Nepal Gen Z protest :नेपाळ मधील आंदोलनाची संपूर्ण कहाणी

भारताचा शेजारील देश नेपाळ हा खूप जास्त प्रमाणात जळतो आहे, त्या मागील कारणे काय आहेत आणि त्या मागील उद्देश काय आहे. आज या लेखात आपण बघणार आहोत.
नेपाळ मधील सरकार ने 26 सोशयल मीडिया ऍप्प वरती बंदी घातल्या नंतर नेपाळ मध्ये nepal gen z protest सुरु झाले.त्या नंतर हे आंदोलनाला वेगळे वळण लागले आणि भ्रष्टाचार च्या मुद्द्यावरून हे आंदोलन आणखीन जास्तच तापले गेले होते.नेपाळ चे पूर्व रक्षा मंत्री मिनेंद्र रिजाल यांनी सांगितले राजकीय लोकांची लापरवाही या मुळे हे आंदोलन हिंसक झाले.त्यांनी सांगितले या ‘जेन -जी ‘लोकांची ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हायला हव्यात.
tariff war :टॅरिफ म्हणजे काय आणि त्याची किंमत कोणाला मोजावी लागेल हे जाणून घ्या
रिजाल यांनी आंदोलनाचे केले समर्थन
डॉ रिजाल यांनी सांगितले सरकार ने लोकांचा विश्वास गमावला आहे.त्यांनी सांगितले या मागील उद्देश समजून घेणे आवश्यक आहे,. त्यांनी सांगितले मी ज्या पार्टी चा होतो त्यांना समजाऊ शकलो नाही, पण आता देश्याने समोर जायला हवे.
डॉ रिजाल यांनी सांगितले या आंदोलनाचा सन्मान करून आणि संविधानाचा सन्मान करून आम्हाला समोर जावे लागणार आहे, तरच देशाचा विकास होईल.त्यांनी हे सुद्धा सांगितले ही नवीन पिढी जर देशाचा विकास करत असेल तर नक्कीच आम्हा सर्वांना त्यांच्या मागे उभे राहावे लागणार आहे.
Nepal Gen Z protest
कोण आहे? सुदन गुरूंग
Nepal Gen Z protest नेपाल मधील आंदोलन इतके हिंसक झाले होते कि आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी नेपाळ चे पंतप्रधान’ केपी शर्मा ओली ‘ यांना राजीनामा द्यावा लागला होता.
त्यानंतर एक प्रश्न होता कि या आंदोलना मागे कोण आहे आणि हे आंदोलन इतके हिंसक झाले या मागे कोण आहे.ज्याने देशाची वेवस्था पूर्ण पणे बदलून टाकली होती.नेपाळ देशाची संपूर्ण राजकीय साखळी तोडून टाकणाऱ्या वेक्तीचे नाव आहे ‘सुदन गुरूंग ‘.
सुदन गुरूंग यांनी नेपाळ मधील लोकांना सांगितले आंदोलन कसे करायचे आणि याची आवश्यकता काय आहे.
36 वर्षीय गुरूंग यांनी एक रैली काढण्या साठी परमिशन घेतले होते.त्यांनी तेथील युवकांना आव्हाहन केले कि त्यांनी शाळेतील आणि कॉलेज मधील युनिफॉर्म घालून यावे आणि सोबत बॅग आणि पुस्तकं आणावेत, त्यांना शांतीपूर्ण पद्धतीने हे प्रोटेस्ट करायचे होते.
पण प्रश्न येतो हे 36वर्षीय गुरूंग कोण आहेत, 2015मध्ये नेपाळ मध्ये भूकंप आला होता, त्या नंतर एका NGO ची स्थापना झाली होती, त्या NGO चे नाव होते,’हामी नेपाळ ‘. त्या ngo चे अध्यक्ष आहेत ‘सुदन गुरूंग ‘.
नेपाळ मध्ये जो भूकंप आला होता. त्या भूकंपा मध्ये सुदन सुरुंग यांचे मुलं त्या मध्ये मारल्या गेले होते.त्या नंतर त्यांच्या जीवनात एक बदल झाला होता.
त्या नंतर त्यांनी हामी नेपाळ नावाची ngo स्थापन केली आणि नेपाळ मध्ये ते आणि त्यांची ngo काम करत होती.
संविधानात संशोधन व्हावे
आंदोलनात बऱ्याच मागण्या केल्या आहेत त्या मध्ये सर्वात महत्वाची मागणी ही आहे कि, सरकार ने संविधानात संशोधन करावे.आंदोलन करणाऱ्यांचे म्हणणे आहे, सरकार लोकांचा विश्वास गमावून बसली आहे.
त्यामुळे संविधान पुन्हा एकदा लिहावे, या मध्ये नागरिक आणि युवकांची भागीदारी असायला हवी आहे.अनंतरीम सरकार ची अवधी समाप्त झाल्या नंतर, नवीन निवडणुका व्हाव्यात आणि ह्या निवडणुका निपक्ष असायला हव्यात.
आंदोलकांनी याची सुद्धा मागणी केली आहे कि मागील तीन दशकात जो भ्रष्टाचार झाला आणि देश्यामध्ये जो पैसा खर्च झाला त्याची सुद्धा जांच व्हायला हवी आहे.
17सप्टेंबर राष्ट्रीय शोक दिवस
नेपाळ मधील नवीन सरकार सुशीला कार्की यांच्या कॅबिनेट ने नवीन आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे.त्या मध्ये त्यांनी ’17 सप्टेंबर ‘ हा दिवस राष्ट्रीय शोक दिवस म्हणून पाळला आहे.या आंदोलनात ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांना शाहिद चा दर्जा देण्यात आला आहे.त्या वेतिरिक्त ओली सरकार चे संपूर्ण निर्णय मोडीत काढण्यात आले आहेत.
नेपा मधील अति भ्रष्टाचार आणि नेपोटीझम मुळे हे आंदोलन झाले या मध्ये gen z युवकांनी नेपाळ मधील सरकार उलटून पाडले आहे. या आंदोलनामुळे नक्कीच नेपाळ देशाचा विकास होईल आणि नेपाळ सुद्धा चांगली प्रगती करेल. पण हे आंदोलन खरंच नेपाळ मधील युवकांनी केले का या मागे कोणता विदेशी हात आहे, कारण या पूर्वी श्री लंका, बांगलादेश आणि आता नेपाळ मध्ये सुद्धा आंदोलन झाली आणि सरकार उलटून पाडले आहे.
भारत देशाला सुद्धा या विदेशी ताकती पासून सावध राहावे लागणार आहे, कारण भारताचा होत असलेला विकास आणि भारताचे रशिया सोबत असलेले संबध या मुळे नक्कीच पश्चिम च्या डोळ्यात सलणारे आहेत.

iqnwhursvgetdtvpfdugmrkrqqptrw