ISRAIL Vs IRAN CONFLICT :इस्राईल विरुद्ध इराण युद्धाचा इतिहास, पूर्वीचे मित्र झाले दुस्मण.. ते वर्षे 1979…..
इस्राईल आणि इराण मधील दोस्ती आणि दुस्मनी चा इतिहास खूप जुना आहे.इस्राईल आणि इराण मध्ये पूर्वी चांगले संबध होते. पण 1979 मध्ये जेव्हा इराण मध्ये ‘इस्लामिक क्रांती’ झाली आणि आणि दोन्ही देशात एक ISRAIL Vs IRAN CONFLICT आली.
ISRAIL Vs IRAN CONFLICT
ISRAIL Vs IRAN CONFLICT
इस्राईल आणि इराण या दोन्ही देशात काही वर्षा पासून शाब्दिक हल्ले होत होते.पण काही दिवसा पूर्वी इस्राईल ने इराण वरती हल्ला केला त्याचे प्रतिउत्तर म्हणून इराण ने इस्राईल वरती हल्ला केला.
या हल्ल्या नंतर दोन्ही देश्यातील तणाव खूप जास्त प्रमाणात वाढला होता.आणि इस्राईल सांगितले जेव्हा जेव्हा इराण परमाणू कार्यक्रम चालू करेल तेव्हा इस्राईल इराण वरती हल्ला करेल आणि परमाणू ठिकाणे नष्ट करेल.
जगातील भरपूर देश प्रत्येक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या या युद्धात सामील झाले होते.काही देशानी शांती साठी सुद्धा प्रयत्न केले होते.भारताने सुद्धा दोन्ही देशाला शांती साठी अपील केली होती.
पण प्रश्न हा निर्माण होतो कि या दोन्ही देशात जे प्रॉब्लेम आहेत ते कधी पासून आहेत आणि त्या मागचा इतिहास काय आहे. काही वर्ष्या पूर्वी हे दोन्ही देश चांगले मित्र होते. आणि या दोन्ही देश्यात चांगले संबध होते. पण असे काय झाले कि पूर्वीचे मित्र आता खूप मोठे शत्रू झाले आहेत.
जुनीच मैत्री
इस्राईल आणि इराण मधील मैत्री पासून दुश्मनी ही खूप जुनी कहाणी आहे.
What is Doomsday Plane E-4b,काय आहे डूम्सडे विमान?
इस्राईल आणि इराण हे दोन देश सुरवातीच्या काळात चांगले मित्र होते. पण नंतर इराण मध्ये इस्लामीक क्रांती झाली आणि दोन्ही देश्याच्या मैत्रीत फूट पडली.इस्लामिक क्रांती झाल्या नंतर इराण ने इस्राईल सोबतचे आपले सर्व संबंध तोडून टाकले आणि त्यानंतर दोन्ही देशात दुस्मनी सुरु झाली.
हे सर्व बघण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले हे बघावं लागेल कि इराण मध्ये क्रांती का झाली आणि त्यामागचे कारण काय आहेत.
इराण ची इस्लामिक क्रांती
इराण क्रांती ही 1979साली झाली आणि ही क्रांती म्हणजे 20व्या शतकातील एक महत्व पूर्ण क्रांती मानली जाते.आणि या क्रांतिनेच इराण हा देश इस्लामिक देश झाला.
आयातुला खोमेनेई यांच्या नेतृत्वात ही क्रांती झाली आणि इराण हा इस्लामिक देश झाला. या क्रांती नंतर इराण हा जगातील पहिला इस्लामिक देश झाला.
पण ही क्रांती होण्याच्या पूर्वी खोमेनेई यांना इराण मधून हाकलून देण्यात आले होते. कारण खोमेनेई हे सरकार विरोधात बोलत होते.

खोमेनेई यांना देश्यातून काढल्या नंतर ते, तुर्की, इराक, आणि फ्रान्स सारख्या देशात आश्रयाला होते. त्यांनी बाहेर राहून सुद्धा सरकार विरोधात आपले काम चालू ठेवले होते.
1979 मध्ये जेव्हा इराण मध्ये उठाव झाले आणि त्या उठवा मुळे इराण चे शासक असलेले पहलवी यांना देश सोडून जावे लागले.
त्या नंतर खोमेनेई हे पुन्हा इराण मध्ये वापस आले. त्या नंतर इराण मध्ये एक निवडून झाली आणि खोमेनेई यांची शानदार जीत झाली. या विजया नंतर खोमेनेई यांना इराण चे सर्वेसर्वा घोषित करण्यात आले.
इराण मधील क्रांतीचे कारण
इराण मधी जी क्रांती झाली त्याचे मुख्य कारण म्हणजे, पहलवी यांच्या सरकार ची नीती, पहलवी सरकार हे पश्चिम धर्जीने सरकार होते आणि या सरकार मध्ये खूप भ्रष्टाचार होता.आणि पहलावी यांची इराण वरती तनशाही होती. पहलवी यांच्या सरकार मध्ये अमेरिका सारख्या देश्याचा होणारा हस्तक्षेप.
पहलवी यांच्या सरकार मध्ये सिया मौलवी यांचा खूप दबदबा होता, आणि सर्व साधारण माणसाचे हाल होत होते.या मुळे या सरकार विरोधात लोकांचा असंतोष होता.आणि लोकांना पश्चिमी देशा सोबतचे संबध पसंद न्हवते.
शाह यांची पश्चिम देशा कडे जास्तीच पकड होत होती, त्या मुळे स्थानिक मौलवी हे शाह च्या विरोधात गेले होते.इराण मधील लोकांचे आणि मौलावीचे म्हणणे होते शहा यांनी इस्लामीक कायद्या नुसार शासन चालवावे.
इराण मध्ये खूप जास्त प्रमाणात भ्रष्टाचार वाढला होता त्यामुळे बेकारी आली होती आणि या बेकारी मुळे मध्यम वर्ग हा गरीब होत चालला होता.
क्रांती ची सुरवात
ऑगस्ट 1978मध्ये एका सिनेमा हॉल मध्ये आग लागली होती. आणि या आगीत 400लोक मारले गेले होते.इराण मधील शहा विरोधी लोकांनी असा आरोप केला कि ही आग शहा यांच्या सैनिकांनी लावली होती.
आणि या आरोपा मुळे संपूर्ण इराण मध्ये आंदोलन झाली आणि इराण क्रांती साठी संपूर्ण जनता एकवटली.त्या नंतर इराण मध्ये खूप जास्त प्रमाणात जणआंदोलन झाली. या आंदोलनात सर्व प्रकारचे लोक होते.
या क्रांती नंतर इराण चे शासक असलेले शहा यांना आपला देश सोडून जावे लागले.
या क्रांती नंतर इराण च्या सत्तेवर खोमेनेई आले आणि त्यांनी सर्वात पहिले इस्राईल सोबत असलेले इराण चे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला.इराण ने इस्राईल च्या अस्तित्वालाच नाकारले होते.
इस्राईल ने सुद्धा सांगितले इराण मध्ये जी इस्लामीक क्रांती झाली त्या मुळे इस्राईल च्या अस्तित्वला धोका आहे.आणि या इराण च्या नीती विरोधात लढण्याची तयारी इस्राईल ने दाखवली.
फिलिस्तीन मध्ये जे गुट होते ते इस्राईल विरोधात लढत होते. इराण ने त्या फिलिस्तींनी गुटांना इस्राईल विरोधात समर्थन दिले.