bharat bandh protest strike9 julaiजुलै रोजी भारत बंद, काय उघडे राहील आणि काय बंद राहील? सर्वकाही जाणून घ्या
9 जुलै 2025 बुधवार या दिवशी संपूर्ण भारत बंद आहे.
बँकिंग, टपाल सेवा, खाणकाम, उत्पादन आणि वाहतूक यासारख्या सरकारी क्षेत्रातील 25करोड कर्मचारी 9 जुलै ला संपावरती जाणार आहेत. या दरम्यान काय उघडे राहील आणि काय बंद राहील?संपूर्ण माहिती.

bharat bandh protest strike9 बुधवारी 9जुलै रोजी संपूर्ण भारत बंद ची हाक देण्यात आली आहे.आणि या मध्ये 25 करोड पेक्ष्या जास्त कर्मचारी संपावर जाणार आहेत ज्या मध्ये बँकिंग, टपाल सेवा, खाणकाम, उत्पादन आणि वाहतुककर्मचारी आहेत.
भारत बंद मध्ये सार्वजनिक सेवा मध्ये अडथळा येण्याची शक्यता आहे.आणि या भारत बंद मुळे बँकिंग सेवा मध्ये सुद्धा याचा असर दिसून येणार आहे.
bharat bandh protest
शाळा आणि प्रायव्हेट ऑफिस चालू राहण्याची शक्यता आहे.या मध्ये प्रश्न असा उपस्तितीत होतो कि कर्मचाऱ्यांनी 9 जुलैला च का संप केला आहे?त्यांची काय मागणी आहे? आणि त्यांचे काय प्रश्न आहेत?
देशातल्या 10ट्रेड यूनियन ने एका संयुक्त संपाची हाक दिली आहे.AITUC,HMS,CITU,INTUC,INUTUC, TUCC,SEWA, AICCTU,LPF,आणि UTUC या कामगार संघटनानी संप पुकारला आहे.तसेच संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी कामगार आघाडी या शेतकऱ्यांच्या संघटनानी सुद्धा या संपला पाठिंबा दिला आहे.त्या मुळे देश्याच्या कांनाकोपऱ्यातून या संपला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
बंद का पुकारण्यात आला
bharat bandh protest strike9 कामगार संघटनानी केंद्रीय कामगार मंत्री मनसूख मांडवीया यांच्याकडे 17 प्रमुख मागण्या मान्य करण्यात याव्या अशी मागणी केली होती.पण केंद्र सरकार कडून त्यांना कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. त्याच मुळे 9 जुलै रोजी भारत बंद ची हाक देण्यात आली.असे कामगार संघटनानी म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणारी वार्षिक कामगार परिषद गेल्या 10वर्ष्यात घेण्यात आली नाही.त्याच वेळी सरकार ने चार कामगार कायदे अमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले.त्याच मुळे भविष्यात कामगार संघटना खिळखिळ्या करण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला.
या सेवावर होणार बंद चा परिणाम
हिंद मजदूर सभेचे हरभजन सिहं सिद्धू यांनी पिटीआय सोबत बोलताना म्हटले आहे कि, या राष्ट्रवादी बंद चा बँकिंग सेवा,राज्य परिवहन सेवा,टपाल सेवा,आणि कोळसा खान आणि कारखाने प्रभावित होतील.
बँकिंग सेवा रिझर्व बँक ऑफ इंडिया ने या पार्शवभूमीवर कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा केली नाही. मात्र बँक कर्मचारी या संपात सहभागी झाल्यास बँक सेवा वरती याचा परिणाम दिसून येऊ शकतो.
कोळसा खाण आणि कारखाने -कोळसा आणि कोळश्या वेतिरिक्त इतर खनिज कारखाने आणि संघटना देखील या संपात सहभागी होतील.या मध्ये केवळ सेवा मधेच नाही तर कोळश्यावर अवलंबून असल्यालेल्या इतर सेवावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो.
याशिवाय शाळा कॉलेज, खाजगी कार्यालय आणि बाजार आदिवरही संपाचा परिणाम होईल.महत्वाचे म्हणजे,या बंद मध्ये भारतीय मजदूर संघ, ही देश्यातील एक मोठी कामगार संघटना भाग घेणार नाही.
टपाल सेवा या देशव्यापी संपाचा भारतीय टपाल सेवेवर परिणाम होऊ शकतो.या मुळे विविध प्रकारची कागदपत्रे लोकांच्या घरी पोहचवायस विलंब होऊ शकतो.
राज्य परिवहन सेवा या संपमुळे देश्यातील सार्वजनिक वाहतूक वेवस्तेवर परिणाम होऊ शकतो, या संदर्भात राज्य सरकार कडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.मात्र वाहतूक वेवस्तेत मोठा वेत्यय येण्याची श्यक्यता संघटनेच्या निवेदनातं सांगण्यात आले आहे.
भारत बंद मुळे रेल्वे सेवावर परिणाम होईल का?
9जुलै रोजी होणाऱ्या देशव्यापी रेल्वे संपबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण देश्याच्या अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने आणि रस्ते अडथळे येण्याची श्यक्यता वर्तविण्यात येणार आहे. काही भागात रेल्वे सेवामध्ये विलंब किंवा वेत्यय येण्याची श्यकता वर्तविण्यात आली आहे.Hindi controeversy in maharstra :आपल्या घरात तर कुत्रा सुद्धा वाघ असतो “,.BJP च्या खासदाराणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना दिले आव्हान