After bin Laden was killed, did local people occupy the Pakistan Presidential Palace?लादेन चा खात्मा झाल्या नंतर, स्थानिक लोकांनी पाकिस्तान राष्ट्रपती भवन वरती केला होता कब्जा?

After bin Laden was killed, did local people occupy the Pakistan Presidential Palace?लादेन चा खात्मा झाल्या नंतर, स्थानिक लोकांनी पाकिस्तान राष्ट्रपती भवन वरती केला होता कब्जा?

तारीख होती 2 मे 2011 जेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष news चॅनेल वरती होते, कारण या दिवशी ओसामा बिन लादेन नावाचा आतंकी मारला गेला होता आणि अमेरिकेचे राष्ट्रपती यांनी ही news दिली होती.

ओसामा बिन लादेन चा खात्मा कसा झाला यावर भरपूर पुस्तके आणि tv डिबेट झाली होती. चित्रपटातुन सुद्धा या वरती दाखवले गेले होते.पण ही घटना घडल्या नंतर पाकिस्तान मध्ये जी राजकीय अशांतता घडली होती त्यावर कदाचित कोणीही चर्चा केलेली नाहीये.

काही दिवसा पूर्वी पाकिस्तान मध्ये एक पुस्तकं प्रकाशित झाले त्या पुस्तका मध्ये यावर चर्चा करण्यात आली आहे.

2मे 2011 या दिवशी सकाळी साडे सहा वाजता पाकिस्तान चे राष्ट्रपती जरदारी चे एडीसी ने फरह तुल्ला बाबर याला फोन करून सांगितले कि एका बैठकी साठी राष्ट्रपती भवन मध्ये त्याने यावे.

या पुस्तकात लिहिले कि पाकिस्तानी राष्ट्रपती हे राष्ट्रपती भवनात दुपारी अकरा वाजता येत असतात.आणि इतक्या सकाळी म्हणजे सकाळी सहा साडे सहा ला बाबर याला बोलावले म्हणजे काही तरी भयंकर घटना घडली असणार असे लेखक बाबर यांना वाटले.

लेखक बाबर हे सांगतात कि इतक्या सकाळी मला बोलावले म्हणजे काही तरी मोठी घटना घडली आहे, हे मला माहित होते पण नेमकी कोणती घटना घडली असेल हे मला माहित न्हवते.

बाबर याने विदेश मंत्री हिन्ना रब्बानी यांच्याशी संपर्क साधला पण बाबर यांना कोणत्याही प्रकारे अंदाज आला नाही कि पाकिस्तान मध्ये कोणती मोठी घटना घाडली.

त्यानंतर बाबर याच्या मोबाईल वरती एक फोन आला होता. तो फोन होता कराची मधील एका पत्रकाराचा त्या पत्रकारचे नाव होते मजहर अब्बास.

पत्रकार मजहर अब्बास याने बाबर ला सांगितले, कि अमेरिका सरकार ला समजले होते कि ओसामा बिन लादेन हा आबाटाबाद मध्ये होता.त्या नंतर बाबर याने अंदाज लावायला सुरवात केली कि इतक्या सकाळी त्याला राष्ट्रपती भावनात का बोलावले.

सर्वात पहिले कोणाला माहिती मळाली

Nepal Gen Z protest :नेपाळ मधील आंदोलनाची संपूर्ण कहाणी

त्यानंतर फराहतुल्ला बाबर ला समजले कि राष्ट्रपती चे एडीसी चे लीडर जलाल राष्ट्रपती भवन मधून आल्या नंतर सुद्धा जागीच होते.कारण त्यांना माहित झाले होते कि रात्री अडीच वाजता एबाटाबाद मध्ये एक हेलिकॉपटर क्रॅश झाले होते.पाकिस्तान चे ते वायू सेनेचे पायलट असल्या मुळे त्यांना प्रश्न पडला कि एबाटाबाद च्या एवढ्या पहाडी जागेत हेलिकॉप्टर का उडत असेल?आणि पाकिस्तान मधील pपायलट ला रात्री हेलिकॉप्टर उडवण्याची बंदी होती.

त्याने विचार केला कि हे जर पाकिस्तानी हेलिकॉप्टर नाही तर मग हे हेलिकॉप्टर कोणाचे आहेत?याच विचाराने ते पुन्हा एकदा आपल्या ऑफिस मध्ये गेले.त्या वेळेला सकाळ चे तीन वाजले होते.त्यानंतर त्यांनी पाकिस्तान च्या वायू सेनेमधील काही अधिकाऱ्यांना फोन केला.

https://shorturl.bz/sTc

osama bin laden

राष्ट्रपती भावनातील जलाल हे पहिले वेक्ती होते ज्यांना या ऑपेरेशन बद्दल सर्व

कयानी च्या पायाखालची जमीन सरकली

जलाल याने ही बातमी कायानी याला सांगितली कारण जलाल याला माहित होते थोड्या वेळात राष्ट्रपती भवन मधली हॉटलाईन घंटी वाजणार आहे.

त्याने सूचना दिली कि सेनाअध्यक्ष कायानी हे राष्ट्रपती भवना कडे रवाना झाला आहे.आणि तत्या नंतर लेखकांने असे सांगितले कि अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा हे पाकिस्तानी राष्ट्रपती सोबत फोन वरती बोलले होते.

ओबामा चा झरदारी ला फोन

Operation Neptune Spear) 

ओबामा ने आपल्या पुस्तकात लिहिले कि पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारी ला फोन करून सांगणे ही खूप कठीण गोष्ट वाटत होती.

ओबामा यांनी लिहिले त्यांना वाटतं होते पाकिस्तानी राष्ट्रपती हे त्यांना पाकिस्तानी वायू सीमा उ्लंघन केले म्हणून काही बोलतील, पण असे न म्हणता त्यांनी पाकिस्तान सरकार हे अमेरिके सोबत आहे, आणि या ऑपरेशन ला पाकिस्तान सरकार सपोर्ट करते असे त्याने सांगितले.

आणि त्याने सांगितले त्याची पत्नी बेनझीर भुटो ला त्याच लोकांनी मारले ज्यांचा अल कायदा सोबत संबंध होता.

ऍडमिरल मलेन यांनी कायानी सोबत फोन वरती चर्चा केली

ओबामा यांनी पाकिस्तानी राष्ट्रपती यांना फोन लावायच्या पहिले. ऍडमिरल माईक मलेन यांनी कायानी सोबत फोन वरती बोलणे केले होते.ऍडमिरल मलेन यांनी कायानी याला सांगितले, अमेरिकेने ओसामा बिन लादेन याच्या राहत्या ठिकाणी हल्ला करून त्याला ठार केले आहे.

त्यानंतर लगेच आईएसआईएस च्या एका कर्नल ने आपल्या बॉस ला या ऑपरेशन बद्दल माहिती दिली.

cia चे प्रमुख लिओन पणेटा आपल्या पुस्तकात लिहितात. ही बातमी एकताच कायानी याचे पहिले वाक्य होते.चांगले झाले तुम्ही त्याला पकडले.त्यानंतर मलेन यांनी सांगितले लादेन ला पकडले नाही तर त्याला ठार केले, आणि लादेन हा मागील पाच वर्षा पासून एबटाबाद मध्ये राहत आहे. हे एकूण कायानी हा थोडा अचम्बीत झाला.

CIA आणि ISI मध्ये बातचीत

मलेन यांच्या फोन नंतर राष्ट्रपती ओबामा यांनी पाकिस्तानी राष्ट्रपती आणि अफगाण राष्ट्रपती यांना फोन लावला. पनेटा यांनी सुद्धा isi च्या प्रमुखांला फोन लावला आणि या विषयी बातचीत केली.

त्यानंतर पनेटा यांनी isi च्या प्रमुखांला अहमद शुजा पाशा ला फोन लावला.आणि पनेटा यांनी अहमद शुजा याला सांगितले हे जे ऑपरेशन झाले आहे या ऑपरेशन पासून आम्ही तुम्हाला मुद्दाम हुन दूर ठेवले होते.

त्यानंतर अहमद शुजा म्हणाला कि लादेन मारला गेला हे खूप चांगले झाले, जेव्हा अहमद शुजा असे म्हणाला तेव्हा त्याच्या बोलण्या मध्ये थोडा राग होता, कारण लादेन ला पाकिस्तान चा पूर्णपणे सहयोग होता.

त्यानंतर साकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटाला ओबामा यांनी टेलिव्हिजन वरती येऊन सांगितले, अल कायदा विरोधात पाकिस्तान आम्हाला सहयोग करेल.अशी अपेक्षा अमेरिका करतो आहे.

After bin Laden was killed, did local people occupy the Pakistan Presidential Palace?

Nepal Gen Z protest :नेपाळ मधील आंदोलनाची संपूर्ण कहाणी

Nepal Gen Z protest :नेपाळ मधील आंदोलनाची संपूर्ण कहाणी

भारताचा शेजारील देश नेपाळ हा खूप जास्त प्रमाणात जळतो आहे, त्या मागील कारणे काय आहेत आणि त्या मागील उद्देश काय आहे. आज या लेखात आपण बघणार आहोत.

नेपाळ मधील सरकार ने 26 सोशयल मीडिया ऍप्प वरती बंदी घातल्या नंतर नेपाळ मध्ये nepal gen z protest सुरु झाले.त्या नंतर हे आंदोलनाला वेगळे वळण लागले आणि भ्रष्टाचार च्या मुद्द्यावरून हे आंदोलन आणखीन जास्तच तापले गेले होते.नेपाळ चे पूर्व रक्षा मंत्री मिनेंद्र रिजाल यांनी सांगितले राजकीय लोकांची लापरवाही या मुळे हे आंदोलन हिंसक झाले.त्यांनी सांगितले या ‘जेन -जी ‘लोकांची ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हायला हव्यात.

tariff war :टॅरिफ म्हणजे काय आणि त्याची किंमत कोणाला मोजावी लागेल हे जाणून घ्या

रिजाल यांनी आंदोलनाचे केले समर्थन

डॉ रिजाल यांनी सांगितले सरकार ने लोकांचा विश्वास गमावला आहे.त्यांनी सांगितले या मागील उद्देश समजून घेणे आवश्यक आहे,. त्यांनी सांगितले मी ज्या पार्टी चा होतो त्यांना समजाऊ शकलो नाही, पण आता देश्याने समोर जायला हवे.

डॉ रिजाल यांनी सांगितले या आंदोलनाचा सन्मान करून आणि संविधानाचा सन्मान करून आम्हाला समोर जावे लागणार आहे, तरच देशाचा विकास होईल.त्यांनी हे सुद्धा सांगितले ही नवीन पिढी जर देशाचा विकास करत असेल तर नक्कीच आम्हा सर्वांना त्यांच्या मागे उभे राहावे लागणार आहे.

https://shorturl.bz/sTc

Nepal Gen Z protest

कोण आहे? सुदन गुरूंग

Nepal Gen Z protest नेपाल मधील आंदोलन इतके हिंसक झाले होते कि आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी नेपाळ चे पंतप्रधान’ केपी शर्मा ओली ‘ यांना राजीनामा द्यावा लागला होता.

त्यानंतर एक प्रश्न होता कि या आंदोलना मागे कोण आहे आणि हे आंदोलन इतके हिंसक झाले या मागे कोण आहे.ज्याने देशाची वेवस्था पूर्ण पणे बदलून टाकली होती.नेपाळ देशाची संपूर्ण राजकीय साखळी तोडून टाकणाऱ्या वेक्तीचे नाव आहे ‘सुदन गुरूंग ‘.

सुदन गुरूंग यांनी नेपाळ मधील लोकांना सांगितले आंदोलन कसे करायचे आणि याची आवश्यकता काय आहे.

36 वर्षीय गुरूंग यांनी एक रैली काढण्या साठी परमिशन घेतले होते.त्यांनी तेथील युवकांना आव्हाहन केले कि त्यांनी शाळेतील आणि कॉलेज मधील युनिफॉर्म घालून यावे आणि सोबत बॅग आणि पुस्तकं आणावेत, त्यांना शांतीपूर्ण पद्धतीने हे प्रोटेस्ट करायचे होते.

पण प्रश्न येतो हे 36वर्षीय गुरूंग कोण आहेत, 2015मध्ये नेपाळ मध्ये भूकंप आला होता, त्या नंतर एका NGO ची स्थापना झाली होती, त्या NGO चे नाव होते,’हामी नेपाळ ‘. त्या ngo चे अध्यक्ष आहेत ‘सुदन गुरूंग ‘.

नेपाळ मध्ये जो भूकंप आला होता. त्या भूकंपा मध्ये सुदन सुरुंग यांचे मुलं त्या मध्ये मारल्या गेले होते.त्या नंतर त्यांच्या जीवनात एक बदल झाला होता.

त्या नंतर त्यांनी हामी नेपाळ नावाची ngo स्थापन केली आणि नेपाळ मध्ये ते आणि त्यांची ngo काम करत होती.

संविधानात संशोधन व्हावे

आंदोलनात बऱ्याच मागण्या केल्या आहेत त्या मध्ये सर्वात महत्वाची मागणी ही आहे कि, सरकार ने संविधानात संशोधन करावे.आंदोलन करणाऱ्यांचे म्हणणे आहे, सरकार लोकांचा विश्वास गमावून बसली आहे.

त्यामुळे संविधान पुन्हा एकदा लिहावे, या मध्ये नागरिक आणि युवकांची भागीदारी असायला हवी आहे.अनंतरीम सरकार ची अवधी समाप्त झाल्या नंतर, नवीन निवडणुका व्हाव्यात आणि ह्या निवडणुका निपक्ष असायला हव्यात.

आंदोलकांनी याची सुद्धा मागणी केली आहे कि मागील तीन दशकात जो भ्रष्टाचार झाला आणि देश्यामध्ये जो पैसा खर्च झाला त्याची सुद्धा जांच व्हायला हवी आहे.

17सप्टेंबर राष्ट्रीय शोक दिवस

नेपाळ मधील नवीन सरकार सुशीला कार्की यांच्या कॅबिनेट ने नवीन आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे.त्या मध्ये त्यांनी ’17 सप्टेंबर ‘ हा दिवस राष्ट्रीय शोक दिवस म्हणून पाळला आहे.या आंदोलनात ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांना शाहिद चा दर्जा देण्यात आला आहे.त्या वेतिरिक्त ओली सरकार चे संपूर्ण निर्णय मोडीत काढण्यात आले आहेत.

नेपा मधील अति भ्रष्टाचार आणि नेपोटीझम मुळे हे आंदोलन झाले या मध्ये gen z युवकांनी नेपाळ मधील सरकार उलटून पाडले आहे. या आंदोलनामुळे नक्कीच नेपाळ देशाचा विकास होईल आणि नेपाळ सुद्धा चांगली प्रगती करेल. पण हे आंदोलन खरंच नेपाळ मधील युवकांनी केले का या मागे कोणता विदेशी हात आहे, कारण या पूर्वी श्री लंका, बांगलादेश आणि आता नेपाळ मध्ये सुद्धा आंदोलन झाली आणि सरकार उलटून पाडले आहे.

भारत देशाला सुद्धा या विदेशी ताकती पासून सावध राहावे लागणार आहे, कारण भारताचा होत असलेला विकास आणि भारताचे रशिया सोबत असलेले संबध या मुळे नक्कीच पश्चिम च्या डोळ्यात सलणारे आहेत.

Nepal Gen Z protest

putin -modi meeting :पुतीन यांनी pm मोदींना केला फोन, आलस्का मध्ये काय घडले?

putin -modi meeting :पुतीन यांनी pm मोदींना केला फोन, आलस्का मध्ये काय घडले?

रुस चे राष्ट्रपती पुतीन यांनी सोमवारी सायंकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला.त्यांनी आलस्का मध्ये ट्रम्प यांच्या सोबत झालेल्या मिटिंग विषयी सांगितलं.

putin -modi meeting

trump -putin meet :अलस्का मध्ये ट्रम्प आणि पुतीन यांची झाली भेट, भेटीत काय घडले

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना सांगितले युक्रेन सोबत शांतीपूर्ण समाधान काढावे.भारत या मध्ये सर्व प्रयत्ना सोबत असेल.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आलस्का मध्ये झालेल्या बैठकीचा व्रत्तांत दिल्या बद्दल पुतीन यांना धन्यवाद दिला.दोन्ही नेत्यांनी भारत आणि रुस चे संबंध आणखीन सुधरवण्यासाठी काय केले पाहिजे यावर सुद्धा चर्चा केली.

रुस चे राष्ट्रपती पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ड्रम्प यांनी 15ऑगस्ट ला तीन घंटे बातचीत केली होती.त्यांची ही मीटिंग युक्रेन युद्ध संपवण्यासाठी होती. पण या मिटिंग मध्ये काहीही घडले नाही.

https://shorturl.bz/sTc

ट्रम्प यांनी सांगितले होते पुतीन सोबत मिटिंग चांगली झाली होती.

पुतीन यांची भेट घेतल्या नंतर ट्रम्प यांनी सांगितले कि पुतीन यांच्याशी झालेली मिटिंग खूप खूप चांगल्या प्रकारे झाली.दोन्ही ही नेते भरपूर गोष्टी वरती सहमत होते पण कोणत्याही प्रकारे या दोघा मध्ये डील झालेली नाही.ट्रम्प यांनी सांगितले कोणताही समझोता तेव्हाच होईल जेव्हा अंतिम निर्णय होईल.

putin -modi meeting

ट्रम्प यांनी या बैठकीला दहा पैकी दहा मार्क दिले, तर पुतीन यांनी सांगितले रशियाची सुरक्षा महत्वाची आहे.त्यांनी पुढची मिटिंग मास्को ला व्हावी असे सांगितले.

जेल्सकी यांनी मोदींना फोन केला होता.

युक्रेन चे राष्ट्रपती जेल्सकी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता.pm मोदींना 12 ऑगस्ट ला फोन केला होता आणि याची माहिती जेल्सकी यांनी x वरती दिली होती.त्यांनी सांगितले भारताचे पंतप्रधान मोदी यांच्या सोबत जास्त वेळ बोललो आणि वेश्विक कुटनीती आणि द्विपक्षीय सहयोग यावर खूप चर्चा केली.

जेल्सकी यांनी युक्रेन वर झालेल्या रुस हल्ल्या विषयी सुद्धा सांगितले.त्यांनी सांगितले pm मोदींना रुसी हल्ल्या विषयी सुद्धा सांगितले.खासकरून बस स्टॅन्ड वरती झालेल्या हल्ल्या विषयी सुद्धा सांगितले.

युक्रेन चे राष्ट्रपती जेलन्सकी यांनी सांगितले भारत हा शांती पर्यासाला समर्थन देतो.

पुतीन नि सांगितले भारत आणि रुस चे संबंध मजबूत राहतील.

pm नरेंद्र मोदी यांनी रुस चे राष्ट्रपती पुतीन यांच्या सोबत शुक्रवारी फोन वरती चर्चा केली होती.ट्रम्प यांच्या टेरीफ वरती सुद्धा चर्चा करण्यात आली. त्या नंतर पुतीन यांनी म्हटले भारत आणि रुस चे समंध आणखीन मजबूत राहतील.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वरती सांगितले पूतीन सोबत खूप वेळ चर्चा झाली.त्यांनी सांगितले युक्रेन युद्धाची माहिती दिल्या बद्दल रुसी राष्ट्रपती पुतीन यांना धन्यवाद सुद्धा केला.

putin -modi meeting

trump -putin meet :अलस्का मध्ये ट्रम्प आणि पुतीन यांची झाली भेट, भेटीत काय घडले

trump -putin meet :अलस्का मध्ये ट्रम्प आणि पुतीन यांची झाली भेट, भेटीत काय घडले

trump -putin meet :अलस्का मध्ये ट्रम्प आणि पुतीन यांची झाली भेट, भेटीत काय घडले

trump -putin meet राष्ट्रपती पुतीन आणि अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची अलस्का मध्ये भेट झाली.ही भेट तीन घंटे होती, पण या भेटीत युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध विराम विषयी कोणतीही सहमती झाली नाही.

trump -putin meet

पुतीन यांनी संघर्ष संपवण्याची बोलणी केली पण महत्वाचे कारण दूर ठेवण्यात आले आणि पुढची भेट मास्को मध्ये असेल असे सांगितले.

या भेटीदरम्यान पत्रकारांचे प्रश्न घेतले नाही.

terrorist asif munir :असिफ मुनीर वर्दी मधला आतंकवादी

सुरवातीला रुसी राष्ट्रपती पुतीन आणि अमेरिकी राष्ट्रपती ट्रम्प यांच्यात बातचीत होणार होती पण त्या नंतर शेवटच्या क्षणी बदलावं झाला आणि थ्री ऑन थ्री मुलकात झाली, म्हणजे दोन्ही राष्ट्रपती सोबत दोन दोन सलाहकार होते.

अमेरिकेकडून अमेरिकेचे विदेश मंत्री ‘मार्को रुबीओ ‘आणि स्टिव्ह विटकोफ हे होते.तसेच रुस कडून विदेश मंत्री ‘सर्गेई’ आणि विदेश नीती सलहकार’ युरी ‘हे होते.

या सर्व चर्चे मध्ये एक महत्वाची बाब ही होती कि या मध्ये युक्रेन चे ‘राष्ट्रपती जेलन्सकी’ किंवा युक्रेन देशाचा एखादा प्रतिनिधी असे कोणीही न्हवते.

युक्रेन चे राष्ट्रपती जेल्सकी यांनी या भेटी पूर्वी सांगितले होते या भेटी मध्ये ‘युद्ध विरामचा’ कोणताही संकेत दिसत नाही.

मूळ कारण समाप्त करा युद्ध संपेल -पुतीन

अलस्का मध्ये तीन घंटे मिटिंग चालू होते या मध्ये रशियन राष्ट्रपती पुतीन यांनी सांगितले, युक्रेन मध्ये जो ‘संघर्ष ‘चालू आहे तो जर संपला तर रुस सुद्धा संघर्ष संपवेल आणि ‘रुस च्या इमानदारी ‘वरती कोणीही शंका घेऊ शकत नाही.

https://shorturl.bz/sTc

trump -putin meet

राष्ट्रपती पुतीन यांनी सांगितले युद्ध एक त्रासदी आहे पण या युद्धात जे मूळ कारण आहे ते जर संपले तर युद्ध सुद्धा नक्कीच संपेल.

राष्ट्रपती पुतीन यांनी सांगितले कि या मिटिंग मध्ये जर युक्रेन किंवा युरोप ने काही बाधा आणू नये कारण हा एक शांती समझोता आहे.आणि त्यांनी हे सुद्धा सांगितले ही मिटिंग म्हणजे युद्ध समाधानासाठी एक ‘स्टार्टींग पॉईंट ‘आहे.

पुतीन यांनी ट्रम्प सोबतचे आपलें संबंध हे वेवसायिक असल्याचे सांगितले.आणि त्यांनी हे सुद्धा सांगितले जर 2020च्या निवडणुकीत ट्रम्प हे विजयी झाले असते तर नक्कीच हे युद्ध सुरु झाले नसते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले दोघां मध्ये भरपूर मुद्द्यावरती सहमती झाली पण काही मुद्दे असे आहेत जे आणखीन सुद्धा बाकी आहेत.

त्यांनी हे सुद्धा म्हटले जो पर्यंत एखादा समझोता होत नाही तो पर्यंत कोणताही समझोता होत नाही.

अमेरिकी राष्ट्रपती च्या म्हनन्या नुसार या मिटिंग मध्ये प्रगती झाली आहे. पण संघर्ष विराम पर्यंत आम्ही आतापर्यंत पोहचलो नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले ते नाटो आणि जेलन्सकी यांच्या सोबत बातचीत करणार आहेत.त्यांनी सांगितले या संघर्ष्याचा शेवटचा फैसला त्यांच्यात हातात आहे.

ट्रम्प यांनी या सर्व मिटिंग चा शेवट पुतीन यांना धन्यवाद देऊन केला आणि रुसी राष्ट्रपती पुतीन यांना, व्लादमीर म्हटले. त्यांनी सांगितले आम्ही पुन्हा एकदा नक्कीच भेटू आणि लवकर पुन्हा एकदा मिटिंग करू.त्यानंतर पुतीन यांनी इंग्लिश मध्ये सांगितले या नंतर आपण मास्को मध्ये भेटू.

त्या नंतर दोन्ही नेते पत्रकारां समोर आले आणि त्यांनी काही फोटो दिले त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एक दुसऱ्याला हात मिळवले, काही पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही नेत्यांनी पत्रकारांना नजर अंदाज केले आणि मंच्याकापासून दूर गेले.

trump -putin meet

terrorist asif munir :असिफ मुनीर वर्दी मधला आतंकवादी

terrorist asif munir :असिफ मुनीर वर्दी मधला आतंकवादी

पाकिस्तान चा सेना प्रमुख असिफ मुनीर सध्या अमेरिकेच्या च्या दौऱ्यावर आहे.आणि या दौऱ्या मध्ये असताना त्याने भारता विरुद्ध खूप गरळ ओकली आहे आणि भारताला परमाणू हल्ल्याची गीदड धमकी दिली आहे.

terrorist asif munir

असिफ मुनीर हा एक वर्दी मधला आतंकवादी आहे.असे विधान पेंटांगण चे पूर्व अधिकारी मायकल रुबीन दिले आहे. आणि हे खरे सुद्धा आहे. कारण पाकिस्तान ची जुनीच सवय आहे. काहीही झाले कि पाकिस्तान परमाणू ची गिदड भपकी देतो, पाकिस्तान मध्ये जेवढे सुद्धा सेना प्रमुख झाले त्यांनी नेहमी आतंकवाद्यांना सपोर्ट केला आहे.

पाकिस्तान एक जगातील असा देश आहे जो आतंकवाद्याना पोसतो खरं तर पाकिस्तानी सेना ही एक प्रकारची आतंकवादी संघटना आहे. आणि त्याचे प्रमुख हे वर्दी मधले आतंकवादी आहेत. पाकिस्तान चा इतिहास आहे पाकिस्तान ने नेहमी आतंकवाद्यांना सपोर्ट करून शेजारील देश्याना परेशान केले आहे.

बांगलादेश युद्धा मध्ये सुद्धा पाकिस्तान च्या सेनेने खूप प्रमाणात बांगलादेश मधील म्हणजे त्या वेळच्या पाकिस्तान मधील आम नागरिकांना मारले आणि त्यांच्यावर खूप आत्याच्यार केले. बांगलादेश मध्ये जेव्हा पाकिस्तान आर्मीने अत्याचाराचा कळस ओलांडला तेव्हा भारत मदतीला गेला आणि एक नवीन देश बांगलादेश झाला.

आज पाकिस्तान सेना ही बालुचिस्तान मध्ये हेच करते आहे. तेथील लोकांवर खूप प्रमाणात आत्याच्यार करते. खरं तर सुरवाती पासून बालुचिस्तान हा एक स्वातंत्र्य देश होता. पण जिन्ना च्या गद्दारी मुळे बालुचिस्तान वरती पाकिस्तान ने कब्जा केला आणि आतापर्यंत तो भाग पाकिस्तान च्या घास्यात आहे. आज सुद्धा पाकिस्तानी सेना बलूच लोकांवर अन्याय आणि अत्याचार करते. आणि या मागे आज पाकिस्तान चा वर्ती मधला आतंकवादी असिफ मुनीर आहे.

पेंटांगण चे पूर्व अधिकारी मायकल रुबीन यांनी सुद्धा एक बयान दिले तत्यांनी म्हटले आहे असिफ मुनीर हा वर्दी मधला ओसामा बिन लादेन आहे.आणि त्यांनी केलेली ही टिपणी असिफ मुनीर च्या परमाणू हल्ल्याच्या धमकी नंतर आली आहे.

terrorist asif munir

पेनटांगण चे पूर्व अधिकारी मायकल रुबीन यांनी हे सुद्धा म्हटले आहे कि पाकिस्तान एक ‘दृष्ट देश आहे ‘.

मायाकल रुबीन यांनी सांगितले पाकिस्तान कडे परमाणू आहे, आणि असिफ मुनीर सारखा आतंकवादी जर पाकिस्तान चा सेना प्रमुख असेल तर पाकिस्तान मधला परमाणू बॉम्ब हा सुरक्षित हातात नाही, आणि अमेरिके मध्ये जाऊन संपूर्ण जगाला जर असिफ मुनीर परमाणू ची धमकी देत असेल तर हे संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे.त्यांनी हे सुद्धा सांगितले पाकिस्तान देशाला आतंकवादी देश्याच्या सूचित टाकायला पाहिजे.

असिफ मुनीर एक अवंछीत वेक्ती घोषित व्हयला पाहिजे असेही ते म्हणाले.

tariff war :टॅरिफ म्हणजे काय आणि त्याची किंमत कोणाला मोजावी लागेल हे जाणून घ्या

terrorist asif munir

पाकिस्तान आणि चीन चे संबध खूप चांगले होते, पाकिस्तान आणि चीन हे एक दुसऱ्याला भाऊ भाऊ म्हणत होते. आणि हे ही खरे आहे कि पाकिस्तान ला चीन ने खूप प्रमाणात लुटले आहे, पाकिस्तान ची अवस्था खूप वाईट करण्यात चीन चा खूप मोठा हात आहे. आता पाकिस्तान चिन ला सोडून अमेरिकेकडे गेला आहे, आणि भारताला धमकवण्याचा प्रयत्न करत आहे. पण पाकिस्तान हे विसरून गेला आहे कि भारता कडे सुद्धा परमाणू आहे आणि तो पाकिस्तान पेक्ष्या जास्त ताकतवर आहे.

अमेरिकेने सद्या भारतावरती टेरीफ लावले आहे आणि त्याचे कारण सांगितले आहे कि भारत रुस कडून तेल घेतो म्हणून हे टेरीफ लावले आहे. पण रुस कडून केवळ भारत तेल घेत नाही तर चायना सुद्धा घेतो आणि भारता पेक्ष्या जास्त प्रमाणात घेतो, रुस सोबत अमेरिका आणि काही युरोप मधील देश सुद्धा आयात करतात.

अमेरिकेला भीती आहे येणाऱ्या काळात भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थवेवस्था होणार आहे. आणि त्या अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि भारताचा सर्वात मोठा दुश्मन असिफ मुनीर ला अमेरिकेत बोलावले आहे. पण आतंकवादी असिफ मुनीर ला माहित आहे कि भारत हा खूप शक्तिशाली देश आहे. कारण ऑपरेशन सिंदूर वेळेस संपूर्ण पाकिस्तान ला हे कळून चुकले कि भारत हा पूर्वी सारखा देश नाही तर नवीन भारत आहे, जो घरात घुसून मारतो, त्या मुळे भारताला परमाणू ची धमकी देण्यात काहीही अर्थ नाही.

https://shorturl.bz/sTc

अमेरिके ने भारता विरुद्ध जाऊन असिफ मुनीर ला बोलावले पण अमेरिकेने मागील इतिहास एकदा बघावा कारण ओसामा बिन लादेन ला खत पाणी घालनारी अमेरिका होती आणि त्याच ओसामा ने अमेरिके मध्ये आतंकवादी हल्ला केला होता. आज अमेरिका तीच चूक करत आहे. आतंकवादी असिफ मुनीर ला खत पाणी घालून.

terrorist asif munir

tariff war :टॅरिफ म्हणजे काय आणि त्याची किंमत कोणाला मोजावी लागेल हे जाणून घ्या

tariff war :टॅरिफ म्हणजे काय आणि त्याची किंमत कोणाला मोजावी लागेल हे जाणून.

अमेरिकेने आतापर्यंत भारतावर आहे 50 टक्के टेरीफ लावले आहे.

tariff war

भारतावरील नवीन टेरीफ 27ऑगस्ट ला चालू होतील.

25%अतिरिक्त टेरीफ अमेरिकेन भारता वरती लावले आणि त्याचे कारण सांगताना त्यांनी सांगितले कि भारत रुस कडून तेल आयात करतो त्या मुळे हे टेरीफ लावण्यात आले आहे.

पण भारताने ट्रम्प यांच्या या आरोपाला फेटाळून लावले आहे.आणि भारताने हे सुद्धा सांगितले युरोप आणि अमेरिका हे सुद्धा रुस सोबत व्यापार करतात.ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशा नुसार अतिरिक्त टेरीफ हे 21दिवसा नंतर लागू होणार.

भारताच्या विदेश मंत्रालयाने सांगितले ट्रम्प यांचे हे टेरीफ म्हणजे तर्कहीन आणि अविचारी आहेत.व्हाईट हाऊस मध्ये सांगितले कि भारत हा रुस कडून प्रत्येक्ष किंवा अप्रत्येक्ष रित्या तेल घेतो आहे त्यामुळे भारतावरती हे टेरीफ लावले आहेत.

tariff war टेरीफ काय असते आणि ते कसे काम करते

टेरीफ एक टॅक्स असतो आणि तो विदेशा मधून जे सामान आणले असते त्या सामानावर लावलेला असते. 10%टेरीफ म्हणजे एखाद्या वस्तूची किमत जर 100रुपये असेल तर त्यावर 10रुपये टेरीफ असेल तर त्या वस्तूची किंमत 110रुपये होते.

भारतावर टेरीफ का?

अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार जर काही देश्यावर टेरीफ लावले तर अमेरिकी नागरिक स्वदेश्यातील प्रोडक्ट वापरतील आणि त्या मुळे अमेरिकेला त्याचा फायदा होईल.

tariff war

त्याच्या म्हणण्यानुसार जर आयात केलेल्या सामनावर टेरीफ जर लावले तर ते सामान अमेरिकेत तयार होईल आणि त्या मुळे अमेरिकेच्या लोकांना फायदा होईल. पण याचे कारण हे आहे का दुसरेच काहीतरी आहे हे समजावे लागेल.

Nuclear bunker Switzerland:जगात सर्वात जास्त आण्विक बंकर स्वित्झर्लंड मध्ये का आहेत?

मागील काही महिन्या पासून भारत आणि अमेरिके मध्ये टेरीफ वरून वाद चालू आहे आणि या वादा मध्ये अमेरिकेने भारता पेक्ष्या पाकिस्तान ला महत्व दिले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे आहे येणाऱ्या काळात भारत पाकिस्तान कडून तेल विकत घेईल.

अमेरिकेला भीती आहे कि येणाऱ्या काळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थवेवस्था होणार आहे त्या मुळे अमेरिकाला भारताची भीती आहे. आशिया खंडात चीन ही सर्वात मोठी अर्थवेवस्था आहे आणि भारत जर तिसरी सर्वात मोठी अर्थवेवस्था झाला तर जगात सर्वात मोठ्या दोन अर्थ वेवस्था ह्या आशिया खंडातील होतील आणि त्या मुळे अमेरिके चा जो पावर आहे तो आशिया खंडात विभागुण जाईल त्या मुळे अमेरिकेला भारताची भीती आहे.

चीन हा रशिया कडून सर्वात जास्त तेल घेतो आहे तरी सुद्धा अमेरिकेने भारता वरती टेरीफ लावले आहे. या मागचं दुसरं सुद्धा कारण हे आहे कि भारत रुस कडून तेला वेतिरिक्त हत्यार सुद्धा घेतो. अमेरिकि राष्ट्रपती यांनी भारताला त्यांचे हत्यार घेण्याची ऑफर दिली होती पण ती भारताने स्वीकारली नाही. रुस सोबत केवळ भारतच व्यापार करत नाही तर अमेरिका आणि युरोप मधील काही राष्ट सुद्धा व्यापार करत आहे. त्या मुळे tariff war भारता सोबत का?

https://shorturl.bz/sTc

अमेरिकि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या या सनकी निर्णयामुळे कदाचित येणाऱ्या काळात भारत आणि अमेरिकेचे संबंध खराब होऊ शकतात. मागील वीस वर्ष्यात भारत आणि अमेरिकेचे संबंध खूप चांगले झाले होते पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुळे ते संबंध बिघडण्याची श्यक्यता जास्त प्रमाणात दिसते आहे. आणि याला जिम्मेदार डोनाल्ड ट्रम्प आहेत.

tariff war

Nuclear bunker Switzerland:जगात सर्वात जास्त आण्विक बंकर स्वित्झर्लंड मध्ये का आहेत?

Nuclear bunker Switzerland:जगात सर्वात जास्त आण्विक बंकर स्वित्झर्लंड मध्ये का आहेत?

जर तुम्हाला शांती हवी असेल तर, तुम्हाला युद्ध करण्यासाठी तयार राहावे लागेल. ही जगातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आणि आजच्या काळात जर आपण डोकावून पहिले, तर नक्कीच ही बाब महत्वाची ठरते.

आज आपण पाहणार आहोत युरोप देश्यातील एक असा देश ज्या देश्यामध्ये खूप जास्त प्रमाणात Nuclear bunker आहेत आणि त्या देशाचे नाव आहे स्वित्झर्लंड.

जर तुम्हाला शांती हवी असेल तर, तुम्हाला युद्ध करण्यासाठी तयार राहावे लागेल.ही जी म्हण आहे ती नक्कीच स्वित्झर्लंड सारख्या देशाला तंतोतंत जुळवून येते.

स्विस आल्पस च्या एकदम मजबूत आणि कणखर पाहाडांना खोदले आहे.त्या मध्ये सेकडो परमाणू बंकर आणि नागरिक आणि सैन्या साठी सुरंगे सापडले आहेत.

या बंकराचे प्रवेश द्वार ढिगाऱ्या खाली आहे.इथे अश्या काही इमारती आहेत, त्या दिसायला एकदम साधारण घरा सारख्या आहेत.पण त्या कंक्रीट च्या भिंती आहेत.त्या मध्ये रायफल ठेवण्यासाठी जागा सुद्धा केल्या आहेत.

https://vishwmarathi.com/pahalgam-attack-2025/

Nuclear bunker Switzerland 88लाख लोकसंख्या असलेल्या स्वित्झर्लंड देशात सर्वात जास्त अन्विक बंकर आहेत, त्याची संख्या 3.7 लाख इतकी आहे.

स्वित्झर्लंड देशात 1963मध्ये एक कायदा पास झाला होता त्या नुसार जर परमाणू हल्ला झाला किंवा शेजारील देशा सोबत जर युद्ध झाल तर, नागरिकांना वाचवण्यासाठी बंकर बावण्याचे आदेश दिले गेले होते.

आणि या कायद्या नुसार प्रत्येक नागरिकाला बंकर बनवण्यासाठी सरकार कडून जमीन दिली जाते.https://shorturl.bz/sTc

या वेतिरिक्त हे बंकर त्या नागरिकांच्या घरपासून 30मिनिटाच्या अंतरावर असले पाहिजे, जर एकाद्या वेक्ती चे घर डोंगराळ भागात असेल तर त्या वेक्तीचे परमाणू बंकर एका तासाच्या अंतरावर असले पाहिजे.

स्वित्झर्लंड देशात अपार्मेंट मालकाला आपल्या सर्व नागरिकांसाठी परमाणू बंकर बनविणे अनिवार्य आहे.

देश्यातील नागरिक सुरक्षा कार्यालय चे म्हणणे आहे, जास्तीत जास्त नागरिक त्या अपार्मेंट मध्ये राहतात जिथे बंकर आहे, आणि जर एखाद्या अपार्मेंट मध्ये जर परमाणू बंकर नसेल तर त्यांना सार्वजनिक सुविधा दिली जाते.

हे बंकर आधुनिक सुविधाने लेस असतात आणि यांच्यावर कोणत्याही आधुनिक हत्याराने जर हमला केला तर बंकर वर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, एवढे ते मजबूत केलेले असतात.

नागरिक सुरक्षा विभागा नुसार हे बंकर कमीत कमी 10 टन वजन झेलतील एवढे ते मजबूत असतात.म्हणजे यांच्यावर एखादी इमारत सुद्धा पडली तरी हे त्या इमारतीच वजन सहन करू शकतात.

50 – 60वर्ष्या पूर्वी बनवले होते बंकर Nuclear bunker Switzerland

Nuclear bunker Switzerland

काही बंकर पन्नास ते साठ वर्ष्या पूर्वी बनवले होते आणि त्यांचा वापर झाला नाही म्हणून काही बंकर खराब झाले.

स्थानिक नागरिक असलेले काही लोक म्हणतात कि आम्ही स्वतःला सुरक्षित समजू शकत नाही, कारण संपूर्ण जगात भरपूर प्रमाणात विधवंसक हत्यार झाले आहेत. त्या मुळे आम्ही स्वतःला सुरक्षित समजू शकत नाही. जर कधी आमच्या देशावर हल्ला झाला तर भरपूर प्रमाणात लोकांचे प्राण जाऊ शकतात.

आजच्या काळातील जे ऍडव्हान्स हत्यार आहेत ते पन्नास वर्ष्या पूर्वी बनवलेल्या बंकर ला सहज निकामी करू शकतात.

आणि त्यामुळे तेथील सरकार त्या बंकर ला आधुनिक बनवत आहे.त्यासाठी सरकार ने 250मिलियन डॉलर चा फंड दिला आहे, त्या मुळे आपत्कालीन स्तिती मध्ये नक्कीच या बंकर चा उपयोग होईल.

तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, हे बंकर म्हणजे युद्धाची तयारी नसून, आपत्कालीन वेळेला याचा नक्कीच उपयोग होईल.

तेथील स्थानिक नागरीक म्हणतात हे बंकर बघून आम्हाला आनंद होतो कारण जर आमच्या देशावर परमाणू हल्ला झाला तर नक्कीच आम्ही आमच्या परिवाराला वाचवू शकतो.आज जगात जे होत आहे ते बघून नक्कीच असे वाटते कि स्वित्झर्लंड या देशात सुरक्षा खूप आहे. आणि ती प्रत्येक देशात आम नागरिकांसाठी असायला हवी आहे.

दुसऱ्या महायुद्धात जेव्हा जर्मनी मध्ये आणि संपूर्ण युरोप खंडात येहुदी लोकांना मारल्या जात होते तेव्हा, जर्मनी मध्ये हिटलर ने येहुदी लोकांना मारण्या साठी मोठं मोठे गॅस चे कॅम्प बनवले होते. तेव्हा तिथून जे येहूदि पळून आले होते त्यांना स्वित्झर्लंड मध्ये शरण दिली जात होती.

भारताची तयारी कुठं पर्यंत

Nuclear bunker Switzerland

आज संपूर्ण जगात युद्धाचे वातावरण चालू आहे. आणि या मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये सुद्धा तणावाचे वातावरण आहे. भारताने मागील सत्तर वर्ष्यात पाकिस्तान सोबत चार युद्ध लढले आणि जिंकले सुद्धा, पण मागील सत्तर वर्ष्यात सत्तेवर असणारे BJP आणि काँग्रेस सरकार यांनी कोणतीही सुविधा दिली नाही.

आपत्कालीन वेळेला भारतीय नागरिकांसाठी कोणतीही सुविधा नाही हे दुर्दैव आहे. किंवा येणारा काळ कसा असेल याचा विचार करण्याची क्षमता सरकार मध्ये नाही आणि विरोधकांमध्ये तर मुळीच नाही.

भारताला सुद्धा बदलणाऱ्या जगासोबत बदलावे लागेल, येथील नेत्यांनी केवळ आश्वासन द्यायचे आणि ते नागरिकांनी ऐकायचे असे किती दिवस चालणार आणि ते पूर्वीचे दिवस सुद्धा नाही हे सर्वच नेत्यांनी लक्ष्यात घ्यायला पाहिजे.

Nuclear bunker Switzerland

Bangladesh F-7BGI Crash :चिनी बनावटीचे लढाऊ विमान शाळेवर कसे आदळले? वैमानिक अपघात का रोखू शकला नाही?

Bangladesh F-7BGI Crash :चिनी बनावटीचे लढाऊ विमान शाळेवर कसे आदळले? वैमानिक अपघात का रोखू शकला नाही

बांगलादेश मध्ये लढाऊ विमान शाळेवर आदळले या मध्ये पायलट तौकीर इस्लाम सागर याचा मृत्यू झाला.जेव्हा विमान कोसळले तेव्हा पायलट सागर जिवंत होता, आणि त्याला वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला पण हॉस्पिटल मध्ये त्याचा मृत्यू झाला.

बांगलादेश मध्ये सोमवार 21जुलै ला एक मोठा अपघात झाला.ढाका च्या उत्तरे कडे एका शाळा आणि कॉलेज च्या परिसरात एक लडाकू विमान कोसळले.त्यानंतर बांगलादेश सेनेने एक बयान केले त्यामध्ये त्यांनी सांगितले फायटर जेट एका शाळेच्या वरती आदळले.या अपघातात 19लोक मारल्या गेले, आणि 150पेक्ष्या जास्त लोक घायाळ झाले.

बांगलादेश मीडिया च्या दाव्यानुसार हा हादसा एका ट्रेनिंग विमानाचा झाला आहे.माईलस्टोन स्कुल अँड कॉलेज च्या दोन मजली इमारतीत घुसून हा अपघात झाला.

Bangladesh F-7BGI Crash

जे लोक घायाळ झाले त्या मध्ये 60पेक्ष्या जास्त विदयार्थी आणि विदयार्थीनि होत्या.त्या वेतिरिक्त शिक्षक सुद्धा गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातात ट्रेनिंग विमानाचा पायलट सुद्धा मारला गेला.जेव्हा लढाऊ विमानाचा अपघात झाला तेव्हा पायलट जिवंत होता आणि गंभीर जखमी होता.

Bangladesh F-7BGI Crash

उडान भरल्या नंतर विमानाचा अपघात कसा झाला?

बांगलादेश च्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन (ISPR ) विभागाकडून प्रेस जारी केले त्या मध्ये त्यांनी सांगितले कि ‘ट्रेनिंग एअरक्राफ्ट ‘चा अपघात झाला आहे, आणि हे चिनी बनावटीचे F-7BGI लढाऊ विमान होते.या लढाऊ विमानाला बंगलादेशातील नवीन पायलट प्रशिक्षणा साठी ठेवले होते.

Bangladesh F-7BGI Crash:ढाका विमान दुर्घटणेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख वेक्त केले आहे. आणि बांगलादेश ला मदत करण्याचा विश्वास दिला.

सोमवारी या ट्रेनिंग जेट ला इस्लाम सागर उठवत होता.तो बांगलादेश वायुसेना च्या 35व्या स्क्वाड्रन चा हिस्सा होते.बांगलादेश न्यूज वेबसाईट नुसार सागर हे विमान उडवत होता, पण एका शाळेला धडकून हे विमान आदळले.

Bangladesh F-7BGI Crash

Pahalgam Attack 2025:पाकिस्तानी आतंकवादी संघटन TRF ला अमेरिकेने आतंकवादी संघटन घोषित केले,पहलगाम मध्ये 26 नागरिकांची केली होती हत्त्या

https://shorturl.bz/sTc

Pahalgam Attack 2025:पाकिस्तानी आतंकवादी संघटन TRF ला अमेरिकेने आतंकवादी संघटन घोषित केले,पहलगाम मध्ये 26 नागरिकांची केली होती हत्त्या

Pahalgam Attack 2025:पाकिस्तानी संघटन TRF ला अमेरिकेने आतंकवादी संघटन घोषित केले,पहलगाम मध्ये 26 नागरिकांची केली होती हत्त्या.

पाकिस्तान समर्थीत आतंकवादी संघटन लस्कर -ए -तैयबा सोबत असलेले आतंकवादी संघटन द रेजीस्टेन्स फ्रंट (TRF)ला अमेरिकेने आतंकवादी संघटन म्हणून घोषित केले आहे.

अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबीयो ने सांगितले ‘हे पाऊल म्हणजे पहलगाम मध्ये 26निर्दोष नागरिक मारले त्याचा न्याय आहे, आणि भारता सोबत सहयोग सुद्धा आहे.

विस्तारणे

अमेरिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे, पाकिस्तान मधील आतंकवादी संघटन लस्कर -ए -तैयबा सोबत असलेले आतंकवादी संघटन द रेजीस्टेन्स फ्रंट (TRF)ला अमेरिकेने विदेशी आतंकवादी संघटन म्हणून घोषित केले आहे.अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबीयो ने गुरुवारी ही माहिती दिली.

मार्को रुबीयो ने सांगितले ही कारवाई राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प कडून पहलगाम अंतकी हमल्याचा न्याय आहे असे सांगितले.

TRF हे आतंकवादी संघटन आहे जाने 22एप्रिल ला जम्मू काश्मीर मधील पहलगाम Pahalgam Attack 2025 मध्ये झालेल्या आतंकी हमल्याची जिम्मेदारी घेतली होती. या हल्ल्यात 26 नागरिक मारल्या गेले होते.

रुबीयो ने सांगितले हे भारता सोबतचे सहयोगाचे प्रमाण आहे.

अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबीयो ने सांगितले 2008 च्या मुंबई हमल्या नंतर, पहलगाम हा सर्वात मोठा भारतीय नागरिकांवर आतंकी हल्ला होता.

त्यांनी हे सुद्धा सांगितले ही लढाई अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा, आतंकवादी विरुद्ध लढाई, आणि भारता सोबत सहयोगाचे प्रमाण सुद्धा आहे.

या सोबत अमेरिकचे विदेश मंत्री मार्को रुबीयो यांनी हे सुद्धा सांगितले या आतंकवादी संघटनेला विशेष चिन्हित वैश्विक आतंकवादी संघटन म्हणून घोषित केले आहे.

TRF आणि त्यासोबत असलेले नाव LET च्या आतंकवादी सूची मध्ये टाकले गेले आहे.ते म्हणाले LET लस्कर ए तैयबा ला आतंकवादी संघटन म्हणून कायम ठेवले आहे.

Israel v Syria इस्राईल ने सिरियाई सेना मुख्यालय वरती हल्ला केला,पुन्हा एकदा युद्ध भडकणार?

TRF चा प्रमुख शेख सज्जाद गुल ला भारताची एजेंसी NIA ने पहलगाम हमल्याचा मास्टर माईंड सांगितले होते.

TRF ने भारतात भरपूर आतंकवादी हमले केले आहेत.ज्यामध्ये 2024ला सुरक्षा बलावर सुद्धा आतंकवादी हल्ला केला होता.

ऑपेरेशन सिंदूर

Pahalgam Attack 2025

जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये TRF च्या आतंकवादीसंघटनेने निहात्ते पर्यटकावर हल्ला केला होता.22एप्रिल ला झालेल्या या कायराना आतंकवादी हल्ल्यात 26 नागरिकांचे प्राण गेले होते.

त्यानंतर भारतीय सेने ने या हल्ल्याचे प्रतिउत्तर देण्यासाठी ऑपेरेशन सिंदूर सुरु केले.सहा आणि सात मे ला पाकिस्तान मधील नऊ आतंवादि ठिकाणावर हल्ले केले.

पहलगाम हल्ला झाल्या नंतर भारताने प्रतिउत्तर दिले आणि या सेने च्या कारवाई ला आतंकी घटनाचे उत्तर मानल्या गेले.

भारतीय सेना च्या कारवाई वेतिरिक्त भारताचे सात सर्वदलीय प्रतिमंडळ 33देश्याच्या दौऱ्यावर गेले होते, आणि पाकिस्तान ची सर्व पोल खोल केली.आणि संपूर्ण जगाला सांगितले पाकिस्तान हा आतंकवादी देश आहे.

पाकिस्तान मधील शहाबाज शरीफ सरकार कशी नाकाम आहे, हे संपूर्ण जगाला सांगितले.

https://shorturl.bz/sTc

Pahalgam Attack 2025

Israel v Syria इस्राईल ने सिरियाई सेना मुख्यालय वरती हल्ला केला,पुन्हा एकदा युद्ध भडकणार?

Israel v Syria इस्राईल ने सिरियाई सेना मुख्यालय वरती हल्ला केला,भारी नुकसान

Israel v Syria सिरिया मधील दक्षिण स्वेदा प्रांत मध्ये सुरक्षा बल आणि ड्रुज धार्मिक अल्पसंख्यक असलेले लोक यांच्या मधील संघर्ष विराम संपला आहे. त्या मुळे सिरिया मध्ये आणखी एकदा संघर्ष सुरु झाला आहे.

Israel v Syria

Israel v Syria

इस्राईल v सिरिया हा खूप जुना वाद आहे

दोन्ही समूहात युद्ध चालू असताना इस्राईल ने सिरियाच्यासेना मुख्यालय वरती हल्ला केला आहे.

इस्राईल ने बुधवारी सिरियाच्या सेना मुख्यालया वरती हल्ला केला आहे.हा हल्ला दमिस्क मधील रक्षा मंत्रालयाच्या जवळ केला आहे.काही रिपोर्ट नुसार हा हल्ला सिरियाच्या सेना मुख्यालय मध्ये झाला आहे. आणि भरपूर नुकसान सुद्धा झाले आहे.

https://shorturl.bz/sTc

इस्राईल डिफेन्स फोर्स ने x वरती लिहिले आहे.IDF ने सिरियाच्या दामिस्क क्षेत्रात सिरीयाई सरकार च्या सैन्य मुख्यालयावर हल्ला केला आहे.आणि ती या स्तिती वर नजर ठेऊन आहे.

Israel v Syria

सिरियाच्या दक्षिण भागात स्वेदा प्रांतात पुन्हा एकदा वातावरण तापले आहे.त्यानंतर सिरिया सुरक्षा बल आणि सिरिया च्या दक्षिण भागातील ड्रुग्स लोकांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे.सिरिया च्या सरकार ने ड्रुग्स लोकांवर्ती आरोप लावले आहेत कि यांनी संघर्ष विराम तोडला आहे.

सिरियाई सरकार ने सांगितले स्वेदा शहरांत सुरक्षा बल शांततेत काम करत आहेत.आणि तेथील निवासी लोकांची सुरक्षा आणि नुकसान थांबवण्यासाठी काम करत आहेत. जे लोक शहर सोडून गेले आहेत. त्यांनी घर वापसी करत आहेत.

बुधवारी सरकारी बल आणि ड्रुग्स लोकांमध्ये झडप झाली.आणि या मध्ये सुरक्षा बला तील सैनिकांची हत्त्या केली, त्यांच्या घराला आग लावण्यात आली.सुरक्षा बल सैनिकांच्या घरातील लोकांची सुद्धा हत्त्या केली.

काही रिपोर्ट नुसार या हल्ल्यात 30 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला या मध्ये दोन लहान मुलं सुद्धा आहेत.तसेच ब्रिटेन मध्ये असलेली संस्था AFHR ने सांगितले बुधवारी सकाळ पर्यंत 250पेक्ष्या जास्त लोक मारल्या गेले.ज्या मध्ये चार मुलं आणि पाच महिला सुद्धा आहेत.

Nimisha priya :यमन मध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाची फाशी रद्द

ड्रुग्स समुदाय इस्राईल च्या बाजूने?

इस्राईल मध्ये ड्रुग्स समुदायला एक इमानदार समुदाय मानले जाते.आणि ते इस्राईल सेना मध्ये सुद्धा आपली सेवा देतात.सिरियाच्या विदेश मंत्रालायाने सर्व देश्याना अपील केली कि ते सिरियाच्या संप्रभुत्वचा सन्मान करा, तसेच सिरियाच्या नागरिकांना सुद्धा सांगितले सिरिया मध्ये हिंसा बंद करा आणि देशात फूट टाकणाऱ्या लोकांना नाकाम करा.

असद सरकार चे पतन झाल्या नंतर इस्राईल ने सिरियाच्या नवीन नेत्यांच्या विरोधात आक्रमक पाऊल उचलले आहे.

इस्राईल ने सांगितले कि इस्राईल इस्लामिक आतंकवादी आपल्या सीमा पर्यंत सुद्धा येऊ देणार नाही.इस्राईल सेने ने ‘गोलन हाईट्स ‘सीमा वरती सिरिया च्या क्षेत्रावर जिथे संयुक्त राष्ट्रा ने बनवलेला बफर झोन वरती कब्जा केला आहे.आणि सिरियाच्या सैने ठिकाणावर हवाई हमले केले आहे.

Israel v Syria हा वाद खूप जुना आहे. या मध्ये इस्राईल ने सिरिया वरती भरपूर प्रमाणात हवाई हल्ले केले आहेत. इस्राईल ला सुद्धा इस्लामिक आतंकवादा पासून खूप त्रास झाला आहे. या आतंकवादी हल्ल्यात इस्राईल चे नागरिक खूप प्रमाणात मारल्या गेले आहेत.

Israel v Syria