Isaril vs Iran :इराण इस्राईल युद्धात रशिया वर कोणते परिणाम होतील?
सिरिया मध्ये ‘बशर अल असद ‘सरकार असताना पश्चिम आशियात रुस ची मजबूत पकड होती.पण मागील वर्षी डिसेंबर मध्ये असद ला रुस मध्ये शरण घ्यावी लागली.आणि रुस 2022पासून युक्रेन युद्धात फसला आहे.

आणि आता इस्राईल ने इराण वरती हल्ला केला आहे.इस्राईल ला अमेरिकेकडून पूर्ण समर्थन आहे.या Isaril vs Iran युद्धात इराण मध्ये जर सत्ता परिवर्तन झाले तर, पश्चिम आशिया मध्ये रुस ची पकड पूर्ण पणे कमजोर होऊन जाईल.
इराण इस्राईल युद्धात इराण ला रुस ची आवश्यकता आहे, पण रुस इराण ची कोणत्याही प्रकारे मदत करू शकत नाही.आणि अशातच काही प्रश्न असे सुद्धा आहेत कि रुस इराण ची मदत का करू शकत नाही?आणि दुसरा प्रश्न हा आहे या israil vs iran युद्धात इराण जर हरला तर त्याचे रुस वरती काय परिणाम होतील?
या वर्षीच्या 2025सुरवातीला रुस चे राष्ट्रपती ‘पुतीन ‘आणि इराण चे राष्ट्रपती’ मसुद पेजेश्कियान ‘ यांच्यात एक करार सुद्धा झाला होता.आणि या करारात ‘सुरक्षा सहयोग ‘ वाढवण्यासाठी बातचीत झाली होती.
Isaril vs Iran युद्धात रुस ने जी भूमिका घेतली आहे ती पूर्ण पणे सतर्कतेची आहे.रुस इस्राईल चा विरोध करत आहे पण इस्राईल विरोधात इराण ला कोणतीही मदत करत नाही.
रुस चे राष्ट्रपती पुतीन यांनी 13जून रोजी इराण चे राष्ट्रपती आणि इस्राईल राष्ट्रपती यांच्याशी फोन वरती बातचीत केली होती.
पुतीन यांनी इराण च्या राष्ट्रपतीला सांगितले इस्राईल ने इराण वरती जो हल्ला केला त्याचा रशिया निषेध करतो.आणि इस्राईल चे राष्ट्रपती यांना सांगितले इराण चा परमाणू कार्यक्रमा वरची चिंता फक्त कुठनीतिनेच कमी होऊ शकते.
‘शांघाई सहयोग संघटन ‘(SCO)आणि ब्रिक्स सारखे संघटन सारखे संगठन इराण च्या समर्थनार्थ का येत नाहीत? इराण या दोन्ही संघटनाचा भाग आहे.त्याच्या मागील कारण हे आहे कि ब्रिक्स मध्ये भरपूर असे देश आहे ज्यांना अमेरिकेच्या विरोधात जायचं नाही.यामध्ये SCO संघटन पश्चिम च्या विरोधात आहे पण हे संघटन सुद्धा पश्चिम च्या विरोधात जात नाही.
Isaril vs Iran
रुस आणि चीन हे दोन्ही देश इराण साठी, पश्चिमी देश्याच्या विरोधात जाऊ शकत नाही कारण केवळ इराण साठी ते आपल्या व्यापाराचा नक्कीच बळी देऊ शकत नाहीत.
इराण इस्राईल युद्धात रुस चा सुद्धा फायदा होईल, या युद्धामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किमती वाढतील त्यामुळे रुस ची आमदनी नक्कीच वाढेल.
या युद्धात रुस ला आर्थिक फायदे भरपूर आहेत, या युद्धामुळे जर तेलाच्या किमती वाढल्या तर रुस ला आर्थिक फायदा होणार आहे.
israil-iran conflict:तर पाकिस्तान इस्राईल वरती परमाणू हल्ला करेल?
या सोबतच रुस मध्य पूर्वेत स्वतःला एक पीस मेकर म्हणून सुद्धा घेऊ शकतो.पण असे दिसून येते कि अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या बयानतुन असे वाटते कि ते रुस च्या बाबतीत हे होऊ देणार नाहीत.
डोनाल्ड ट्रम्प इराण वरती येवढा दबाव आणत आहेत कि ते रुस ला मध्यस्ती नक्कीच करू देणार नाहीत.
आणि या युद्धात जर इराण कमजोर पडला तर रुस चे नुकसान सुद्धा आहे.कारण या युद्धात जर इराण हरला तर मध्य पूर्वेत रुस चा बिलकुल दबदबा राहणार नाही आणि मध्य पूर्वेत सर्व दबदबा इस्राईल आणि अमेरिकेचा असेल.
मागील सहा महिन्यात सिरिया मध्ये जे घडले त्याने मध्य पूर्वेत रुस ची जागा कमजोर केली आहे.मागील डिसेंबर महिन्यात सिरियाचे राष्ट्रपती ‘बशर अल असद’ ला सिरिया सोडून पाळावे लागले होते. तेव्हा रुस ने ‘बशर अल असद’ ला शरण दिली होती.
इस्राईल इराण युद्धात रुस ला जेवढे नुकसान आणि फायदे आहेत तेवढेच अमेरिकेला सुद्धा आहे,कारण इराण अमेरिकेच्या आर्मी बेस वरती सुद्धा हमला करू शकतो.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विदेशी धोरणा मुळे त्यांच्या विरोधात युरोपीय युनियन जाण्याची श्यक्यता आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांचे बयान नेहमी बदलत असतात, आणि डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेला संपूर्ण जगाच्या विरोधात नेत आहेत. त्यामुळे असे दिसून येत आहे कि जर इराण ने अमेरिके आर्मी बेस वरती हल्ला केला तर अमेरिका नक्कीच इराण वरती हल्ला करेल पण जागतिक पातळीवर अमेरिकेला सुद्धा विरोध होईल.
इराण इस्राईल युद्धात इराण नक्कीच कमजोर पडेल आणि इस्राईल ची जीत होईल पण हे युद्ध युक्रेन आणि रुस सारखे जर लांबले तर, इराण ला पुन्हा एकदा इतिहासाला सामोरे जावे लागेल. इराण इराक मध्ये जे युद्ध झालं होत ते तब्बल आठ वर्षे चालू होत.