इतिहासाच्या पानामध्ये एक ऑपेरेशन असे सुद्धा आहे जाने दुसऱ्या महायुद्धला एक निर्णायक परिणाम दिला. नाझी जर्मनी जेव्हा संपूर्ण युरोप मध्ये धुमाकूळ घालत होती तेव्हा मित्र राष्ट्र पूर्ण पणे हताश झाले होते. चारी बाजूने फक्त हिटलर चा विजय होत होता. हिटलर चे हवाई हमले इंग्लंड च्या लंडन वरती सुद्धा होत होते. इकडे अमेरिका आणि जपान लढत होते जपाण्यानी सुद्धा अमेरिकेला पुरतं घायाळ करून सोडले होते. हिटलर च्या जीवनतील सर्वात मोठे ऑपरेशन बरबारोसा मुळे सोवियत रुस सुद्धा पूर्ण पणे बिखरून गेला होता. या दुसऱ्या महायुद्धात हिटलर अजय ठरत होता. नाझी सैनिकांनी मानव जातीला लाजवेल असे काम केले होते. जर्मनी मध्ये येहुदी समाजाला लाजिरवाण्या पद्धतीने नाझी मारत होते. हिटलर आणि नाझी यांनी अत्याचाराचा कळस गाठला होता. आणि आता मित्र राष्ट्रा कडे एकच पर्याय उरला होता. हिटलर ला हरवणे आणि दुसरे महायुद्ध समाप्त करणे कारण या या महायुद्धात लाखो करोडो लोक तो पर्यंत मारल्या गेले होते. आणि हे युद्ध चालूच होते. त्या नंतर या महायुद्धला एक निर्णायक मोड भेटला आणि तो म्हणजे ऑपेरेशन d day तर आज आपण बघणार आहोत ऑपेरेशन d day विषयी जाने दुसरे महायुद्ध संपले.
6जून 1944हा दिवस म्हणजे 20व्या शतकाला पूर्ण पणे कलाटणी देणारा ठरला होता. दुसऱ्या महायुद्धच्या झळा संपूर्ण जगाला लागल्या होत्या.
D day मानवाच्या इतिहासातील सर्वात मोठे संयुक्त सैन्य ऑपरेशन

1944पर्यंत महायुद्ध संपूर्ण जगात पोहचले होते. नाझी जर्मनिनी अत्याचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या. आणि युरोपीय देशाची अवस्था खूप बिकट झाली होती त्यामुळे त्यांच्या समोर ‘करो या मरो ‘ची स्तिती झाली होती.
अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि सर्वच मित्र राष्ट्र हे युद्ध थांबेल कसे याचा विचार करत होते. 1944जून मध्ये मित्र राष्ट्रानी 1लाख 56हजार सैनिक नाझी जर्मनीच्या विरोधात उभे केले. मित्र राष्ट्राच्या सैनिकांनी 6जून 1944ला उत्तरी फ्रान्स च्या नॉरमेंडी शहराच्या किनाऱ्यावर घुसपैठ केली. हा भाग जर्मनीच्या ताब्यात होता. या घुसपैठीला मानव इतिहासातील सर्वात मोठी सबमरीन घुसपैठ म्हणतात. दुसऱ्या महायुद्धातील सर्वात मोठे सैन्य अभियान आहे.
या संयुक्त सैन्य अभियानाला ऑपेरेशन ओव्हरलोड सुद्धा म्हणतात. युरोप मध्ये नांझिंच्या भागात हा हमला होता. या ऑपरेशन ला नेपच्युन हे सुद्धा नाव दिले होते. दुसरे महायुद्ध समाप्त करणे हाच याचा उद्देश होता. या अभियानात तिन्ही सेनानीं भाग घेतला होता. पोर्टसमाऊथ च्या डी डे संग्रहालयातील आकाड्यानुसार नाझी सैनिकांच्या विरोधात जे सैन्य अभियान चालू होते त्या मध्ये मित्र राष्ट्राचे 4413सैनिक मारले गेले होते आणि नाझी जर्मनीचे 9हजार सैनिक मारले गेले होते.
या ऑपेरेशन मध्ये मित्र राष्ट्रानी फ्रान्स मध्ये चढाई करून फ्रान्स नांझिंच्या हातून सोडून घेतले. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धला एक नवीन दिशा मिळालली. त्यानंतर सोवियत सैनिकांनी सुद्धा पूर्वे कडून हमाला केला ज्यामुळे हिटलर चे बर्लीन शहर त्याच्या हातून जाणार होते. त्यानंतर केवळ 11महिन्यांनी नाझी जर्मनी दुसरे महायुद्ध हरली.
नॉरमंडी च्या लढाई नंतर एका वर्षात दुसरे महायुद्ध संपले
नॉरमंडी च्या लढाई नंतर हिटलर सोबत जे राष्ट्र होते ते हरत चालले होते.

आणि त्यांचा एक एक भाग मित्र राष्ट्राच्या ताब्यात जात होता. ऑक्टोबर मध्ये फिलिपीन्स च्या लेटी भागावर मित्र राष्ट्रानी धावा बोलला. ज्या मध्ये जपान हरला. त्यानंतर ओकेनावा भुभागवरून सुद्धा जपान चा ताबा गेला. जो भुभाग जपान कडे मागील 75वर्षांपासून होता. त्या नंतर जे घडणार होते ते महाभयंकर होते. मानव जातीच्या इतिहासातील सर्वात मोठा असा हल्ला होणार होता.
6ऑगस्ट ला अमेरिकेने हिरोशीमा शहरावर अणुबॉम्ब टाकला. या हल्ल्यात हजारो माणसे मारल्या गेली आणि लाखो माणसे जखमी झाली किंवा अर्ध मेली झाली.
Hiroshima

दुसरा अणुबॉम्ब तीन दिवसाने नागासाकी शहरावर टाकला. त्यानंतर 2सब्टेंबर 1945ला जपान ने बिना शर्त आत्मसमर्पण केले. यानंतर 6वर्ष चालणार महायुद्ध समाप्त झालं.