इराण इराक युद्ध ज्यामुळे दहा लाखा पेक्ष्या जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले. इराण इराक युद्धाची संपूर्ण कहाणी

1980 ते 1988 पर्यंत चालणारे इराक इराण युद्ध, इराक इराण हे शेजारी देश आहेत. आणि या काळात यांच्यात एक संघर्ष चालू होता. हे युद्ध इतिहासिक प्रश्न, जातीवाद, तणाव आणि राजकीय समस्या या सर्वामुळे झाले होते. 1979मध्ये इराण मध्ये क्रांती झाली होती. त्यानंतर आयातुल्ला खुमेनी यांच्या नेतृत्वात इराण मध्ये खुमेनी सरकार ची स्थापना झाली. जेव्हा इराण मध्ये क्रांती झाली तेव्हा पासूनच सद्दाम हुसेन ला सुद्धा भीती वाटत होती. ही क्रांती आपल्या देशात होऊ शकते आणि त्याच वेळेला इराण हा आर्थिक दृष्ट्या कमजोर होता सद्दाम हुसेन ला याच वेळेचा फायदा घ्यावा वाटला.

हा संघर्ष मुख्य तीन चरणामध्ये होता. ज्याची सुरुवात इराणी भागात जे इराकि होते त्यांच्याकडून झाली. त्यानंतर इराणकडून जवाबी हमले झाले. त्यानंतर इराक कडून सुद्धा रासायनिक हत्याराचा उपयोग करण्यात आला.
दोन्ही देशाचे भरपूर नुकसान झाले अनुमान आहे की दहा लाखापर्यंत सैनिक मारल्या गेले यामध्ये भरपूर नागरिक सुद्धा मारले गेले.
1988 च्या शेवटी संयुक्त राष्ट्राच्या मध्यस्थीने युद्धविराम झाला पण या युद्धाने इराक इरांन मध्ये एवढा बदल झाला की नंतर या देशाची सत्तावादी सरकार आणखीन मजबूत झाले.

इराण इराक युद्धचे दुर्गामी परिणाम होते. ज्याने फारस खाडीच्या भुराजनीतिक परिदृश्याला आकार दिला. आणि युद्ध समाप्तीनंतर सुद्धा रजनीतिक संघर्ष चालूच होता. हा संघर्ष चालूच होता. हा संघर्ष म्हणजे खूप भयावह होता. आणि या मध्ये सैन्य, आणि नागरिक मोठ्या प्रमाणात मारल्या गेले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समंध्दामध्ये एक जटीलता आहे. याची आठवण करून दिली.

इराक इराण संघर्षाची सुरवात

इराण इराक युद्ध म्हणजे 20व्या शतकातील सर्वात लांब युद्ध होते. दुसऱ्या महायुद्धा नंतर सर्वात घातक युद्ध मानले जाते. ज्या मध्ये दहा लाखापेक्षा जास्त लोकांचे प्राण गेले. रासायनिक शस्त्रचा उपयोग झाला. फारस खाडीमध्ये अस्थिरता उत्पन्न झाली. ज्यामुळे 21व्या शतकात या भागात अशांती चे वातावरण झाले.

घटना आणि सारांश

इराक आणि इराण मधील जी सीमा आहे ती दोन्ही देशाला आणि दोन्ही संस्कृतीला अलग करते. यामध्ये इराकी लोक अरबी आहेत तर इराणी लोक फारसी आहेत. ज्यामुळे दोघांतील संघर्ष हा पूर्वी पासूनच आहे. 1970च्या दशकात या संघर्षाला सुरवात झाली. 1979पर्यंत सद्दाम हुसेन ने इराक मध्ये पूर्ण रजनीतिक सत्ता आपल्या ताब्यात घेतली. फेब्रुवारी 1979मध्ये इराण मध्ये क्रांती झाली आणि ‘मोहमद रजा शहा पहलवी ‘ला सत्तेमधून काढून टाकले. आणि आयातुल्ला खुमेनी इराण च्या सत्तेचा सर्वेसर्वा झाला. खोमेनीने इराण देशाचे नाव बदलून ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ‘केले. म्हणजे इराण या देशाला ‘इस्लामिक ‘ देश म्हणून घोषित करण्यात आले.

