israil-iran conflict:तर पाकिस्तान इस्राईल वरती परमाणू हल्ला करेल?

israil-iran conflict:तर पाकिस्तान इस्राईल वरती परमाणू हल्ला करेल?

इस्राईल आणि इराण मध्ये युद्ध चालू आहे, यामध्येच इराण च्या एका मोठ्या अधिकाऱ्याने दावा केला कि पाकिस्तान इस्राईल वरती परमाणू बॉम्ब टाकू शकतो.

पण पाकिस्तान सरकार कडून या विषयी कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.शुक्रवारी इस्राईल ने इराण वरती हल्ला केला त्या नंतर दोन्ही देशात युद्ध चालू आहे.

israil-iran conflict

तुर्कीये टुडे च्या रिपोर्ट नुसार इराण चे शीर्ष अधिकारी ‘मोहसीन रेजाई ‘यांनी एका भाषणा दरम्यान सांगितले ‘पाकिस्तान ने इराण ला सांगितले जर इस्राईलने इराण च्या विरोधात परमाणू बॉम्ब चा प्रयोग केला तर पाकिस्तान सुद्धा इस्राईल वरती परमाणू बॉम्ब टाकेल ‘.

इराण चे मोहसीन रेजाई IRGC चे जेनरल आणि इराण राष्ट्रीय सुरक्षा परिषद चे सदस्य आहेत.

पाकिस्तान इराण सोबत आहे

पाकिस्तान ने सुरवातीलाच इराण ला समर्थन दिले आहे.काही दिवसापूर्वी पाकिस्तान चे रक्षा मंत्री ‘ख्वाजा असिफ ‘याने सांगितले ‘इराण च्या या वाईट वेळेला आम्ही इराण सोबत आहोत ‘. इराण लोक आमचे भाऊ आहेत आणि त्यांच दुःख आमचं दुःख आहे.त्याने हे सुद्धा सांगितले इस्राईल केवळ इराण वरती हल्ला करत नसून यमन आणि फिलिस्तीन मध्ये सुद्धा हल्ले करतो आहे.

इस्राईल ने इराण वरती हल्ला का केला: israil-iran conflict

इस्राईल ने शुक्रवारी 13जून 2025ला सकाळी इराण वरती हल्ला केला.आणि ‘ऑपेरेशन राईसिंग लायन ‘ सुरु केले.ज्यामध्ये इस्राईल ने इराण च्या परमाणू, मिसाईल आणि सैन्य ठिकाणावर हल्ले केले.त्यानंतर इराण ने इस्राईल वरती मिसाईल आणि ड्रोन ने हल्ले केले.

Israil iran war

इस्राईल इराण नंतर पाकिस्तान परमाणू ठिकाणावर हल्ले करणार?

israil-iran conflict

israil-iran conflict इस्राईल इराण युद्धामुळे पाकिस्तान मधील लोकांना चिंता लागली आहे. त्याच कारण आहे इस्राईल pm बेंज्यामिन नेतन्याहू यांचा जुना इंटरव्हिव. या मुलाखती मध्ये नेतन्याहू यांनी सांगितले होते.

जगातील काही देश असे आहेत ज्यांच्या कडे परमाणू बॉम्ब नाही पाहिजे. त्या मध्ये इराण आणि पाकिस्तान यांचे नाव त्यांनी घेतले होते.आणि ही विडिओ क्लिप पाकिस्तान मध्ये प्रचंड वायरल होत आहे. त्या मुळे पाकिस्तान मधील लोक चांगलेच घाबरून गेले आहेत.

इस्राईल pm यांनी सांगितले होते. इराण आणि पाकिस्तान जवळ परमाणू बॉम्ब असेल तर संपूर्ण जगाला आणि इस्राईल ला याचा धोका आहे.

शुक्रवारी इस्राईल ने इराण वरती हल्ला करून सांगितले,इराण ने जर परमाणू बॉम्ब बनवला तर इस्राईल चे अस्तित्वच राहणार नाही.इस्राईल जर इराण चा परमाणू कार्यक्रम उध्वस्त करण्यात सफल झाला तर, इस्राईल चे दुसरे टार्गेट पाकिस्तान असेल असे त्यांच्या जुन्या बयानातून वाटत आहे.

Whatsapp:https://shorturl.bz/शतक

इस्राईल ने इराण वरती हल्ला केल्या नंतर पाकिस्तानी रक्षा मंत्री ‘ख्वाजा असिफ ‘याचे बयान आले होते.त्याने बयान दिले इस्राईल इराण वरती हल्ला केल्या नंतर दुसऱ्या देश्यामध्ये सुद्धा हल्ला करू शकतो.

पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी लोक इस्राईल च्या या हल्ल्या मुळे चांगलेच घाबरून गेले आहेत. आणि इस्राईल पाकिस्तान वरती हल्ला सुद्धा करू शकतो. कारण पाकिस्तान नेहमी इस्राईल आणि येहूदी यांच्या विरोधात बोलत असतो. पाकिस्तान मधील सरकार इस्राईल चा खूप जास्त प्रमाणात विरोध करत असते.

इराण परमाणू कार्यक्रम नष्ट झाल्या नंतर, इस्राईल ला पाकिस्तान पासून सर्वात जास्त धोका आहे. आणि पाकिस्तान मधील काही बयान बघितले तर त्या बयाना नुसार इस्राईल द्वेष पाकिस्तान मध्ये तेवढाच आहे जेवढा येहूदी द्वेष नाझी मध्ये होता. त्या मुळे इस्राईल ला पाकिस्तान पासून सावध राहावे लागेल.

Israel-Iran conflict:राईसिंग लायन vs ट्रू प्रॉमिस 3,युद्धा मध्ये ऑपरेशन ला हे नाव का दिले?

israil-iran conflict

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *