Operation Neptune Spear:ऑपेरेशन नेपच्युन स्पेअर ज्याने अमेरिकेने ओसामा बिन लादेन चा खात्मा केला

नमस्कार मित्रांनो मी अविनाश आज आपण बघणार आहोत जगातील मोस्ट वांटेड आतंकि ‘ओसामा बिन लादेन’ च्या खत्म्याची कहाणी.

अमेरिकेचा सर्वात मोठा दुस्मन समजल्या जाणाऱ्या ओसामा बिन लादेन ला शोधण्यासाठी अमेरिकेने बिलीयन डॉलर खर्च केले.

संपूर्ण जग भर ओसामा चा त्यांनी शोध घेतला.

जेव्हा अमेरिकेला समजले ओसामा हा अफगाणिस्तान च्या तोरबोरा पर्वत रांगा मध्ये लपून बसला आहे.तेव्हा अमेरिकेने तोरा बोरा मध्ये एवढे बॉम्ब टाकले कि आसपास भूकंपाचे धक्के बसले होते.

ओसामा बिन लादेन हा 9/11चा अमेरिकेवरील हल्ला झाला. त्या हल्ल्या चा मास्टर माईंड होता.

इकडे अमेरिका संपूर्ण जग पायाखाली घालत होती आणि ओसामा हा पाकिस्तान च्या आबाटाबाद मध्ये लपून बसला होता.

जेव्हा याचा अमेरिकेला सुगवा लागला तेव्हा अमेरिकेने त्याला तिथे जाऊन मारण्याचा एक प्लान बनविला त्या प्लान चे नाव होते. Operation Neptune Spear

बिन लादेन चा शोध

जवळपास दहा वर्ष्यापासून अमेरिकी गुप्तचर यंत्रणा बिन लादेन चा शोध घेण्यासाठी संपूर्ण जग भर फिरत होती.

सप्टेंबर 2010 मध्ये CIA ला सुगावा लागला कि ओसामा पाकिस्तान च्या आबाटा बाद मध्ये आहे. खूप वर्षा नंतर त्यांना ओसामा विषयी थोडी का असेना माहिती भेटली होती.

त्यांना काही फोटो आणि गुप्त रिपोर्ट च्या साहाय्याने माहित झाले कि एक अज्ञात संदेश वाहक पाकिस्तान च्या आबाटाबाद परिसरात नेहमी येत असतो.

त्यांनी काही महिने त्या परिसराची आणि त्या अज्ञात संदेशवाहकाची निगरांनी केली. त्यानंतर CIA ने निष्कर्ष लावला कि बिन लादेन आणि त्याचा परिवार याच भागात राहतो.

पण त्यांच्याकडे कोणताही ठोस पुरावा न्हवता कि बिन लादेन इथेच राहतो. त्याच्याकडे फक्त अनुमान होते.

Operation Neptune Spear

अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात गुप्त मिशन ची सुरवात झाली होती.

तारीख होती 2मे 2011 रात्री ची वेळ होती. अमेरिकी दोन ‘स्टील ब्लॅक हॉक’ हेलिकॉप्टर पाकिस्तान च्या आबाटाबाद च्या दिशेने निघाले होते.

आबाटाबाद हे शहर पाकिस्तान ची राजधानी पासून 35मिल दूर आहे. या ऑपेरेशन मध्ये अमेरिकी नौसेना टीम सहा चे 23 कमांडो होते. एक अनुवादक आणि एक काइरा नावाचा श्वान होता.

रात्री च्या अंधारात अमेरिकी विमान पाकिस्तान मध्ये घुसले. दोन्ही विमान अलग अलग दिशेने होते. पाकिस्तान च्या वेळेनुसार रात्री 12:30 वाजता हे हेलिकॉपर त्या परिसरात आले.

या मिशन साठी नौसेना कमांडोनी खूप अभ्यास केला होता. आता फक्त जमिनीवर उतरून त्या मिशन ला अंजाम देण्याची वेळ आली होती.

