The Balochistan story :बलोचिस्थान इतिहास आणि संघर्ष
पाकिस्तान म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येतो तो आतंकवाद. पाकिस्तान काश्मीर मध्ये जो आतंकवाद पेरतो ते संपूर्ण जग बघतच असते. आणि हाच आतंकवाद बलोचीस्तान मध्ये सुद्धा पेरत असतो.
आज आपण बघणार आहोत The Balochistan story and historyबलोचीस्तान विषयी मागील सत्तर वर्षांपासून बलोच पाकिस्तान च्या ताब्यात आहे. तेथील बलोच लोकांना पाकिस्तान सरकार कडून काहीही अर्थसाहाय्य भेटत नाही. उलट पाकिस्तान सरकार कडून त्यांना प्रताडीत केले जाते.
पाकिस्तान ने बलोचीस्तान वरती कब्जा कसा केला
भारत पाकिस्तान विभाजन झाले तेव्हा बलोचीस्तान चे सुद्धा विभाजन झाले होते. बलोचीस्तान 11ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य झाला होता. विभाजन झाल्यानंतर 255,दिवस बलोचीस्तान एक स्वतंत्र देश होता.
1948मध्ये ऑल इंडिया रेडिओ वरती एका प्रसारणा मुळे जिन्ना ला बलुचिस्तान घेण्याची संधी भेटली. पाकिस्तान च्या मध्ये भागी असा एक भाग होता ज्याला स्वातंत्र्य ठेवण्यासाठी मोहम्मद आली जिन्ना ने वकालत केली होती. तो भाग होता कलात. 27मार्च 1948 कलात मध्ये खान मिर अहमद खान होते. सकाळी ठीक 9वाजता ऑल इंडिया रेडिओ वरती एक प्रसारण होत होते. तेव्हा खान मिर अहमद खान यांच्या पायाखालची जमीन सरकली. बातमी होती भारताने त्यांच्या रियासात विलंय चा प्रस्ताव नकाराला होता.
मुद्दा हा न्हवता कि भारताने प्रस्ताव नकाराला. पण मोठी समस्या ही होती कि पाकिस्तान ने सुद्धा ही बातमी ऐकली होती. आणि दुसऱ्याच दिवशी. पाकिस्तान आर्मी ने खान रियासतीवर धावा बोलला. कलात ला स्वातंत्र्य ठेवण्याचा मुद्दा मातीत मिळाला. कलात पाकिस्तान च्या बलुचिस्तान प्रांता मध्ये एक रियासात होती. विभाजना वेळेस खान सल्तनत ने स्वतःला स्वातंत्र्य घोषित केले होते. पण नंतर पाकिस्तान ने त्यांच्यावर कब्जा केला.
प्रत्येक वर्षी 2मार्च ला बलोचीस्तान मध्ये मध्ये बलोच संस्कृती वाचवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. बलोच संस्कृती पाकिस्तान पाकिस्तान संस्कृती पेक्ष्या वेगळी आहे.
बलोचीस्तान एक स्वातंत्र्य राष्ट्र होते
ज्याला आपण बलोचीस्तान नावाने ओळखतो त्यामध्ये चार रियासते होती. कलात, खरान, लास बेला, मकरान. 1870मध्ये इंग्रजानी कलात च्या खान सल्तनत सोबत एक करार केला. ज्यामुळे ही रियासात इंग्रजाच्या आधीन गेली. तरी सुद्धा इंग्रजाचा यांच्यावर कंट्रोल न्हवता.
या रियासतीची हालत जवळपास भूतान सारखीच होती.रुस आक्रमण करेल या भीतीने इंग्रजानी एक सैन्य तुकडी इथे नेहमी असायची. पण इंग्रज या प्रशासनात कोणतीही दखल देत न्हवते. जेव्हा विभाजनाची वेळ आली तेव्हा इंग्रजानी भूतान आणि सिक्कीम सारखी कॅटेगिरी इथे लावली. बलोचीस्तान च्या बाकी रियासात पाकिस्तान च्या बाजूने होत्या. पण कलात पाकिस्तान च्या बाजूने जायला तयार न्हवते. खान मिर अहमद खान स्वातंत्र्य राहणार होते.The Balochistan story and history
1946पासूनच त्यांनी प्रयत्न सुरु केले होते 1946साली कॅबिनेट मिशन जेव्हा भारतात आले तेव्हा खान मिर अहमद खान यांनी आपला एक वकील भारतात पाठवला होता. आणि हा वकील होता मोहम्मद आली जिन्ना.
जिन्ना आणि मिर अहमद यांची खूप मैत्री होती. मिर अहमद यांनी मुस्लिम लीग ला भरपूर पैसा दिला होता. जिन्ना ने सुद्धा खान सोबतची मैत्री पूर्ण केली होती. भारतात येऊन 1946ला जिन्ना ने कलात चा प्रश्न ठेवला होता. तेव्हा जिन्ना म्हणाला होता. “विभाजन करताना कलात ला स्वातंत्र्य देश म्हणून घोषित केले पाहिजे कारण ‘कलात करार ‘ हा ब्रिटिश इंडिया सरकार ने न करता ‘ब्रिटिश क्राऊन ‘ने केला होता.
त्या वेतिरिक्त मिर अहमद ने ‘समद खान ‘नावाचा एक बलोच नेता दिल्लीला पाठवला होता. समद खान ने जवाहरलाल नेहरु यांची भेट घेतली. पण नेहरू यांनी कलात ला स्वातंत्र्य असण्यासाठी नकार दिला.
त्यानंतर काही महिन्यांनी कलात ची एक डिलिगेशन दिल्ली मध्ये आली या वेळेला ‘कलात स्टेट नेशनल पार्टी ‘ चे अध्यक्ष गौस बक्ष ने मौलाना अबुल कलाम आजाद यांची भेट घेतली. आजाद यांच्या म्हणण्यानुसार भारत आणि पाकिस्तान चे विभाजन झाल्या नंतर कलात रियासात ही स्वातंत्र्य राहु शकत नाही.
जिन्ना बलोचीस्तान च्या बाजूने वकील होता. सर्व प्रयत्न फसल्यानंतर कलात चे खान मिर स्वतःहा दिल्ली मध्ये आले होते. 4ऑगस्ट 1947ला दिल्ली मध्ये राउंड टेबल मिटिंग होती. या मिटिंग मध्ये जिन्ना आणि लॉर्ड माउंटबेटन सुद्धा होते. आणि या मिटिंग मध्ये ठरले होते कि कलात हा एक स्वतंत्र देश असेल. या मध्ये खरान, लॉस बेला सुद्धा विलंय होतील. त्यानंतर एका आठवड्यात 11ऑगस्ट 1947ला मुस्लिम लीग आणि कलात यांच्यात एका घोषणा पत्रावर हस्ताक्षर करण्यात आले. त्यामध्ये असे म्हटले होते कि कलात ची आपली एक वेगळी ओळख आहे. आणि मुस्लिम लीग कलात च्या स्वातंत्र्याचा सन्मान करेल.
15ऑगस्ट ला भारत स्वातंत्र्य झाला आणि याच्या पहिलेच कलात ने स्वतःला स्वातंत्र्य म्हणून घोषित केले होते. मिर अहमद यांनी लगेच कलात मध्ये संसद गठन केले होते.
या मध्ये दोन पार्लमेंट होते. उच्च सदन चे नाव होते ‘दारूल उमराह ‘आणि खालच्या सदन चे नाव होते ‘दारूल आवाम ‘दोन्ही सदन मध्ये स्वातंत्र्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आणि घोषणा केली कि पाकिस्तान सोबत त्यांचे संबधं मैत्रीचे असतील.
पाकिस्तान नावाचा देश सुद्धा नवीन झाला होता. पण आणि जिन्ना या मध्ये वेस्थ होता. पण 21ऑगस्ट 1947 साली एक घटना घडली आणि सर्व उलटे घडायला सुरवात झाली.
बलोच वरती जिन्ना ची नजर
बलोचीस्तान मध्ये चार रियासते होती. या मध्ये एक खरान रियासात होती. त्याचे शासक मिर मुहम्मद हबीबुल्ला ने जिन्ना ला एक पत्र लिहले होते. त्या मध्ये होते.
“माझी सल्तनत कलात च्या कब्जात जाणार नाही. आणि गेली तर आम्ही याचा भरपूर विरोध करू “.
हे पत्र म्हणजे खरान ला कलात मध्ये राहायचे नसून पाकिस्तान च्या बाजूने जायचे असा याचा अर्थ होत होता. त्यानंतर लॉस बेला, मकरान यांनी सुद्धा पाकिस्तान मध्ये जाण्याचा सुर लावायला सुरवात केली होती.
balochistan
BALOCH ARMY
कलात वरती दबाव जास्तच वाढत होता.ऑक्टोबर मध्ये जिन्ना ने सुद्धा कलात विरोधात बोलायला सुरवात केली होती. आणि यानंतर मिर खान यांनी सुद्धा त्यांच्या दारूला आवाम मधून जिन्ना ला उत्तर दिले.
“अफगाणिस्तान आणि इराण सारखीच आमची सुद्धा वेगळी संस्कृती आहे. आणि ती संस्कृती पाकिस्तान पेक्षा खूप वेगळी आहे. केवळ मुसलमान असल्यामुळे आम्ही पाकिस्तानी होऊ शकत नाही. आणि असे असेल तर इराण आणि अफगाणिस्तान ला सुद्धा पाकिस्तान मध्ये विलंय व्हावं लागेल.”
ऑल इंडिया रेडिओ वरील ती बातमी
जिन्ना चे संपूर्ण लक्ष काश्मीर, जुनागढ आणि हैद्राबाद वरती होते. 17मार्च 1948मध्ये खरान, लॉस बेला, यांचा पाकिस्तान मध्ये विलंय झाला. म्हणजे बलोचीस्तान च्या एक तिहाई हिस्यावर पाकिस्तान ने कब्जा केला होता. त्यानंतर जिन्ना चे संपूर्ण लक्ष कलात वरती होते.
27मार्च 1928 ऑल इंडिया रेडिओ वरती एक प्रसारण होत होते. केंद्रीय सचिव विपी मेनन यांनी म्हटले होते. कलात चे खान भारताच्या बाजूने आहेत. पण मेनन चे म्हणणे होते “यात भारताला काहीही देणंघेणं नाही “. त्या वेळेला मेनन हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सोबत होते. आणि भारतातील रियासते भारताच्या बाजूने आणण्याचे काम करत होते.
ऑपेरेशन ‘रेथ ऑफ गोड ‘:ज्यामुळे इस्राईल चे दुश्मन आज सुद्धा घाबरतात.
baloch history
कलात मध्ये खान जेव्हा हे भाषण ऐकत होता तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन हादरून गेली होती. कारण खान ला माहित होते. आता पाकिस्तान शांत बसणार नाही. इकडे भारतात सुद्धा या बातमी मुळे वेगळे अर्थ निघत होते.
दुसऱ्या दिवशी हे वातावरण शांत करण्यासाठी एक बयान दिले. आणि त्यांनी सांगितले अश्या प्रकारे कोणतेही बयान दिले नाही.
Story of Balochistan
Baloch History
पण यानंतर सुद्धा जे नुकसान होणार होते ते नुकसान झाले.
28मार्च ला जिन्ना ने पाकिस्तानी आर्मिला कलात वर चढाई करण्याचा आदेश दिला. त्यानंतर कलात च्या खान ला पाकिस्तानी सेनाने अटक केली आणि त्यांच्यावर दबाव टाकून विलय पत्रावर स्वाक्षरी घेतली.
अश्या प्रकारे 225दिवस स्वातंत्र्य राहून कलात वर पाकिस्तान ने कब्जा केला.