the Iranian Revolution :इराणी क्रांती आणि क्रांतीचे परिणाम
विसाव्या शतकात इराण निरंकुशता, सीमित सुधार, आर्थिक विकास, वाढती आशा आणि क्रांती एक मिश्र कहाणी आहे.The Iranian Revolution क्रांतीची सुरवात 1905 1906 मध्ये झाली पण ती क्रांती पूर्ण पणे अयशस्वी झाली.
1953मध्ये अमेरिकेच्या समर्थनाने इराण मध्ये तक्ता पलट झाला.1978 -79 मध्ये धार्मिक रूपामध्ये याचा बदल झाला आणि क्रांतीचे The Iranian Revolutionसमापन झाले.

1978-1979मध्ये जी क्रांती The Iranian Revolutionझाली ही क्रांती इराण मध्ये पहिली क्रांती न्हवती या पूर्वी सुद्धा इराण मध्ये क्रांत्या झाल्या होत्या. पण त्या क्रांत्या इराण च्या सम्राटानी,प्रभावशाली व्यापाऱ्यांनी त्या दाबून टाकल्या.
काही मौलावी आणि शहा च्या समर्थकांनी शहा ची ताकद आणखीन जास्त वाढवून टाकली होती.
इराण च्या मौलावी कडे तेथील शिया मुस्लिमांना निर्देशीत करण्यासाठी एक शक्ती होती. सत्तेवर असलेला पहलवी राजवंश ने तेथील लाकांना भरपूर दमदाटी करून शांत बसवण्याचा प्रयत्न केला होता. आणि इराण मधील ही शांतता 1960मध्ये अशांत झाली.’मोहम्मद रजा शहा पहलवी ‘ची 1963ची श्वेत क्रांती मध्ये उत्तेजित होऊन काही क्रांतिकारी लोकांनी पहलावी विरोधक रुहोल्ला खुमेनी यांच्या कडे वळले.
सुरवाती पासून आयातुल्ला असलेले, आणि शिया मुस्लिम समुदाय मध्ये सर्वात महत्व असलेले खुमेनी यांनी इराण मध्ये काही सुधारणा आणल्या होत्या त्या मध्ये भूमी सुधार होती.
इराण मध्ये महिला वर्ग आणि अमुस्लिम यांना बऱ्याच गोष्टी पासून वंचित राहावे लागत असे त्या मुळे खोमेनी यांनी यांच्या साठी मतधिकार हवा या बाजूने होते.पहलवी सरकार ने त्यांना इराण मधून बेदखल केले होते त्यांना जेव्हा इराण मधून काढून टाकले होते तेव्हा ते तुर्की, इराक आणि नंतर सद्दाम हुसेन सोबत त्यांचे संबंध खराब झाल्या नंतर त्यांना इराक मधून सुद्धा काढून टाकन्यात आले. त्यानंतर ते फ्रान्स मध्ये गेले. आणि तेथून त्यांनी पहलवी विरोधात आपले अभियान चालू ठेवले.

इराण मधून खोमेनी यांना काढून टाकल्या नंतर पहलवी यांची एका प्रकारे जितच झाली होती.पण जे काही कट्टरपंथी इराण मध्ये होते त्यांच्या सोबत आपला संघर्ष नक्कीच होणार हे पहलवी यांना वाटत होते.1960ते 1970च्या काळात त्यांचा हा दृष्टिकोन खऱ्यात उतरत होता. आणि शहा ने तेथील जी सरकार होती तिचा त्याग केला आणि फक्त एक पार्टीय सरकार ची स्थापना 1975 मध्ये केली.
आणि हे सर्व त्यांनी त्यांचे समर्थन करणाऱ्या लोकां समोरच केले. या साठी त्यांनी कोणती सभा घेतली नाही किंवा कोणते पत्रकार बोलावले नाही.यानंतर शहा ला मदत करणारे आणि त्यांच्या सोबत धर्मानिरपेक्ष असलेले नंतर तेच कट्टरपंथी होऊन शहा चे विरोधी झाले.
त्यानंतर त्यांनी काही धार्मिक पार्टी मध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर शिया मौलविनी यांना आणि मध्यम व्यापाऱ्यांना आपल्या बाजूने करण्यासाठी एक धार्मिक आकर्षण बनवले होते.
Iranian Revolution
हा विरोध चालू असताना या विरोधाला बळ 1970मध्ये भेटले, जेव्हा शाही परिवाराला काही आव्हानाला सामोरे जावे लागले. सर्वात महत्वाचे म्हणजे सरकार भ्रष्ट होती,आणि शहा च्या मित्रपरिवाला तेला पासून भरपूर फायदा होत होता पण सामान्य नगरीक महागाई मुळे परेशान होते.
इराण मधील राष्ट्रवादी लोक या मुळे सुद्धा नाराज होते कि, संयुक्त राज्य अमेरिका च्या सैनिकांना विशेष दर्जा मिळत होता. अमेरिकेचे पन्नास हजार सैनिक इराण मध्ये तैनात होते.
विदेश्यातील लोकांचा इराण मध्ये हस्तक्षेप आणि तेथील श्रीमंत वर्ग दिवसेंदिवस श्रीमंत होत होता. आणि इराण मध्ये हा वर्ग पश्चिम संस्कृती प्रमाणे वागत होता त्या मुळे मौलावीच्या समज नुसार या मुळे इस्लाम भ्रस्ट होत होता.
या पश्चिम संस्कृती सारखे वागल्या मुळे काही मौलावि सरकार च्या विरोधात जाऊन एकजूट झाले.आणि सरकार च्या विरोधात काम करण्यासाठी काही छोट्या मोठ्या व्यापाऱ्याकडून अर्थ साहाय्य प्राप्त केले. इराण मध्ये बेरोजगारी खूप जास्त प्रमाणात होत होती त्या मुळे इराण मध्ये बेरोजगार सुद्धा खूप जास्त प्रमाणात होते. या बेरोजगार लोकांना घेऊन त्यांनी लडाखे बनवले.आणि आयातुला खोमेनी यांचे नेतृत्व प्राप्त केले.
खोमेनी जेव्हा निर्वासन मध्ये होते तेव्हा सुद्धा त्यांनी इराण मधील त्यांच्या लोकांन सोबतचा संपर्क नाही तोडला. आणि त्यांनी त्यांच्या लोकांसोबत पत्र व्यवहार चालू ठेवला होता.त्यांनी त्यांच्या भाषणाच्या ऑडिओ कॅसेट सुद्धा पाठवत होते.
1970च्या दशकात सरकार विरोधी कारवाई होत होती आणि जणमानस सरकार च्या विरोधात जात होते.आणि त्याच वेळेस इराण ची अर्थवेवस्था खूप जास्त प्रमाणात लडखडत होती आणि शहा यांची तब्यत सुद्धा लडखडत होती.
अमेरिकेचे नवीन झालेले राष्ट्रपती यांनी अमेरिकेची नीती तोडली आणि शहा सरकार ला सांगितले इराण मध्ये मानवधिकाराचे उ्लंघन होत आहे. आणि या मध्ये सुधारणा व्हावी असे सांगितले.
इराणी क्रांती The Iranian Revolutionचे पहिले चरण वर्षे 1978ला सुरु झाले. जेव्हा इराण चे एक शहर ‘कोम ‘मध्ये विरोध प्रदर्शन सुरु झाले.आणि हे विरोध प्रदर्शन एवढे मोठे होते कि इराण सरकार ला तिथे ‘सुरक्षा बल ‘तैनात करावी लागली. या सुरक्षा बलानी विरोध प्रदर्शना साठी आलेल्या लोकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला.या मध्ये 100लोकांना आपला जीव गमवावा लागला.
100 पेक्ष्या जास्त लोक मारल्या गेल्यामुळे विरोध प्रदर्शन आणखी जास्त प्रमाणात वाढले होते.आणि या मुळे आणखी जास्त प्रदर्शन कारी लोक मारल्या गेले.त्यानंतर इराण मध्ये गुरील्ला युद्ध सुरु झाले.आणि हे गुरील्ला युद्ध जेव्हा सुरु झाले तेव्हा वामपंथी, मजदूर, पादरी एकत्र आले.या मुळे इराण मध्ये आर्थिक संकट आले आणि संपूर्ण इराण शहा च्या विरोधात गेला.
1978पर्यंत इराण चे तेल उदपादन देशासाठी खूप महत्वाचे होते. त्या तेलाच्या उत्पादनात 80%घसरण झाली.आणि या होणाऱ्या विरोध प्रदर्शनाला आटोक्यात आणण्यासाठी शहा सरकार असमर्थ होती.मोहमद रजा यांनी 16 जानेवारी 1979मध्ये राजीनामा दिला आणि त्याच दिवशी एका विमानाने इराण सोडले ते हमेशा साठी.
त्यानंतर सुद्धा एका महिन्या पर्यंत संपूर्ण इराण जळतच होता.कारण तो पर्यंत शहा चे समर्थक इराण मध्ये होतेच, पण नंतर त्यांनी सुद्धा इराण सोडले.
जेव्हा खोमैनी इराण मध्ये आले तेव्हा इराण मधील लोकांनी त्यांचे स्वागत एक मुक्तीदाता आणि इराण चा सम्राट या थाटात केले.खोमेनी यांच्या लोकांनि इराण ची राजधानी तेहारण आपल्या ताब्यात घेतली होती आणि तेथून ते इराण चा ग्रामीण भाग सुद्धा आपल्या ताब्यात घेत होते.
्यासोबतच त्यांनी इराण च्या पूर्व अधिकाऱ्यांना काढून टाकले, काहींना जेल मध्ये टाकले तर काहींना मारून टाकले.एक इस्लामी सुरक्षाबल ‘रिवोल्यूशनरी गार्ड ‘ने या मध्ये त्यांची सहायता केली.नंतर यांची एक सैने संघटन म्हणून नियुक्ती केली होती.
आता पर्यंत या क्रांती ने नवीन मोड घेतला होता कारण इराण मधील मौलवी ने एक ‘इस्लामी ‘ गणराज्य बनवण्याची मांग केली होती.याची सुरवात एका नवीन संविधानाने केली आणि खोमेनी यांना सर्वांच्च नेता म्हणून घोषित केले.खोमेनी ची जी नियुक्ती झाली होती ती संपूर्ण जीवन भर होती.त्यांना सर्व सरकारी सधिकारी निवडण्याचा अधिकार दिला होता.आणि’ गर्जिएन काऊसील ‘च्या अर्ध्या सदस्यना निवडण्याचा सुद्धा अधिकार दिला होता.
अमेरिकेने अफगाणिस्तान मध्ये तालीबान ला घडवले?
इराण क्रांती The Iranian Revolutionनंतर सुद्धा इराण मध्ये खोमेन सारखा नेता आला होता आणि खोमेनी ला सुद्धा नको ते अधिकार दिले गेले होते. ही क्रांती भविष्यात खूप काही घेऊन आली होती. इराक सोबत युद्ध हे युद्ध जवळपास आठ वर्षे चालू होते आणि या युद्धात दहा लाखापेक्षा जास्त लोक मारल्या गेले होते. आणि इराण पुन्हा एकदा आर्थिक समस्याच्या गर्द काळ्या अंधारात गेला होता.