पण त्याच वेळेला एक दुर्घटना झाली. दोन हेलिकॉप्टर मधून एक हेलिकॉप्टर परिसरातील त्या 18फूट उंचीच्या भिंतीला धडकले. त्यामुळे पायलट ला सॉफ्ट क्रॅश लँडिंग करावी लागली.

या दुर्घटनेनंतर कोण्याही सील कमांडोला गंभीर जखम झाली नाही. आणि ही टीम ऑपेरेशन साठी त्या बिल्डिंग च्या दिशेने रवाना झाली.

सील टीम अंधारात बिल्डिंग मध्ये ओसामाचा शोध घेत होती. त्यांनी’नाईट व्हिजन गॉगल्स’घातले होते.

त्याच वेळेला ओसामा बिन लादेन चा खास विश्वासू कुरिअर ‘अबू अहमद अल -कुवेती’ ने गार्ड हाऊस दरवाजाच्या मागून फायरिंग केली. या झटपटीत कुवेती मारला गेला.

मुख्य इमारतीच्या आत मध्ये गेल्या नंतर ग्राउंड फ्लोर वरती अल कुवेती चा भाऊ होता त्याला सुद्धा कमांडोने निशाणा बनवले.

त्यानंतर सील कमांडो पायऱ्या चढून वरती गेले तेव्हा तिथे बिन लादेन चा मुलगा खालिद होता त्याला सुद्धा निशाना बनविले.

या ऑपेरेशन च्या वीस मिनिटा नंतर, बिल्डिंग च्या सर्वात वरच्या मजल्यावर एक दाढीवाला उंच माणूस दिसला.

त्याच्यावरती फायरिंग केली पण तो बचावला होता तोच होता ‘ओसामा बिन लादेन ‘.

बिन लादेन आपल्या रूम मध्ये वापस गेला. सील कमांडोणे त्याचा पाठलाग केला त्याच्या रूम मध्ये गेले, त्या रूम मध्ये दोन मुली आणि महिला होत्या. त्या महिलांना सील कमांडोनी बाजूला केले. आणि बिन लादेन वरती गोळ्या झाडल्या.

त्याला दोन गोळ्या लागल्या. एक गोळी डोळ्याच्या वरती आणि दुसरी त्याच्या छातीत लागली.

ही फायरिंग केली त्या कामंडोचे नाव होते ‘रोबर्ट जे ओ निल ‘.

जगातील सर्वात मोस्ट वांटेड आतंकवादी ओसामा बिन लादेन मारला गेला होता. तेव्हा सील टीम ने रेडिओ वरून एक घोषणा केली. “ईश्वरासाठी आणि देशासाठी “गेरोनिमो, गेरोनिमो, गेरोनिमो.

ओसामा बिन लादेन ला पकडण्यासाठी किंवा त्याला मारण्यासाठी हा कोड होता

हे सर्व दास्तावेज एकत्र करून बिन लादेन चा मृत्यूदेह एका body bag मध्ये टाकून सील टीम आपल्या हेलिकॉप्टर कडे रवाना झाली. सील टीम ला त्या बिल्डिंग मधून काढण्यासाठी एक बैकअप हेलिकॉपर आले.

सील टीम ने त्या बिल्डिंग ची संपूर्ण छानबीन केली. त्यात त्यांना कॉम्प्युटर हार्ड ड्राईव्ह, मेमोरि स्टिक, असे भरपूर दास्तावेज सापडले.

त्यानंतर ओसामा बिन लादेन चे शव घेऊन तिथून सील टीम अफगाणिस्तान कडे निघाली.

हे ऑपेरेशन एवढ्या गतीने होते कि फक्त 40 मिनिटात पूर्ण झाले.

सील टीम ने बिन लादेन ची ओळख पटण्यासाठी DNA चे नमुने घेतले. बिन लादेन च्या शवला इस्लामी कायद्यानुसार तयार केले आणि समुद्रात त्याची दफन विधी केली.

जगातील सर्वात मोस्ट आतंकी ओसामा बिन लादेन मारला गेला. आणि अमेरिकेने 9/11चा बदला घेतला.

Operation Neptune Spear

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *