Nuclear bunker Switzerland:जगात सर्वात जास्त आण्विक बंकर स्वित्झर्लंड मध्ये का आहेत?

जर तुम्हाला शांती हवी असेल तर, तुम्हाला युद्ध करण्यासाठी तयार राहावे लागेल. ही जगातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आणि आजच्या काळात जर आपण डोकावून पहिले, तर नक्कीच ही बाब महत्वाची ठरते.
आज आपण पाहणार आहोत युरोप देश्यातील एक असा देश ज्या देश्यामध्ये खूप जास्त प्रमाणात Nuclear bunker आहेत आणि त्या देशाचे नाव आहे स्वित्झर्लंड.
जर तुम्हाला शांती हवी असेल तर, तुम्हाला युद्ध करण्यासाठी तयार राहावे लागेल.ही जी म्हण आहे ती नक्कीच स्वित्झर्लंड सारख्या देशाला तंतोतंत जुळवून येते.
स्विस आल्पस च्या एकदम मजबूत आणि कणखर पाहाडांना खोदले आहे.त्या मध्ये सेकडो परमाणू बंकर आणि नागरिक आणि सैन्या साठी सुरंगे सापडले आहेत.
या बंकराचे प्रवेश द्वार ढिगाऱ्या खाली आहे.इथे अश्या काही इमारती आहेत, त्या दिसायला एकदम साधारण घरा सारख्या आहेत.पण त्या कंक्रीट च्या भिंती आहेत.त्या मध्ये रायफल ठेवण्यासाठी जागा सुद्धा केल्या आहेत.
https://vishwmarathi.com/pahalgam-attack-2025/
Nuclear bunker Switzerland 88लाख लोकसंख्या असलेल्या स्वित्झर्लंड देशात सर्वात जास्त अन्विक बंकर आहेत, त्याची संख्या 3.7 लाख इतकी आहे.
स्वित्झर्लंड देशात 1963मध्ये एक कायदा पास झाला होता त्या नुसार जर परमाणू हल्ला झाला किंवा शेजारील देशा सोबत जर युद्ध झाल तर, नागरिकांना वाचवण्यासाठी बंकर बावण्याचे आदेश दिले गेले होते.
आणि या कायद्या नुसार प्रत्येक नागरिकाला बंकर बनवण्यासाठी सरकार कडून जमीन दिली जाते.https://shorturl.bz/sTc
या वेतिरिक्त हे बंकर त्या नागरिकांच्या घरपासून 30मिनिटाच्या अंतरावर असले पाहिजे, जर एकाद्या वेक्ती चे घर डोंगराळ भागात असेल तर त्या वेक्तीचे परमाणू बंकर एका तासाच्या अंतरावर असले पाहिजे.
स्वित्झर्लंड देशात अपार्मेंट मालकाला आपल्या सर्व नागरिकांसाठी परमाणू बंकर बनविणे अनिवार्य आहे.
देश्यातील नागरिक सुरक्षा कार्यालय चे म्हणणे आहे, जास्तीत जास्त नागरिक त्या अपार्मेंट मध्ये राहतात जिथे बंकर आहे, आणि जर एखाद्या अपार्मेंट मध्ये जर परमाणू बंकर नसेल तर त्यांना सार्वजनिक सुविधा दिली जाते.
हे बंकर आधुनिक सुविधाने लेस असतात आणि यांच्यावर कोणत्याही आधुनिक हत्याराने जर हमला केला तर बंकर वर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, एवढे ते मजबूत केलेले असतात.
नागरिक सुरक्षा विभागा नुसार हे बंकर कमीत कमी 10 टन वजन झेलतील एवढे ते मजबूत असतात.म्हणजे यांच्यावर एखादी इमारत सुद्धा पडली तरी हे त्या इमारतीच वजन सहन करू शकतात.
50 – 60वर्ष्या पूर्वी बनवले होते बंकर Nuclear bunker Switzerland
Nuclear bunker Switzerland
काही बंकर पन्नास ते साठ वर्ष्या पूर्वी बनवले होते आणि त्यांचा वापर झाला नाही म्हणून काही बंकर खराब झाले.
स्थानिक नागरिक असलेले काही लोक म्हणतात कि आम्ही स्वतःला सुरक्षित समजू शकत नाही, कारण संपूर्ण जगात भरपूर प्रमाणात विधवंसक हत्यार झाले आहेत. त्या मुळे आम्ही स्वतःला सुरक्षित समजू शकत नाही. जर कधी आमच्या देशावर हल्ला झाला तर भरपूर प्रमाणात लोकांचे प्राण जाऊ शकतात.
आजच्या काळातील जे ऍडव्हान्स हत्यार आहेत ते पन्नास वर्ष्या पूर्वी बनवलेल्या बंकर ला सहज निकामी करू शकतात.
आणि त्यामुळे तेथील सरकार त्या बंकर ला आधुनिक बनवत आहे.त्यासाठी सरकार ने 250मिलियन डॉलर चा फंड दिला आहे, त्या मुळे आपत्कालीन स्तिती मध्ये नक्कीच या बंकर चा उपयोग होईल.
तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, हे बंकर म्हणजे युद्धाची तयारी नसून, आपत्कालीन वेळेला याचा नक्कीच उपयोग होईल.
तेथील स्थानिक नागरीक म्हणतात हे बंकर बघून आम्हाला आनंद होतो कारण जर आमच्या देशावर परमाणू हल्ला झाला तर नक्कीच आम्ही आमच्या परिवाराला वाचवू शकतो.आज जगात जे होत आहे ते बघून नक्कीच असे वाटते कि स्वित्झर्लंड या देशात सुरक्षा खूप आहे. आणि ती प्रत्येक देशात आम नागरिकांसाठी असायला हवी आहे.
दुसऱ्या महायुद्धात जेव्हा जर्मनी मध्ये आणि संपूर्ण युरोप खंडात येहुदी लोकांना मारल्या जात होते तेव्हा, जर्मनी मध्ये हिटलर ने येहुदी लोकांना मारण्या साठी मोठं मोठे गॅस चे कॅम्प बनवले होते. तेव्हा तिथून जे येहूदि पळून आले होते त्यांना स्वित्झर्लंड मध्ये शरण दिली जात होती.
भारताची तयारी कुठं पर्यंत
Nuclear bunker Switzerland
आज संपूर्ण जगात युद्धाचे वातावरण चालू आहे. आणि या मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये सुद्धा तणावाचे वातावरण आहे. भारताने मागील सत्तर वर्ष्यात पाकिस्तान सोबत चार युद्ध लढले आणि जिंकले सुद्धा, पण मागील सत्तर वर्ष्यात सत्तेवर असणारे BJP आणि काँग्रेस सरकार यांनी कोणतीही सुविधा दिली नाही.
आपत्कालीन वेळेला भारतीय नागरिकांसाठी कोणतीही सुविधा नाही हे दुर्दैव आहे. किंवा येणारा काळ कसा असेल याचा विचार करण्याची क्षमता सरकार मध्ये नाही आणि विरोधकांमध्ये तर मुळीच नाही.
भारताला सुद्धा बदलणाऱ्या जगासोबत बदलावे लागेल, येथील नेत्यांनी केवळ आश्वासन द्यायचे आणि ते नागरिकांनी ऐकायचे असे किती दिवस चालणार आणि ते पूर्वीचे दिवस सुद्धा नाही हे सर्वच नेत्यांनी लक्ष्यात घ्यायला पाहिजे.

One Reply to “Nuclear bunker Switzerland:जगात सर्वात जास्त आण्विक बंकर स्वित्झर्लंड मध्ये का आहेत?”