आणि पाकिस्तान ची सर्व पोल खोल केली.आणि संपूर्ण जगाला सांगितले पाकिस्तान हा आतंकवादी देश आहे.
पाकिस्तान मधील शहाबाज शरीफ सरकार कशी नाकाम आहे, हे संपूर्ण जगाला सांगितले.