इस्राईल च्या मोसाद विषयी सर्वांनाच माहित आहे.इस्राईल ची मोसाद अशी आहे ती आपल्या शत्रूला जगाच्या कोणत्याही देश्यात जाऊन संपवते.
अश्याच एका मोसाद च्या एका ऑपेरेशन ची कहाणी ज्याने संपूर्ण जग अचंबित झाले. स्थान होते यूंगाडा देश आणि काही आतंकवाद्यांनी एक विमान हैजाक केले. त्यामध्ये 90 इस्राईली नागरिक होते
आतंकवाद्यांना या नागरिकांच्या बदल्यात इस्राईल कडे जे आतंकवादी होते ते मागितले होते.
तर बघूया ऑपेरेशन थंडरबोल्ड.
विमान आतंकवाद्याच्या ताब्यात
तारीख होती 27जून 1976 रविवार चा दिवस होता. इस्राईल ची राजधानी तेल अविव च्या ‘बेन गरियन ‘ आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक विमान पॅरिस ला जाण्यासाठी निघाले.
पण मधात ग्रीस ची राजधानी ‘एथेन्स ‘ मध्ये उतरले. जेव्हा एथेन्स मधून विमान निघाले तेव्हा विमानात एक मोठी गडबड झाली. विमानाचे पायलट यांनी एक मोठा आवाज एकाला. त्यांनी एका इंजिनिअर ला आवाजाच्या च्या दिशेने पाठवले. इंजिनिअर ने जेव्हा कॉकपीट चा दरवाजा उघडला तेव्हा समोर एक वेक्ती होती. त्या वेक्ती कडे बघून त्या इंजिनिअर साहेबाचा पार थरकाप उडाला कारण त्या वेक्ती च्या हातात एक रिवाल्वर आणि दुसऱ्या हातात एक हाता बॉम्ब होता.
त्या आतंकी सोबत एक महिला सुद्धा होती. दोघे जण कॉकपीट च्या आत मध्ये घुसले आणि विमान आपल्या ताब्यात घेतले.
त्यांनी विमान लिबि्याकडे वळवण्याचे सांगितले. विमान दिशा बदलून दुसरीकडे जात होते पण नेमके कोठे जाणार हे कोणालाच माहित नव्हते.
काही तासानंतर विमान एका एअरपोर्ट वरती उतरले. जेव्हा विमान उतरले आणि विमानाचा दरवाजा उघडला तेव्हा त्या दरवाज्यातून एक भला मोठा एक वेक्ती विमानाच्या आत मध्ये आला.
जेव्हा ती वेक्ती विमानात आली तेव्हा काही प्रवाश्यांच्या लक्ष्यात आले कि विमान हे युगांडा देशात आहे. कारण विमानात येणारी ती वेक्ती दुसरी कोणी नसून युगांडा देशाचा सनकी राष्ट्रपती यदी अमीन होता.
इदी अमीन ने लोकांना सांगितले आम्ही तुम्हाला सोडण्याव साठी सर्व प्रयन्त करू.

OPERATION THUNDERBOLT
पण प्रवश्यापुढे प्रश्न हा होता कि विमान हाईजाक कोणी केले? तर विमान हाईजाक केले होते जर्मनी ची आतंकी संघटना (RZ)’रिवोल्युशनरी सेल्स’ आणि दुसरी आतंकी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ फिलिस्तिन ‘या दोन आतंकी संघटनानी मिळून हे विमान हाईजाक केले होते.
त्यांचा उद्देश होता त्यांचे 51माणसे सोडवने ज्यामधून 40इस्राईल च्या ताब्यात होते. हाईजाक झालेले विमान युगांडा देश्याच्या ‘एतांबे ‘विमान तळावर उतरले होते.
इकडे इस्राईल सरकार परेशान झाले होते. आणि इस्राईल च्या पॉलिसी नुसार ते आतंकवाद्या सोबत बातचीत करू शकत न्हवते. पण या वेळेला परिस्तिथी खूप वेगळी होती. विमाना मध्ये जवळपास 90 इस्राईली नागरिक होते.
त्या हॉस्टेज झालेल्या लोकांच्या परिवाराचा सरकार वरती दबाव वाढत होता. कारण त्यांना कोणत्याही परिस्तिथीत आपले लोक जिवंत पाहिजे होते. त्यामुळे सरकार ला आतंकवाद्या सोबत बोलणे करावेच लागले.
इस्राईल कडे दोन दिवसाचा वेळ होता कारण आतंकवाद्यानी धमकी दिली होती दोन दिवसात जर त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर ते लोकांना मारायला सुरवात करतील.
या दोन दिवसात आतंकवाद्यानी आणखी एक काम केले. इस्राईली नागरिकांना बाकीच्या लोकांपासून वेगळे केले. आणि जे इस्राईली न्हवते त्यांना सोडून दिले.
इस्राईल सरकार त्यांच्या वरती आरोप करत होते कि ते फक्त यहूदी लोकांना टार्गेट करत आहेत. आणि ते काही अंशी खरे सुद्धा होते.
पण इकडे जनतेचा सरकार वरती दबाव जरा जास्तच वाढत होता. त्याच वेळेला इस्राईल सेना ने एक आपत्कालीन मिटिंग बोलावली आणि रेस्क्यू ओपॅरेशन विषयी चर्चा केली.
पण इस्राईल पसून युगांडा देश साडे चार हजार किमी दूर आहे. आणि इतक्या दूर ऑपेरेशन करणे सोपे न्हवते आणि शक्यही न्हवते. आनि महत्वाचे म्हणजे विमान कोणत्या ठिकाणी आहे हे इस्राईल च्या सेनेला माहित सुद्धा न्हवते.
मोसाद ची योजना
खूप विचार केल्या नंतर एका ऑपेरेशन विषयी ठरले. ऑपेरेशन ची योजना अश्या प्रकारे होती कि इस्राईली कमांडोना युगांडा च्या ‘विक्टोरिया झील ‘ मध्ये ड्रॉप करायचे आणि यानंतर नेव्ही कमांडो आतंकवाद्याना मारतील.
पण त्यामध्ये प्रश्न असा उपस्तित होता कि इसराईल च्या नागरिकांना वापस कसे आणायचे? कारण युगांडा चा राष्ट्रपती इदी अमीन हा उघड पणे आतंकवाद्या सोबत होता.
त्यासाठी इस्राईल ने इदी अमीन ला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मिश्र देशाचे राष्ट्रपती अन्वर साधात ने इदी अमीन सोबत बोलणे केले. इतकंच काय पण यासर आराफत त्याकाळी फिलिस्तिन चे सर्वात मोठे नेते होते त्यांनी सुद्धा इदी अमीन ला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याने कोणाचे ही ऐकले नाही.
इस्राईल ने इदी अमीन ला एक प्रस्थावं सुद्धा दिला कि इदी अमीन ने इस्राईल ला मदत केली तर त्याला शांत तेचा नोबेल दिला जाईल. पण इदी अमीन ने सर्व प्रस्ताव पायदळी तुडवले.
इदी अमीन च्या मदती शिवाय हे ऑपेरेशन शक्य न्हवते म्हणून हे ओपॅरेशन रद्द केले.
या पुढची माहिती आपण भाग 2मध्ये बघू