अफगाणिस्तान मधील स्थानिक लोकांनी भरपूर वर्ष अमेरिकेचे समर्थन घेऊन सोवियत संघ विरोधात अभियान चालवले होते. अमेरिकेने सुद्धा त्यांना हत्यार आणि पैसे पुरविले होते. अमेरिकेचा यामागचा उद्देश होता की सोवियत रूस ने अफगाणिस्तान सोडून जावे.
Afagan war
clod war
अमेरिकेचा सुद्धा सोवियत संघ विरोधात एक मनसुबा होता. ते म्हणजे अमेरिकेसोबत जे व्हिएतनामध्ये झाले आणि अमेरिका व्हिएतनाम मध्ये हरली तीच गत अफगाणिस्तान मध्ये सोवियत रुस ची व्हावी. यासाठी अमेरिका खूप प्रयत्न करत होती. यासाठी अमेरिकेने ‘ऑपरेशन सायक्लोन’ सुद्धा सुरू केले. आणि अमेरिकन मीडियाने या ऑपरेशनला जगातील सर्वात गुप्त ऑपरेशन म्हणून सांगितले होते.
सोवियत संघाचे सैनिक जेव्हा वापस जात होते तेव्हा आठ वर्षाच्या अंतराने 1996 ला तालिबान ने काबुल वरती कब्जा केला. आणि अफगाणिस्तान वर एक ‘इस्लामी कट्टरपंथी निजाम’ आणला. नंतर संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली. कारण तालिबानने मानवधिकाराची उल्लंघन केले होते. त्यामुळे संपूर्ण जगात तालिबानची आलोचना होत होती.
त्यानंतर एक प्रश्न असा सुद्धा येतो की यामध्ये अमेरिकेचा हात होता का?
याची सुरुवात कशी झाली
वर्ष होते 1979 तात्कालीन सोवियत संघाचे 30000 पेक्षा जास्त सैनिक, लढाकू विमान ,आणि टॅंक हे अफगाणिस्तानच्या दिशेने रवाना झाले. ते काबुल मधील ‘क्रांतिकारी सरकारला’ मदत करण्यासाठी येत होते.
हे सर्व होण्याच्या पहिले एका वर्षाआधी अफगाणिस्तान मध्ये ‘सौर क्रांती’ झाली होती. त्यानंतर अफगाणिस्तान मध्ये साम्यवादी सरकार चे गठन झाले होते. पण त्या साम्यवादी सरकारला काही इस्लामी गटांचा विरोध होत होता. हे गट स्वतःला मुजाहिद्दीन समजत होते. त्यांना वाटत होते की जे विरोध करत आहे तो एक जिहाद आहे.
सोवियत संघाला वाटत होते अफगाणिस्तान मध्ये साम्यवादी सरकार टिकून राहावे पण राष्ट्रपती बबरक करमाल यांच्या सरकारच्या विरोधात मुज्जाहिद्दीनाची बगावत जास्त वाढत होती.
Bangladesh Crisis 2024:शेख हसीनाच्या पतनाचा आनंद साजरा करेल बांगलादेश, देश सोडला त्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी
अफगाणिस्तान मध्ये साम्यवादी सरकार होते त्यामुळे अमेरिका खूपच गोंधळलेल्या अवस्थेत होता खरंतर अमेरिका पन्नासच्या दशकापासून अफगाणिस्तान मध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत होता. 50 च्या दशकात सोवियत अफगाणिस्तान मध्ये विकास परियोजना करत होता तेव्हा सुद्धा अमेरिका सोवियत संघा सोबत प्रतिस्पर्धा करत होता.
civil war
या वेळेला तत्कालीन राष्ट्रपती ‘जिम्मी कार्टर’ ला त्यांचे नॅशनल सिक्युरिटी ॲडव्हायझर जबीगंन्यू ब्रेजेंसकी आणि बाकी सहकाऱ्यांनी त्यांना अफगाणिस्तान मध्ये गुप्ता अभियान सुरू करण्याचा सल्ला दिला. आणि नंतर अमेरिकेने बगावत करणाऱ्या मुजाहिदिनांना हत्यार आणि पैसा पाठवण्यासाठी प्रस्ताव ठेवला.
त्यानंतर शीत युद्धामध्ये आणखीन जास्त अमेरिकेने तेल ओतले आणि एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली . यामध्ये अमेरिका आणि रशिया आपला दबदबा संपूर्ण जगात व्हावा यासाठी प्रयत्न करत होते. दोघेही एकमेकांचे विरोधात प्रतिस्पर्धी होते पण हे दोन्ही देश आमने-सामने येऊन लढत नव्हते.
पण तिसऱ्या जगातील देशांमध्ये जी लढाई चालत होती त्यामध्ये ते आपल्या साथीदार देशाला मदत देत होते इंग्रजी भाषेत त्याला ‘प्रॉक्सिवार’ असे म्हणतात. अशाच प्रकारे अमेरिका अफगाणिस्तान मध्ये जिहाद्याना मदत पुरवत होता जे जिहादी सोवियत विरुद्ध लढत होते.
ऑपरेशन सायक्लोन
सुरुवातीला ऑपरेशन साइक्लॉन मध्ये विद्रोहींना सोवियत काळातील जुने हत्यार देण्यात आले. जसे की AK 47 आणि आरब देशातून त्यांना पैसे पुरविले जात. अमेरिकेने हे यासाठी केले की अमेरिका आपला सहभाग आहे हे दाखवत नव्हता. यामध्ये सौदी अरब देश सर्वात सक्रिय देश होता. यामध्ये मिश्र देशाचा अन्वर अल सदात आणि बाकी भरपूर नेत्यांनी सोवियत विरुद्ध मदत पाठवली होती.
यामध्ये पाकिस्तानची गुप्त यंत्रणा सुद्धा असायला पाहिजे असे अमेरिकेला वाटत होते.आणि इथूनच जीहादी गटांना ऑपरेट केले जात होते अमेरिका काँग्रेसचे सदस्य राहिलेले ‘हब आर रिज ‘ने 1988साली त्यांनी सांगितले कि त्यांनी ‘टेनिसी ‘ च्या केंटूकी मिलिटरी बेस वरती 700खचर पाठीवले होते. या खचरांना पाकिस्तान मध्ये पाठवायचे होते.
वाईट हाऊस मध्ये राष्ट्रपती रोनाल्ड रिगन आल्यानंतर अफगाणिस्तान मध्ये अमेरिकेचा हात आहे हे संपूर्ण जगाला समजले.
अमेरिकेमध्ये काही श्रीमंत लोकांनी मुजाहीद्दीनांना मदत करण्यासाठी सरकारकडे मागणी करत होते. या लोकांचे म्हणणे होते अफगाणिस्तान मध्ये केवळ शस्त्री पाठवून काम होणार नाही तर त्यापेक्षा मोठे पाऊल उचलले पाहिजे म्हणजे अमेरिकन आर्मीला अफगाणिस्तान मध्ये पाठवावे
1984 मध्ये अमेरिकी काँग्रेसने अफगाणिस्तान वरती एक प्रस्ताव पारित केला प्रस्तावामध्ये होते अफगाणिस्तान मधील मुजाहिद्दीन (अमेरिकेने यांना शिपाई म्हटले होते )त्यांना फक्त लढण्यासाठी शस्त्र आणि काही मदत पाठवणे पुरेसं होणार नाही तर यापेक्षा जास्त काही करावे लागेल.
रोनाल्ड रीगन यामध्ये इतके पुढे गेले की त्यांनी ओव्हल ऑफिसमध्ये मुजाहिद्दीन नेत्यांच्या प्रति मंत्रिमंडळासोबत मेजवानी सुद्धा केली.
1986 मध्ये स्टेट ऑफ द युनियनच्या भाषणात रीगन यांनी अफगान मुजाहिद्दीन यांना संदेश दिला ‘स्वातंत्र्याच्या शिपायांनो तुम्ही एकटे नाहीत अमेरिका तुमच्या सोबत आहे.’
त्यानंतर रिगन यांनी अफगाणिस्तान मध्ये असे काही केले की त्यांच्या बयाना पेक्षाही महत्त्वपूर्ण होते . त्यांनी अफगान मुजाहिदिनांना ‘स्टिंगर मिसाईल’ देण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय येणाऱ्या काळात खूप महत्त्वाचा ठरणार होता.
अमेरिकेच्या या मदतीमुळे अफगाणिस्तानी डोंगरदऱ्यामध्ये लपून बसत आणि सोवियत हेलिकॉप्टरना खाली पाडत असत त्यामुळे अफगाणिस्तान मधील समीकरण खूप जास्त प्रमाणात बदलत होते.
अफगाणिस्तान मध्ये फौज पाठवण्याच्या नऊ वर्षानंतर सप्टेंबर 1988 मध्ये सुवियत संघाचे नेता मिखाइल गोरबाचेव यांनी रशियन सेना वापस घेण्याचा निर्णय घेतला.
तालिबानला अमेरिकेच्या मदतीचा फायदा झाला?
अमेरिकेने तालिबान मोहिमेला समर्थन केले होते कारण अमेरिकेला त्याचा फायदा घ्यायचा होता पण काही थेरी च्या अनुसार ही वास्तविकता नाही.
1994 पर्यंत अफगाणिस्तानच्या दक्षिण शहर कंधार मध्ये तालिबान हे नाव सुद्धा लोकांनी ऐकले नव्हते ज्यांना तालिबान विषयी माहीत होते ते मदरशांमध्ये ट्रेन झालेले होते. हे पश्चतून समाजाचे लोक होते. ते स्वतःला तालिब (विध्यार्थी )म्हणतं होते. म्हणून यांची कंधार भागात लोकप्रियता वाढत होती.
तालीबान च्या उद्याया पर्यंत सोवियत संघांचे पतन झाले होते. पण हे सुद्धा सत्य आहे कि सोवियत विरोधात जे लढत होते नंतर ते तालीबान मध्ये आले. आणि यांना अमेरिकेचा पूर्ण पणे पाठिंबा होता.
सोवियत संघाला अफगाणिस्तान मधून हाकलून देणे हा अमेरिकेचा सर्वात मोठा हेतू होता. आणि अमेरिका त्या वेळेला ह्याना आतंकवादी म्हणतं न्हवती. कारण या मुळे अमेरिकेची बदनामी झाली असती. अल कायदा सारख्या आतंकवादी संघटनेला सुद्धा हे आतंकवादी मानत नव्हते.
अमेरिकेचा फायदा झाला का?
90 च्या दशकात अमेरिकेला हे समजले की संपूर्ण जगात अमेरिकेला टक्कर देणारा कोणीही नाही. पण समोरच्या काळात अमेरिकेसमोर चीन नावाचा दुश्मन होता.
अफगाणिस्तान मध्ये जे Afagan war गृह युद्ध होते त्या दरम्यान अमेरिकेने मुजाहीजद्दीनांना समर्थन दिले त्यांच्याकडून जे मानव अधिकार्याच्या उल्लंघन झाले तिकडे अमेरिकेने मुद्दामहून दुर्लक्ष केले.
तेव्हा संपूर्ण जगासमोर अमेरिकेचा दुपट्टीपणासमोर आला त्याच्या पहिले सुद्धा अमेरिकेचा जिथे फायदा झाला तिथे अमेरिकेने वाटेल ते केले.
खरंतर अफगाणिस्तानची जी आज अवस्था आहे त्याला पूर्णपणे अमेरिका जिम्मेदार आहे. जोपर्यंत अमेरिकेला अफगाण मुज्जाहीद्दीना कडून फायदा होत होता तो पर्यंत अमेरिकेने त्यांना आतणकवादी म्हटले नाही. इतकंच काय पण त्यांच्या कडून मानवधिकाराचे उ्लंघन सुद्धा झाले पण अमेरिकेने तिकडे कांना डोळा केला. ओसामा बिन लादेन ला सुद्धा अमेरिकेने घडवले होते. अश्या प्रकारे Afagan war अफगाणिस्तान मध्ये जो आतणकवाद पेरला गेला या मध्ये फक्त अमेरिकाच होती.