त्या नंतर एका दुसऱ्या ऑपेरेशन विषयी चर्चा झाली. त्या ऑपेरेशन चे नाव होते ऑपेरेशन थंडरबोल्ट आणि सर्वच्या सहमतीने हे ऑपरेशन सुरु झाले.
इस्राईली सुरक्षाबल बंधकांना सोडवण्यासाठी काही मार्गांचा शोध घेत होती पण त्यांना कोणत्याही प्रकारे मार्ग सापडत न्हवता.
मोसाद ला एका नकाशा विषयी माहिती मिळाली तो नकाशा होता. त्याच बिल्डिंग चा ज्या मध्ये आतंकवाद्यांनी बंधकांना ठेवले होते.
त्यानंतर मोसाद ने रेस्क्यू ऑपरेशन ची योजना बनवली.
मोसाद ने त्या लोकांसोबत चर्चा केली जे आतंकवाद्यानी सोडून दिले होते. त्यानंतर मोसाद ला समजले कि आतंकवादी किती आहेत आणि त्यांच्याकडे कोण कोणती शस्त्रे आहेत.
ही सर्व माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ठरवले कि एक सैन्य तुकडी जाईल आणि रेस्क्यू ऑपेरेशन करून वापस येईल.
या कामासाठी इसराईल सेने ची सर्वात महत्वाची कामंडो युनिट ‘सेयेरेट मटकल’ ही जाईल.या युनिट ला लीड करत होते ‘योनातन नेत्यांनाहू’

इस्राईल चे पंतप्रधान :बेलज्यामिन नेत्यांनाहू ‘हे योनातन नेत्यांनाहू चे लहान भाऊ आहेत.
इकडे आतंकवाद्यांनी धमकी दिली होती कि त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर 1जुलै पासून बंधकांना मारायला सुरवात करतील.
इसराईल सरकार 30जून ला आतंकवाद्या सोबत बोलणी करण्यासाठी तयार झाले. आणि या मुळे इस्राईल सैनिकांना आणखी तीन दिवसाचा वेळ मिळाला.
त्यानंतर वेळ होती ऑपेरेशन ची पण सर्वात मोठा अडथळा होता युगंडा आणि इसराईल मध्ये साढे चार हजार किमी चे अंतर होते. विमानाला जाऊन वापस येणे हे शक्यच न्हव्हते.
इस्राईल कडे हवे मध्ये रिफ्युलिंग करण्याची क्षमता न्हवती त्यासाठी कोण्यातरी देशाची मदत घेणे आवश्यक होते. त्या देश्यामध्ये जाऊन रिफ्युलिंग करता आले असते.आणि या साठी केनिया देश तयार झाला.
त्यानंतर केनिया मधून एक विमान पाठवून एतांबे विमानतळाचे काही फोटो घेतले त्यामुळे इसराईल कमांडोना अंदाज आला कि विमानतळ कसे आहे आणि युगांडा सैनिकांनी पोजिशन काय आहे.
त्यानंतर इसराईल कमांडो साठी एक चांगली घटना घडली. राष्ट्रपती इदी अमीन हा 3 जुलै ला देशाबाहेर गेला होता.
दुपारी 1वाजून 20 मिनिटे झाली होती. दोन लॉकहिड C-130 हरक्युलीज विमान युगांडा देश्याच्या दिशेने निघाले होते.
या मध्ये 200कमांडो एक ‘काळी मर्सडीज ‘आणि दोन लँड रोवर गाड्या होत्या. एक तिसरे विमान सुद्धा होते ते बांधकासाठी होते. त्यांच्या मागून दोन ‘बोईंग 707’ होते जे फक्त 40फूट उंचावून उडत होते.
प्रत्येक विमानाचे एक काम होते. बोईंग 707 केनिया मध्ये उतरले होते. त्या मध्ये डॉक्टर होते. दुसरे बोईंग हे’ कमांड पोस्ट ‘साठी होते.
मोसाद ला मिळालेल्या माहिती नुसार इदी अमीन हा एक ‘काळी मर्सडीज ‘वापरत होता. आणि त्याच्या गार्ड साठी लँड रोवर होत्या.
त्यांची योजना अश्या प्रकारे होती कि कमांडोचा एक ग्रुप मर्सडीज मध्ये बसून टर्मिनल कडे जाईल म्हणजे विमान तळावर जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना असे वाटेल कि इदी अमीन आला आहे. आणि अश्या प्रकारे कामंडो तिथे पोहचणार होते जिथे बंधक आहेत.
‘एतांबे विमानतळावर ’11 वाजता पहिले ‘हरक्युलीज विमान ‘ उतरले आणि त्याचे दरवाजे पहिलंच उघडलेले होते. कारण कमांडो आणि आतमधील मर्सडीज आणि लँड रोवर गाड्या लवकर बाहेर याव्यात.
काळ्या मर्सडीज मध्ये बसून युनिट जुन्या टर्मिनल कडे रवाना झाली. एक युनिट रणवे वरती होती आणि तिसरी युनिट खाली विमानाच्या सुरक्षेसाठी होती.ज्या मध्ये बंधकांना घ्यायचे होते.
चौथी युनिट होती एतांबे विमानतळावर. जेवढे युगंडाचे विमान होते त्यांना नष्ट करायचे काम या चौथ्या युनिट कडे होते. या मिशन साठी केवळ एका तासाचा वेळ दिला होता त्यामुळे एकाच तसाच मिशन पूर्ण करायचे होते.
ऑपेरेशन थंडरबोल्ट
योनातन नेत्यांनाहू यांची युनिट मर्सडीज आणि लँड रोवर मध्ये निघाली. पण सुरवातीलाच त्यांना एक मोठा अर्थळा निर्माण झाला. त्यांना असे वाटले कि विमान तळावरील गार्ड असे समजतील कि हा राष्ट्रपती इदी अमीन चा काफीला आहे. पण युगांडा सुरक्षा राक्षकांनी त्यांना थांबिवले.
मोसाद कडून एक चूक झाली होती त्यांना माहित न्हवते कि इदी अमीन ने काही दिवसापूर्वी आपली गाडी बदलली आणि आता काळी गाडी नसून पांढरी गाडी आहे.

नेत्यांनाहू यांच्याकडे वेळ खूप कमी होता त्या मुळे त्यांनी त्या गार्ड वरती गोळीबारी करण्याचा आदेश दिला. गोळीबारीच्या आवाजाने विमानतळावरील गार्ड सतर्क झाले. त्यामुळे इसरायली कमांडोना हे काम लवकर उरकायचे होते.
कामंडो टर्मिनल कडे गेले आणि त्यांनी मेगाफोन मधून “हिब्रू भाषेत “एक घोषणा केली.”सर्व जण खाली बसा. आम्ही इसराईली कामंडो आहोत ” आणि त्यानंतर कमांडोनी अंधाधून गोळीबारीला सुरवात केली या मध्ये काही आतंकवादी मारले गेले पण ‘या मैमुनी ‘नावाचा एक मुलगा ज्याला हिब्रू भाषा समजत नसल्या करणानाने मारला गेला. आणखी दोन बंधक सुद्धा मारले गेले.
इसराईल कामंडोनी खूप चपळाईने हे ऑपरेशन पूर्ण केले. सर्व आतंकवाद्याना त्यांनी मारले. पण तोपर्यंत युगांडा सैनिकांनी सुद्धा गोळीबारी सुरु केली या गोळीबारीत युगांडा चे 45सैनिक मारले गेले.
या नंतर कमांडोनी सर्व बंधकांना विमानात बसवले आणि आणि विमानाने उड्डाणं भरली. एका युनिट ने विमानतळावरील युगांडाच्या सर्व विमानाना नष्ट केले. त्यानंतर सर्व कामंडो विमानात बसले आणि इसराईल च्या दिशेने गेले.
या ऑपेरेशन मध्ये इसराईल चे एक कमांडो मारल्या गेले योनातन नेत्यांनाहू. यामुळे इसराईल मध्ये या ऑपेरेशन ला योनातन ऑपेरेशन सुद्धा म्हणतात.
OPERATION THUNDERBOLT
