Israel-Iran conflict:राईसिंग लायन vs ट्रू प्रॉमिस 3,युद्धा मध्ये ऑपरेशन ला हे नाव का दिले?
Israel-Iran conflict
13जून 2025ला सकाळी इस्राईल ने इराण वरती हल्ला केला.आणि या हमल्याला ऑपेरेशन राईसिंग लायनल हे नाव दिले.या ऑपेरेशन मध्ये इस्राईल ने इराण वरती 200 पेक्ष्या जास्त फायटर जेट घेऊन इराण च्या 100पेक्ष्या जास्त ठिकाणावर हल्ले केले.या मध्ये इराण चे परमाणू ठिकाण जास्त होते.
इस्राईल ने इराण वर हल्ला केल्या नंतर, इराण ने सुद्धा इस्राईल वरती हल्ले सुरु केले आणि या हल्ल्या ला नाव दिले ‘ऑपेरेशन ट्रू प्रॉमिस 3’या ऑपेरेशन नुसार इराण ने इस्राईल च्या तेल अविव आणि येरुसेलम सारख्या शहरावर ड्रोन आणि बॅलेस्टिक मिसाईल टाकल्या.
Operation Rising Lion: इसराईल चा इराण वर हल्ला, परमाणू आणि सैन्य ठिकाणावर हल्ले
इस्राईल आणि इराण मध्ये जी लढाई चालू आहे ती केवळ भू रजनीतिक लढाई नसून ती धर्म आणि वर्चस्वा साठी सुद्धा आहे.
दोन्ही सुद्धा देश आपल्या धर्माच्या मान्यताचा सहारा घेऊन लढत आहेत.
इस्राईल स्वतःला येहुदी लोकांची पवित्र भूमी समजत असतो आणि येरुसेलम सारख्या शहरवर्ती आपला हक्क सांगत असतो पण इतिहासिक दृष्टीने जरी बघितले तर येरुसेलम हे हजारो वर्ष्या पासून येहूदी लोकांची पवित्र भूमी आहे.
इराण सुद्धा स्वतःला मुस्लिम देशाचा सर्वच्च देश मानतो आणि इस्लाम च्या नावावर संपूर्ण जगातील मुस्लिम राष्ट्राला इस्राईल विरोधी कारवाई करण्या साठी सांगतो.या दोन्ही देश्यातील जी सैन्य कारवाई चालू आहे आणि या कारवाईला दोन्ही देशानी वेगवेगळे नाव दिले आहेत तर त्या नावा मागील तथ्य बघूया.
Israel-Iran conflict1
इराण ने काही दिवसापूर्वी इस्राईल विरोधात एक ऑपरेशन सुरु केले त्याचे नाव होते ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3’इराण ने जे नाव दिले या साठी आपल्याला त्याचा संदर्भ आणि त्या मागचा उद्देश बघावा लागेल.
काय आहे ट्रू प्रॉमिस 3
ट्रू प्रॉमिस (सच्चा वादा )नाव इस्लामी परंपरा मधून घेतले आहे.इस्लाम धर्मानुसार सच्चा वादा चा संबध कायमत च्या दिवसा पासून आहे.त्या दिवशी त्यांचा ईश्वर त्त्यांच्या कर्मानुसार त्यांचा हिसाब करेल.त्याला इस्लाम मध्ये अंतिम न्याय चा दिवस मानल्या जाते.आणि इराण ने हेच नाव त्याच्या ऑपेरेशन ला दिले आहे.हे जे नाव आहे त्यांच्या नुसार न्याय आणि प्रतिशोधाचे प्रतीक आहे.
इराण ची इस्राईल विरोधातील प्रत्यक्ष रित्या तिसरी सैन्य कारवाई आहे.’ट्रू प्रॉमिस 1’आणि ट्रू प्रॉमिस 2नंतर ही तिसरी कारवाई आहे.मागील अभियान एप्रिल 2024 आणि आक्टोबर 2024मध्ये झाले होते.याचे मुख्य लक्ष होते इस्राईल च्या सैन्य ठिकाणावर आणि नागरिकांवर हल्ले करणे.
ऑपेरेशन राईसिंग लायन चा अर्थ काय आहे?
काही रिपोर्ट नुसार ऑपेरेशन राईसिंग लॉयन हे नाव बायबल च्या एका आयात मधून घेतले आहे.आणि या आयात मध्ये सांगितले आहे, बघा लोक खूप मोठ्या सिंहा सारखे उठतील. आणि एका मोठया सिंहा सारखे स्वतःला उंच उठवतील. आणि तो सिंह तो पर्यंत झोपणार नाही जो पर्यंत तो आपली शिकार कारणार नाही आणि मेलेल्या लोकांचे रक्त पिणार नाही.
ऑपेरेशन राईसिंग लायन एक भविष्य वाणी आहे.या मध्ये इस्राईल ची ताखद एका सिंहा सारखी दाखवली आहे.जो पर्यंत आपली भूक थांबत नाही तो पर्यंत अराम करत नाही.
Israel-Iran conflict2

नेतान्याहू यांनी इराण वरती लावले आरोप
Israel-Iran conflict1
इस्राईल ने या ऑपेरेशन नंतर सांगितले इराण चा उद्देश खूप खतरनाक आहे, आणि इराण इस्राईल चे अस्तित्व नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो आहे.आणि इस्राईल ने जी कारवाई केली आहे त्या मागचा उद्देश फक्त इस्राईल ची रक्षा करणे आहे.
या हल्ल्या नंतर इस्राईल च्या सैन्य प्रमुखांनी एक बयान मध्ये सांगितले इस्राईल च्या सर्व सीमा भागावरती इस्राईल ची सेना युद्धा साठी तैयार आहे.
इस्राईल ने आपल्या सर्व दुष्मणांना चेतवनी दिली आहे. त्यांनी सांगितले ‘आम्ही सर्व सीमा वरती तैयार आहोत, जो कोणी इस्राईल विरुद्ध कारवाई करेल, त्याला याची किंमत द्यावी लागेल.
इस्राईल ने इराण वरती हल्ले केल्या नंतर अमेरिका कडून सुद्धा बयान आले.अमेरिकेचे विदेश मंत्री ‘मार्को रुबीओ’यांनी सांगितले या हल्ल्या मध्ये अमेरिकेचा कोणत्याही प्रकारे हात नाही.त्यांनी सांगितले इस्राईल ने जो हल्ला केला तो इस्राईल च्या आत्मरक्षा करिता होता, असे इस्राईल ने सांगितले.
इराण इस्राईल युद्धामुळे जगात नक्कीच अशांती झाली आहे आणि मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाची खूप मोठी ठिणगी पडली आहे. या युद्धामुळे रशिया आणि अमेरिका अप्रत्यक्ष रिता नक्कीच आमणे सामने येतील.