नमस्कार मित्रानो आज आपण बघणार आहोत क्यूबा नावाच्या देशात अमेरिकेची झालेली फजिती आणि अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा CIA ची निकामी झालेली ताकत
“मी अमेरिकेचे आभार मानू इच्छितो की त्यांनी आमच्यावर हल्ला केला. या हल्ल्याने क्युबाला अमेरिकेच्या बरोबरीने आणले “
वर्ष होते 1959, क्युबामध्ये क्रांती झाली. फिदेल कास्ट्रो यांची गनिमी काव्याने लढणारी सेना ने बटीस्ता सरकार कोसळून टाकले.
क्यूबा चे अमेरिकी धार्जिन राष्ट्रपती बटीस्ता हे देश सोडून पळून गेले. राष्ट्रपती बटीस्ता हे अमेरिकेचे पपेट होते आणि त्यामुळे बटीस्ता यांचा कल अमेरिकेकडे होता.
पण त्या उलट फिदेल कास्ट्रो एक कम्युनिस्ट होते आणि साहजिकच त्यांचा कल हा सोवियत संघाकडे होता आणि शीतयुद्धच्या काळात सोवियत चा जो मित्र असे तो अमेरिकेचा दुश्मन असे.
1952 मध्ये क्यूबा मध्ये जो विद्रोह झाला त्या नंतर अमेरिकेच्या पाठिंब्याने बटीस्ता हे क्यूबा देशाचे राष्ट्रपती झाले. बटीस्ता हे सेना मध्ये जनरल पदावरती होते.
बटीस्ता हे सत्तेवरती आल्या नंतर क्यूबा मध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप खूप जास्त प्रमाणात वाढला होता. क्यूबा च्या शेतीवर अमेरिकी वेवसायिकांचा संपूर्ण कब्जा झाला होता. स्थानिक लोक फक्त शेतमजूर म्हणून राहिले होते.
बटीस्ता हे राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी मानमानी करायला सुरवात केली त्यांनी कोणत्याही प्रकारच्या आंदोलनावर बंदी आणली होती आणि त्या मुळे सरकार विरोधी आंदोलन सुद्धा कोणी करू शकत न्हवते ज्यांनी कोणी सरकार विरोधी बोलले त्याला बटीस्ता सरकार ने कायमच संपून टाकले.
त्या नंतर क्यूबा देशात पुन्हा एकदा क्रांतीचे वारे वाहू लागले आणि फिदेल कास्ट्रो यांनी क्रांती करून बटीस्ता यांचे सरकार पाडले आणि फिदेल कास्ट्रो सत्तेवर आले.आणि या मुळे अमेरिकेला चांगलाच झटका बसला.
फिदेल कास्ट्रो यांनी बटीस्ता ने जे कायदे बनवले होते त्या मध्ये बदल करून अमेरिकी अरबपती कडे जी जमीन होती ती संपूर्ण जमीन नॅशनलाईज केली.
फिदेल कास्ट्रो यांनी बटीस्ता समर्थकांना अटक करायला सुरवात केली. बटीस्ता समर्थक आणि अमेरिकी लोक देश सोडून गेले.
या मुळे अमेरिकी राष्ट्रपती डेविड आइज़नहावर चांगलेच परेशान झाले होते. आणि त्या वेळेला अमेरिका सुद्धा त्या प्रत्येक ठिकाणी लढण्यासाठी तयार होती जिथे कम्युनिस्ट मजबूत होत होता. त्यानंतर अमेरिकी राष्ट्रपती
डेविड आइज़नहावर यांनी अमेरिकी गुप्तचर यंत्रणा CIA ला कामाला लावलं. CIA ने जे क्यूबा मधून लोक पळून आले त्यांना क्यूबा विरोधात लढण्यासाठी तयार केले फ्लो्रीडा आणि ग्वाटेमाला मध्ये ट्रेनिंग कॅम्प सुरु केले.
जे ट्रेनिंग कॅम्प सुरु केले त्या तुकडीचे नाव होते ‘ब्रिगेड 2506’
आणि या वेळेला अमेरिकेमध्ये निवडणुका झाल्या आणि सत्तेवर नवीन युवा राष्ट्रपती आले ते होते जॉन एफ कॅनडी. कॅनडी यांनी फेब्रुवारी 1961 मध्ये क्यूबवरती हमला करण्याची मंजुरी दिली. 15 एप्रिल 1961 मध्ये अमेरिकेच्या आठ लढाकू विमानानी क्यूबा वरती बाँम्ब टाकायला सुरवात केली पण अधिक तर बाँम्ब निष्याण्यावरती पडलेच नाही.
अमेरिकेने या लढाकू विमानांना क्यूबा एअर फ़ोर्स सारखे पेंट केले होते. ही घटना जेव्हा संपूर्ण जगभर पसरली तेव्हा अमेरिकेची जगभर थू थू झाली. त्या नंतर अमेरिकेने दुसरा हवाई हमला कॅन्सल केला.
त्यानंतर ‘ब्रेगेड 2506’ या तुकडीला उतरण्यासाठी क्यूबाचा दक्षिण किनारा अमेरिकेने निवडला त्या किनाऱ्याचे नाव होते ‘बे ऑफ पिग्स ‘होते या किनाऱ्यावर लपण्या साठी भरपूर जागा होती. 25 एप्रिल या दिवशी ब्रिगेड बे ऑफ पिग्स वरती पोहचली.
फिदेल कास्ट्रो यांनी अगोदरच क्यूबन एअर फोर्स ला सतर्कतेचा इशारा दिला होता कारण तो पर्यंत क्यूबा सरकार सतर्क झाली होती. आणि येणाऱ्या संकटाची त्यांना चाहूल लागली होती.
क्यूबा सरकार ने वीस हजार सैनिकांना ‘बे ऑफ पिग्स च्या दिशेने रवाना केले होते. याची ‘ब्रिगेड 2506’ला काहीही कल्पना न्हवती.
या युद्धात अमेरिकेचे चार सैनिक मारले गेले आणि दोन लाडाकू विमान, दोन जहाज उधवस्त झाले होते.
19एप्रिल पर्यंत संपूर्ण युद्ध समाप्त झाले होते आणि ब्रिगेड 2506 चे 100पेक्ष्या जास्त सैनिक मारले गेले. बाराशे पेक्ष्या जास्त सैनिक क्यूबाच्या ताब्यात आले होते.
त्यांना सोडवण्यासाठी अमेरिकेची चांगलीच फजिती झाली होती. पण कास्ट्रो यांनी त्यांना सोडून दिले पण त्या बदल्यात पाच करोड डॉलर्स चे औषधं आणि बेबी फूड घेतले.
अश्याप्रकारे इतिहासातील एक सर्वात मोठी घटना घडली आणि संपूर्ण जगासमोर अमेरिकेची फजिती झाली.
त्यानंतर अगस्त 1961 मध्ये उरुगवे या देशात एक संमेलन झाले त्यामध्ये कास्ट्रो चे मित्र आणि सहकारी ग्वेरा सुद्धा आले होते त्यावेळी ग्वेरा म्हणाले होते “मी अमेरीरिकेचे आभार मानू इच्छितो कि त्यांनी आमच्यावरती हल्ला केला.या हल्ल्याने क्यूबाला अमेरिकेच्या बरोबरीने आणले.