1979मध्ये इराण च्या काही विद्यार्थ्यांनी ‘तेहरान ‘ मधील ‘अमेरिकी धुतवासा ‘वरती धावा बोलला. त्यांची मागणी होती कि ‘मोहम्मद रजा शाह’ ला अमेरिकेमधून इराण मध्ये पाठवावे. त्यांनी 444दिवस 52अमेरिकी लोकांना बंदी बनून ठेवले होते. या वेळेला इराण मध्ये खूप राजकीय उथल पुथलं चालू होती. आणि याचा फायदा सद्दाम हुसेन ने घेतला. 22सप्टेंबर 1980मध्ये इराण वरती इराक ने हमला केला.

सद्दाम हुसेन ने इराण वरती जो हमला केला त्याच्या मागे कारणे सुद्धा होती. सर्वात महत्वाचे म्हणजे सिया सुन्नी विवाद आणि राजकीय स्वार्थ होता. आणि असे बोलले जाते कि सद्दाम हुसेन ला इराक हे धर्म -निरिपेक्ष राष्ट्र बनवायचे होते. पण इराण मध्ये जी इस्लामिक क्रांती झाली. त्यामुळे सद्दाम हुसेन ला भीती होती कि भविष्यात हीच क्रांती इराक मध्ये येईल.

हुसेन ने इराणी अधिकाऱ्यांच्या मध्य पूर्वेत क्रांती भडकावयाच्या भाषणाने ‘फारस खाडी ‘ क्षेत्रात याचा प्रभाव होईल याची भीती वेक्त केली होती. यामध्ये इराणी लोकांनी इराक मध्ये जे सिया लोक होते यांना भडकवण्याचा प्रयत्न केला. आणि सद्दाम हुसेन विरोधात सुद्धा क्रांती व्हावी असे खोमेनी यांना वाटत होते.

इराण मध्ये जी क्रांती होत होती त्यांनी क्षत्रिय प्रभाव कमी केला होता. खोमेनी ने आपले नेतृत्व आणखीन मजबूत व्हावे यासाठी कट्टरपंथीणा खतपाणी घातले.

इराण मध्ये भरपूर राजकीय दल असे होते की त्यांना सुद्धा सत्तेवर यायचे होते. त्या व्यतिरिक्त इराणमध्ये खोमेनी सरकारने भरपूर अधिकाऱ्यांना मारले जे या सत्तेच्या विरोधात होते.
या वेळेला इराण मध्ये भरपूर प्रमाणात राजकीय आणि सामाजिक उथल पुथलं चालू होती.
आणि सद्दाम हुसेन ने याचा फायदा घ्यायचा ठरवलं होतं.

हुसेन आणि खोमेनी हे एकमेकांना विरोध करत होते. इराण मध्ये जेव्हा ‘शहा सरकार’ होते तेव्हा १९६२ मध्ये खोमिनी इराण सोडून इराक मध्ये गेले होते. पण 1977 मध्ये सद्दाम हुसेन यांनी खोमेनीला इराक मधून हाकलून दिले होते. त्यानंतर खोमेनी फ्रान्स मध्ये गेले. तेथून ते सद्दाम हुसेन विरोधात काम करत होते. त्यांनी सद्दाम हुसेन वरती आरोप लावले की इराक मध्ये सद्दाम सिया विरोधी काम करतो. खोमणे जेव्हा इराण मध्ये आले तेव्हा हुसेन विरोधात आणखीन जास्त काम करत होते. इराण सोबत इराक चा सीमा विवाद होता आणि इराकला हेच कारण भेटले होते इराण वरती हमला करण्याचे.

युद्ध

हे युद्ध तीन चारणात झाले होते. सुरवातीला इराण इराक सीमेच्या उत्तर आणि मध्य भागात इराकी सेना ने हमला केला. इराणी सेना खूप कमजोर असल्या कारणाने इराक ने इराण च्या काही भागावर नियंत्रण मिळवले. मुख्य हमला फारस च्या खाडीतच्या त्या भागावर झाला जिथे इराक इराण सीमा विवाद होता.

इराकी सेना ‘खुजेस्तान ‘भागात जवळपास 80km इराण च्या आत मध्ये गेली होती. पण इथून पूढे इराण चे सैनिक इराक ला जड जात होते आणि स्थानिक इराणी लोकांनी सुद्धा इराकी सैनिकाला अडवून धरले होते. त्यामुळे सद्दाम हुसेन खूप निराश झाला होता. सद्दाम हुसेन ला वाटले होते. या भागात जे अरब आहेत ते इराक च्या बाजूने येतील पण असे काही झाले नाही. त्यामुळे इराण च्या विरोधात जी सद्दाम हुसेन ने रानणिती आखली होती ती इथपर्यंत पूर्ण पणे विफल ठरली होती.

इराणी नेत्यांनी लवकरच तीन सैन्य बलाचे संघटन केले होते.नऊ ते पन्नास वर्षाचे स्वयंसेवक ज्यांना ‘पासदारण ‘ म्हणतं होते. इराणी क्रांती मध्ये ज्यांचा महत्वपूर्ण हात होता. त्यांनी सुद्धा या युद्धात भाग घेतला होता.

पण त्यांच्याकडे सैन्याचे प्रशिक्षण आणि लढण्यासाठी शस्त्रे न्हवती. इराण मध्ये काही सैनिक असे होते जे सरकार ने त्यांना जेल मध्ये टाकले होते. त्यांना सुद्धा सोडण्यात आले. ज्यामध्ये मोठं मोठे अधिकारी आणि पायलट सुद्धा होते. 1981मध्ये इराणी सेना एवढी बळकट झाली होती कि इराक च्या हल्ल्याला प्रतिउत्तर नक्कीच देऊ शकत होती.

या युद्धात इराण चे जे ‘पासदारण ‘ स्वयंसेवक होते. ते इराकी सैन्यावर तुडून पडत आणि या स्वयंसेवाकाकडे शस्त्रे नसल्या कारणाने त्यांना इराकी सेना सहज हरवत असत. या मुळे हजारो च्या संख्येने इराणी मरत असत.

युद्धाचे दुसरे चरण 1982च्या माध्यत सुरु झाले जेव्हा इराण ने एक सफल आक्रमण केले. ज्यामध्ये इराक च्या ताब्यात जे महत्वपूर्ण इराणी शहर होती. त्या शहरांना इराण ने वापस आपल्या ताब्यात घेतले.त्यामुळे इराक चे मनोबल आणखीन जास्त पडले.

Iranian Revolution

saddam husean

जून जैले 1982 मध्ये इराक ने आपले सैन्य वापस न्यायला सुरवात केली. आणि युद्ध समाप्त करण्याची विनंती संयुक्त राष्ट्र संघाकडे केली. पण इराण ने युद्ध चालूच ठेवले. त्यानंतर इराण ने इराक वरती एक जोरदार हमला केला. आणि ‘मानव तरंग ‘ हमल्याचा सुद्धा वापर केला. 1983पर्यंत कोणताही देश निर्णायक युद्ध जिंकला नाही.

यामध्ये इराक हा इराण समोर खूप कमजोर दिसत होता आणि इराण हे युद्ध जिंकेल असे वाटत होते.

तिसऱ्या चरणातील युद्ध 1984पर्यंत चालू झाले. जेव्हा सद्दाम हुसेन ने एक नवीन रानणिती आखली होती. इराण इराक च्या क्षेत्रवार जो कब्जा करणार होता. तिथे सद्दाम ने इराण ला आडवले आणि इराण विरोधात आता नवीन हात्त्यार वापरणार होता. या नंतर इराण च्या मानव तरंगाणा थांबवण्यासाठी इराक ने रासायनिक शस्त्रचा वापर केला. फारस खाडीतील शपिंग वर हमला केला. (ज्याला ट्रॅन्क युद्ध असे म्हटले जाते. )

irak iran war

त्यानंतर इराक ने मिसाईल आणि तोफांनी इराणी शहरावर हमला केला. (शहरातील युद्ध ) इराक ने 1884मध्ये रासायनिक हत्यारांचा वापर केला. रासायनिक हत्याराचा वापर केल्या मुळे 1986मध्ये ‘संयुक्त राष्ट्र संघाने’ निंदा वेक्त केली होती. 1987पर्यंत इराक ने रासायनिक शास्त्राचा वापर ‘रक्षत्मक ‘पद्धतीने न करता ‘आक्रमक’ पद्धतीने केला.

मार्च 1988पर्यंत इराक ने इराक च्या पूर्वत्तर भागात जवळपास तीस रासायनिक हमले केले. इराक च्या पुर्वोत्तर भागात ‘कुर्द ‘जमातीचे लोक राहतात आणि हे कुर्द लोक इराण चे समर्थन करत होते. या मध्ये ‘हलबजा ‘ नावाच्या शहरात पाच हजार नागरिक मारले गेले होते. जागतिक पातळीवर या हमल्याची खूप निंदा करण्यात आली होती.

मार्च 1984 मध्ये टॅंक युद्ध खूप जास्त प्रमाणात भडकले होते. इराक ने इराण च्या तेल टॅंक वरती हमले केले. इराक ने इराण चे तेल राजस्व कमी करण्याचा प्रयत्न केला होता. हुसेन ला वाटत होते तेल टॅंक वरती जर हमले केले तर पश्चिमी राष्ट्र युद्ध बंद करण्यासाठी मध्यस्ती करतील. इराण ने इराक च्या जाहजावर हमले करून या हमल्याला प्रतिउत्तर दिले. हे हमले इराण ने त्या जाहजा वरती केले जे जाहज कुवेत आणि सौदी मधून येत होते. इराण ने सौदी आणि कुवेत वरती आरोप केला होता कि इराक ला हे देश मदत करत आहेत आणि इराक ला शस्त्रे पुरवत आहेत.

या तेल हमल्यामुळे इराक चे 70%आणि इराण चे 50%तेलाचे नुकसान झाले होते. आणि यामुळे फारस खाडी मध्ये 25%शिपिंग कमी झाली होती. हे टॅंक युद्ध 1987पर्यंत चालू होते. जेव्हा एका इराकी मिसाईल ने ‘यु एस एस स्टार्क ‘वरती हमला केला. ज्यामध्ये 37चालक मारल्या गेले होते. त्यानंतर इराण ने हे युद्ध भडकवले असा आरोप अमेरिकेने केला होता. आणि इराण च्या विरोधात एक संघटन बनवण्याची धमकी दिली होती. पण अरब राष्ट्रा मध्ये संशय होता. अमेरिकी राष्ट्रपती ‘रोनाल्ड रीगन ‘ यांनी इराण ला अव्यध्य शस्त्रे पुरवली होती. 1988पर्यन्त 18राष्ट्रीय नोसेना चे जहाज फारस खाडी मध्ये गस्त घालत होते. 400पेक्ष्या जास्त नविक मारले गेले होते.

शेकडो जाहजावर हमले केले होते. जामध्ये 80पेक्ष्या जास्त लोक मारल्या गेले होते. यामध्ये जाहजाच्या मालकाचे लाखो डॉलर्स चे नुकसान झाले होते.

इराक इराण युद्ध 1988मध्ये समाप्त झाले होते. जेव्हा इराण ने आपल्या प्रमुख शहरावर इराक ने रासायनिक हमले केले होते. तेव्हा इराण ने ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ‘ चा प्रस्ताव 598ला स्वीकार केले आणि सर्वात लांब चाललेले युद्ध समाप्त करण्याची विनंती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *