Operation Barbarossa :ऑपेरेशन बारबरोसा ज्याने हिटलर ला आत्महत्या करावी लागली

ऑगस्ट 1939:युरोप मध्ये दुसऱ्या महायुद्धचे वारे वाहत होते.

आणि यातच जर्मनी आणि सोवियत संघ यांच्यात एकमेकांवरती हल्ला न करण्याचा करार झाला होता. या कराराने संपूर्ण जग चकित झाले. कारण दोन्ही देशांचे वैचारिक मतभेद भरपूर होते आणि याच विचाराने काही देश चकित होते.

हिटलर ने जेव्हा पोलंड देशावरती हल्ला केला, तेव्हा सोवीयत रुस ने सुद्धा पोलंडच्या पश्चिम दिशेकडून हल्ला केला त्यानंतर पोलंड देशाचे विभाजन करून पोलंड चा काही भाग हिटलर ने व काही भाग स्टॅलिन कडे होता.

त्यानंतर एक ते दीड वर्ष जर्मनी आणि सोवीयत रुस यांच्या मध्ये चांगली मैत्री होती. दोन्ही देशानी एकमेकांना खूप अर्थसाहाय्य केल आणि या अर्थसाहाय्या मुळे नाझि जर्मनीला चांगलाच फायदा झाला.

सोवीयत रुस जर्मनीला अन्न आणि तेल निर्यात करत होता तर जर्मनी रुस ला तैयार झालेला माल पुरवत होती.

जर्मनीचा फ्रान्स वरती हल्ला

स्टॅलिन चा जेव्हा हिटलर ला सहयोग मिळाला तेव्हा हिटलर ने संपूर्ण ताकतीने युरोपभर आपला विस्तार करण्याची योजना आखली.

1940 ला हिटलर ने फ्रान्स वरती हल्ला करून फक्त पाच ते सहा आठवड्यात फ्रान्स ला पराभूत करून फ्रान्स वरती नाझी झेंडा फडकवला.

पण या विजयानंतर हिटलर ची महत्वकांक्षा जास्तच वाढली. आणि आता पूर्व दिशेला सुद्धा मोहीम आखाण्याची योजना बनवली. हिटलर चा पूर्वीपासूनच सोवियत रुस वरती नजर होती. हिटलर च्या मनात सुद्धा नेहमी विचार येत असे जपान जर सोवियत सारख्या विशालकाय देशाला हरवू शकतो तर आपण का नाही.

हिटलर ‘यहूदी बोल्षेवीकवाद ‘नष्ट करून ‘नाझी प्रभुत्व ‘लादन्याचा प्रयत्न करत होता.

हिटलर च्या नजरेत सोवियत रुस मधील “स्लाविक” जनता ही शूद्रच होती. त्या मुळे हिटलर सोवीयत जनतेला एकदम तुच्छ समजत असे.

ऑपेरेशन बारबरोसा

operation barbarossa

ती तारीख होती 18डिसेंबर 1940 हिटलर ने सोवियत संघा वरती हल्ला करण्याचा आदेश दिला आणि जर्मनीचा तानाशहा अडोल्फ हिटलर ने आपल्या जीवनतील सर्वात मोठी चूक केली.

हिटलर ची योजना होती उत्तरी रुस च्या अस्तरखान बंदरगाह पर्यंत हल्ला करायचा. या मुळे सोवियत च्या जास्तीत जास्त आबादीवर जर्मनीचा कब्जा होईल आणि जर्मनीच्या ताब्यात सोवियत संघाची भरपूर संपत्ती येईल.

22जून 1941 ला सोवियत संघावरती जर्मनीने हल्ला केला म्हणजे ‘ऑपेरेशन बारबरोसा’ सुरु झाले.

माध्यकाळात फ्रेड्रिक बारबरोसा नावाचा एक रोम सम्राट होऊन गेला त्याने जनतेवर खूप अन्याय अत्याचार केले.त्याने नाही नाही ते कर जनतेवर लादले आणि जनतेला खूप हाल हाल करून सोडले त्या अन्यायी सम्राटच्या नावारती हिटलर ने या ऑपेरेशन चे नाव ‘ऑपेरेशन बारबरोसा’ ठेवले.

तब्बल तीस लाख जर्मन सैनिकांनी सोवियत रुस वरती हल्ला केला.

हिटलर च्या या जर्मन सैनिकांकडे 3400टॅंक, 2700 लढाऊ विमान होते. इतिहासातील सर्वात ताकतवान ही फौज होती.

जर्मन सैनिक तीन जागी विभागले आणि सोवीयत रुस वरती हल्ला केला.

‘नॉर्थ आर्मीग्रुप ‘ला लेनिनगार्ड ताब्यात घेण्याचे काम दिले, ही बटालियन लात्विक, लिथुआनिया आणि एस्टोनिया वरती कब्जा करून, लेनीनगार्ड कडे जाईल असे ठरविले.

‘आर्मी ग्रुप साऊथ ‘ ला युक्रेन वरती हल्ला करण्याचे आदेश दिले.

आणि या दोन ग्रुप मध्ये होती ‘आर्मी ग्रुप सेंटर ‘या ग्रुप ला मीन्स्क, स्मोलेन्स्क आणि मास्को वरती कब्जा करण्याची जिम्मेदारी दिली. त्यांच्या योजने नुसार 10 दिवसात रुस वरती संपूर्ण कब्जा करायचा होता.

जर्मनीला बढत

स्टॅलिन सुद्धा हिटलर वरती विश्वास करत न्हवता पण हिटलर इतक्या लवकर हल्ला करेल असे स्टॅलिन ला वाटले न्हवते.

सोवीयत रुस कडे 50लाख सैनिक आणि 23000टॅंक होते पण एवढे असूनही रेड आर्मी या अचानक युद्धा साठी तयार न्हवती.

या युद्धात सुरवातीला जर्मन सेना खूप जोराने आणि आत्मविसाने लढत होती. त्यामुळे सोवियत रुस च्या रेड आर्मी ची धुळधान उडाली.

त्यानंतर सोवियत रुस ने हवाई हल्ले करायला सुरवात केली आणि जर्मन सैन्य मागे यायला लागले. त्यानंतर जर्मनीने सुद्धा हवाई हमले करायला सुरवात केली.आणि पुन्हा एकदा जर्मनीचा आत्मविश्वास वाढला. या मध्ये सोवियत रुस चे 1800लढाकू विमान निकामी केले.

‘आर्मी ग्रुप नॉर्थ ‘लेनिनग्राद ‘च्या दिशेने समोर जात होता. या भागात रुस आर्मी खूप कमी होती. जर्मन आर्मी ने फक्त तीन ते चार आठवड्यात 804km क्षेत्रावर कब्जा केला. जर्मन आर्मी लेनिनगार्ड पासून फक्त 96km दूर होती.

इकडे आर्मी ग्रुप सेंटर ने सुद्धा कमाल केली त्यांनी 28जून पर्यंत रुस च्या तिन्ही सेनाची घेराबंदी केली आणि ‘बियालिस्टॊक मीन्स्क पॉकेट ‘मध्ये रुस च्या तब्बल तीन लाख वीस हजार सैनिकांना ताब्यात घेतले. 27जुलै पर्यंत रुस चे आणखी तीन लाख सैने जर्मनीच्या ताब्यात आले. पण आर्मी ग्रुप साऊथ यांना सोवियत सैनिकांनी पुढे सरकू दिले नाही.

त्यानंतर 8आगस्ट ला जर्मन सैनिकांनी सोवियत च्या दोन तुकड्यांची घेरा बंदी केली आणि पुन्हा एकदा एक लाख सैनिकांना बंदी बनवलं.

कीव शहरावर जर्मन कब्जा

जर्मन सेना मोठ्या धिटाईने पुढे सरकत होती. विजय काही दिवसावर आला असे जर्मन सैनिकांना वाटत होते. पण त्यातच जर्मन आर्मीचे राशन संपत चालले होते, जर्मन सैनकांची अवस्था खूप वाईट झाली असती.

हे हिटलर ला जेव्हा समजले तेव्हा हिटलर ने मास्को शहराकडे न जाण्याचा

आदेश दिला. हिटलर ने उत्तर आणि दक्षिण मोर्च्यावर जाण्यासाठी जर्मनिहून आणखी सैने रवाना केले.

जर्मन सेना ही मास्को शहराच्या खूप जवळ पोहचली होती पण हिटलर ला मास्को पेक्ष्या युक्रेन महत्वाचे वाटत होते. कारण युक्रेन मध्ये भरपूर संसाधन होते.

आतापर्यन्त सोवीयत सेनेचा पूर्णपणे धुव्वा उडाला होता. सब्टेंबर च्या शेवटी शेवटी जर्मनीचा कीव शहरावर ताबा झाला होता. आणि तोपर्यंत जवळपास साडे सहा लाख सोवियत सैनिक जर्मनीच्या ताब्यात होते किंवा मारले गेले होते.

जर्मन सेना ‘काला सागर ‘किनाऱ्याच्या दिशेने समोर क्रिमियात घुसली त्यांनी ‘सेवस्टापूल ‘वरती ताबा मिळवला. त्यानंतर खारकोव सुद्धा जिंकले.

त्यानंतर जर्मन सेना खूप थकून गेली होती युद्धात त्यांचे भरपूर सैनिक मारले गेले होते. सब्टेंबर मध्ये लेनिनगार्ड बाकी रुस पासून वेगळे केले होते, पण रुस वरती ताबा मिळवू शकले नाहीत.

मास्को ची लढाई

त्यानंतर हिटलर ने मास्को युद्ध सुरु करण्याचे ठरविले. 2ऑक्टोबर ला ऑपेरेशन ‘टाइफुन ‘लॉंच केले. हिटलर चे मत होते आता रुसखूप कमजोर झाला आहे आणि त्यांची आर्मी मास्को शहराला सुद्धा वाचवू शकत नाही.

पण इकडे सोवीयत आर्मी एका नव्या जोशात तयार होत होती. जवळपास दहा लाख सैने मास्को वाचवण्यासाठी तयार होते. त्यांच्या कडे काही विमान आणि काही टॅंक शिल्लक होती.

मास्को युद्धात सुरवातीला जर्मन सेनेला यश मिळाल. जर्मन सेना जेव्हा मास्को शहराच्या जवळ गेली आणि निसर्गाने मास्को शहराला वाचवलं कारण अचानक हवामानत बदल झाला आणि पाऊस सुरु झाला. खूप जास्त पाऊस आल्याने संपूर्ण रस्त्याने चिखल झाला त्यामुळे जर्मन सैनिकांना समोर जाता येत न्हवते. घोड्याने ओढणाऱ्या गाड्या चिखलात फसल्या त्या मुळे जर्मन आर्मी माघार घ्यावी लागली आणि अश्या परिस्थिती लढण्याचा त्यांना अनुभव न्हवता.

नोव्हेंबर महिना आल्या नंतर जर्मन सेना पुन्हा एकदा मास्को तयारी साठी सज्ज झाली.

पाऊस थांबला होता आणि आणि आता जमीन कोरडी होत होती. इकडे सोवियत सेनेला तैयारी करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला होता.

पाच डिसेंबर ला सोवियत च्या रेड आर्मी ने अचानक जर्मन सैन्यवरती हल्ला केला. हा हल्ला एवढा होता कि जर्मन सेना झपाट्याने मागे जात होती. 1944 च्या उन्हाळ्या पर्यंत रुसी आर्मीने जर्मनीची धुळधान केली. आणि जास्तीत जास्त क्षेत्र जर्मनीच्या कब्जातून मोकळे केले.

हिटलर ची आत्महत्या

हिटलर ने सोवीयत संघावरती हल्ला करून आपल्याच पायावर्ती कुऱ्हाडी मारली. त्यानंतर सोवियत रुस ने आपली जमीन ताब्यात घेऊन बर्लीन शहरावरती आक्रमन केले.

त्यानंतर हिटलर बंकर मध्ये लपला आणि त्याला आत्महत्या करावी लागली.

8मे 1945 ला बर्लीन शरण आले आणि दुसरे महायुद्ध समाप्त झाले.

Operation Barbarossa

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *