इस्राईल गुप्तचर यंत्रणा म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येते त्यांचे वेगवेगळे ऑपेरेशन आणि त्यांनी बनविलेला प्लान ज्याने त्यांच्या दुश्मनाचा थरकाप उडतो. आज आपण बघणार आहोत अश्याच एका ऑपेरेशन विषयी माहिती ऑपेरेशन रेथ ऑफ गोड विषयी माहिती.
1980आणि 90च्या दशकात फिलिस्तींनी समर्थक आतंकवाद्याच्या घरी एक फुलाचा गुलदस्ता येत होता. त्या सोबत एक नोट असायची त्यात लिहिलेले असायचे “आम्ही विसरत नाही, आणि माफ सुद्धा करत नाही. त्यानंतर तेथील आतंकवाद्याची हत्या होत असे. आणि हे काम होत जगातील सर्वात खतरनाक गुप्तचर यंत्रणा मोसाद चे. या वेळेस इस्राईल चे दुस्मन जगाच्या पाठीवर कोठेही लपलेले असतील तर त्यांना शोधून मारण्याची ताखत मोसाद कडे होती. पण अशी कोणती घटना घडली होती कि मोसाद आपल्या दुश्मणाला संपूर्ण जगात शोधून मारत होते.
म्युनिख नरसंहार
6सप्टेंबर 1972 या दिवशी इस्राईल देश्यातील नागरिक TV आणि रेडिओ ला चिपकून बसले होते. जर्मनीच्या म्युनिख शहरांत ऑलम्पिक चालू होते. पण त्या दिवशी इस्राईली नागरिक ऑलम्पिक गेम बघत न्हवते तर तिथे चालू होता इस्राईल खेळाडूंचा नरसंहार.
फिलिस्तीन च्या एका आतंकवादी संघटनेच्या काही आतंकवाद्यांनी इस्राईल च्या खेळाडूंना बंधक बनविले होते ज्या आतंकवाद्यानी इस्राईल च्या खेळाडूंना बंधक बनविले होते ज्या आतंकवाद्यानी खेळाडूंना बंधक बनवले होते त्या आतंकी संघटनेच नाव होत “, ब्लॅक सप्टेंबर “.
या आतंकवाद्यानि सुरवातीला दोन खेळाडूंना मारले आणि बाकीच्यांना बंधक बनविले या बांधकाच्या बदल्यात 200 फिलिस्तींनी कैद्याना सोडण्याची मागणी केली.
जर्मनीचे चान्सलर विली ब्रांट यांनी इस्राईल च्या पंतप्रधान गोल्डा मेयर यांना फोन केला आणि या घटनेबद्दल सांगितले गोल्डा मेयर या इसराईल च्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. 17मार्च 1969 ला त्या इसराईल च्या सत्तेवर आल्या होत्या. सत्तेवर आल्यापासून सर्वात मोठी समस्या त्यांच्या समोर आली होती. त्यांनी इसराईल ची जुनी परंपरा कायम ठेऊन त्यानि जर्मन चान्सलर विली ब्रांट यांना सांगितले ‘आम्ही आतंकवाद्याची कोणतीही मागणी पूर्ण करणार नाही ‘.
आतंकवाद्यानि बंधकांना विमान तळावर नेले तेव्हा जर्मन सुरक्षा रक्षकांनी एक रेस्क्यू ऑपेरेशन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सर्वांचे लक्ष या ऑपेरेशन वरती होते तेव्हा tv वरती एक बातमी आली. आतंकवाद्या पासून खेळाडूंना सोडवण्यात यश आले आहे. त्यानंतर इस्राईल मध्ये सर्वत्र आनंद वेक्त होत होता. पंतप्रधान गोल्डा मेयर सुद्धा आपल्या ऑफिस मध्ये आनंद वेक्त करत होत्या. त्यांना वाटत होते खूप मोठ्या संकटातून खेळाडू वाचले पण त्यांना काय माहित होते? कि हा आनंद फक्त एका रात्री पुरताच आहे.कारण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना समजले कि ही बातमी पूर्ण पणे खोटी होती.आणि सकाळी त्यांना या पेक्षा सुद्धा मोठा धक्का बसला होता. केवळ गोल्डा मेयर च नाही तर संपूर्ण इसराईल आणि जगाला सुद्धा कारण आतकंवाद्यानी इस्राईल च्या सर्व खेळाडूंना मारले होते.आणि ही भयंकर बातमी पचवण इस्राईल साठी एवढं सुद्धा सोपं न्हवत. खरं तर केवळ इसराईल साठीच नाही तर तर संपूर्ण ऑलम्पिक साठी हा दिवस काळा झाला होता. या मध्ये जर्मनीला सुद्धा खूप मोठा धक्का होता. हे सर्व जर्मनीच्या जमिनीवर चालू होत. पंचवीस ते तीस वर्ष्यापुर्वी याच जर्मनीत लाखो येहुदी हिटलर ने मारले होते आणि त्यानंतर ही घटना घडली होती. यानंतर पाच आतंकवाद्याना मारले होते पण आणखी तीन जिवंत होते.

संपूर्ण इसराईल शोकाकुल होते दुःख आणि राग त्यांच्या मनात भरला होता. त्यांच्याकडून एकच आवाज येत होता. झालेल्या घटनेचा बदला.
प्लेन हाईजाक
इस्राईल ने या हत्येचा बदला घेण्यासाठी लेबनानं आणि सिरिया मध्ये आतंकवाद्या च्या ठिकाणावर भरपूर हवाई हमाले केले या हमल्यात 200पेक्ष्या जास्त आतंकी मारले गेले. पण तरीही इसराईल शांत बसू शकत न्हवता कारण ते तीन आतंकी आणखीन सुद्धा जिवंत होते आणि त्या हत्येचा प्लॅन बनवणारे सुद्धा जिवंतच होते. त्या तीन आतंकवाद्याची नावे होती अदनान अल गाशे, जमाल अल गाशे, आणि मोहमद गदाफी हे सर्व जर्मनी च्या ताब्यात होते पण जर्मनी च्या संविधाना नुसार त्यांना मृत्यू दंड देता येत न्हवता. त्यामुळे इस्राईल जर्मणीकडे मागणी करत होता कि हे आतंकी इस्राईल च्या हवाली करा. त्यानंतर काही आठवड्यात एक घटना घडली आणि इस्राईल जर्मणीकडे जी मागणी करत होता त्या मागणी वर पाणी फिरले होते.
आक्टोबर 1972ला एक विमान 615सिरिया मधून जर्मनीला जात होते. त्या विमानात दोन आतंकवादी होते. काही वेळात त्यांनी ते विमान हाईजाक केले. त्यांची मागणी होती म्युनिख मध्ये जे तीन आतंकवादी पकडले होते ते सोडावे. जर्मनीने आपल्या नागरिकांसाठी त्यांची मागणी पूर्ण केली. आणि साहजिकच इसराईल मध्ये एक संतापाची लाट उठली.
इस्राईल पंतप्रधान गोल्डा मेयर यांच्यावर खूप जास्त जनतेकडून दबाव वाढत होता. जनतेची एकच मागणी होती. ती म्हणजे बदला. गोल्डा मेयर यांनी इस्राईल च्या गुप्त अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली आणि या बैठकीत एक कमिटी बनवली त्या कमिटीला नाव दिले कमिटी एक्स आणि या कमिटीलाच ठरवायचे होते म्युनिख च्या आतंकवाद्याना कसे व केव्हा मारायचे.हे काम सोपं सुद्धा न्हवत.
गुप्तचरांकडून मिळालेल्या माहिती नुसार 20ते 35लोकांची त्यांनी एक लिस्ट बनवली हे सर्व आतंकी युरोप किंवा मध्य पूर्व मध्ये होते.प्रत्येक आतंकवाद्याला शोधायचे होते आणि मारायचे होते.या मध्ये एक दक्षता घ्यायची होती कि हे सर्व मारल्या नंतर कोणत्याही प्रकारे संशयाची सुई इसराईल कडे होता कामा नाही. हे सर्व फक्त इसराईल ची मोसादच करू शकत होती मोसाद ने या ऑपरेशन ला नाव दिले “रेथ ऑफ गोड “.
मोसाद च्या या ऑपरेशन ला लीड करत होते एजेंट मायकल हरारी. त्यांनी पाच टीमा बनविल्या. आणि या प्रत्येक टीम ला हिब्रू अल्फा बेट मध्ये नाव दिले.
1)आलीफ – या टीम मध्ये दोन किलर होते
2)बेट – या टीम मध्ये दोन एजेंट असे होते कि ते कोणाची ही खोटी identy बनवत होते.
3)हेट – या टीम च्या एजेंट ना काम होते हॉटेल आणि कार चा बंदोबस्त करणे.
4)आयिन -या टीम चे काम होते बाकी टीम साठी एस्केप रूट तयार करणे.
5)कोफ –या टीम चे काम होते बाकी सर्व टीम च्या संपर्कात राहायचे.
या ऑपेरेशन मधील एजेंट चा इसराईल सरकार सोबत कोणताही संबंध ठेवला न्हवता ते फक्त मायकल हरारी ला रिपोर्ट देत होते.

ईश्वराचा उद्रेक
या ऑपरेशन ला सुरवात झाली 16ऑक्टोबर 1972ला रोम मधील एका हॉटेल मध्ये गोळ्यांचा आवाज आला.आणि या लिस्ट मधून एक नाव काढण्यात आले एका आतंकी चा खात्मा झाला होता. त्यानंतर एका महिन्याने फ्रान्स मधून अशीच एक बातमी आली. ‘ब्लॅक सप्टेंबर ‘चा लीडर महमूद हमशारी याला माहित होते कि आपल्यावर मोसाद ची नजर आहे.मोसाद च्या भीतीने तो आपल्या अपार्ममेंट मध्ये लपून बसला होता. त्यामुळे त्याला मारणे अवघड होऊन बसले होते. त्यानंतर मोसाद च्या टीम ने एक प्लान बनविला. एके दिवशी त्याला एका पत्रकाराचा फोन आला. पत्रकाराने त्याला भेटण्यासाठी बोलावले. महमूद त्या पत्रकारला भेटण्यासाठी बाहेर गेला त्याच वेळेला मोसाद ची टीम त्याच्या घरात गेली. आणि त्याच्या टेलिफोन मध्ये बॉम्ब सेट केला. जेव्हा महमुद घरी गेला आणि त्याला एक फोन आला त्याने फोन उचलला आणि एक स्फोट झाला. त्यात महमूद गंभीर जखमी झाला. तो काही दिवस हॉस्पिटल मध्ये होता पण डॉक्टर त्याचा जीव वाचवू शकले नाहीत. त्यानंतर असेच हमले होत राहिले आणि म्युनिख हमल्याला जिम्मेदार असलेले सर्व आतंकवादी मारले गेले. हे ऑपरेशन करताना मोसाद ने कोणाचाही विचार केला नाही. बेरूत मधील एका युनिव्हर्सिटी मध्ये काम करणाऱ्या प्रोफेसर ला सुद्धा मारले.त्या प्रोफेसर वरती मोसाद ला संशय होता कि म्युनिख हत्या कांड मध्ये त्याचा सुद्धा हात होता.
ह्या सर्व आतंकवाद्यांना मारण्या आगोदर मोसाद त्यांच्या घरी फुलांचा एक गुलदस्ता पाठवत होते. आणि त्यावर लिहिलेले असायचे “आम्ही विसरत नाही आणि माफ सुद्धा करत नाही “यावेतिरिक्त पेपर मध्ये सुद्धा मरणारा विषयी शोक संदेश लिहिला जात असे. त्यामुळे मरणाराला जास्तच भीती वाटत असे.
OPERATION WRATH OF GOD
mosad
ऑपेरेशन स्प्रिंग ऑफ युथ
या अचानक हल्ल्यामुळे आतंकवाद्यामध्ये घाबराट सुटली होती. मोसाद च्या लिस्ट मधील तीन आतंकवाद्यानि आपल्या घरासमोर सुरक्षा लावली होती. त्यांना मारणे मोसाद साठी अवघड होऊन बसले होते. मोसाद ने यांना मारण्यासाठी स्पेशल ऑपरेशन चा फ्लान करावा लागला त्या ऑपरेशन चे नाव होते. स्प्रिंग ऑफ युथ. या ऑपरेशन साठी इसराईल नेवी आणि एअरफ़ोर्स चा उपयोग घेतला गेला.स्पीड बोट घेऊन इसराईली स्पेशल फ़ोर्स चे कमांडो लेबनान च्या किनाऱ्यावर आले. त्यांनी तेथील स्थानिक नागरिकांची वेशभूषा केली. काही कमांडोनी बुरखा घातला आणि टार्गेट पर्यंत गेले. रोतो रात हे कमांडो त्या बिल्डिंग मध्ये गेले आणि त्या तीन आतंकवाद्यांना मारून बाहेर पडले.
हे सर्व चालू असताना इसराईल च्या पंतप्रधान गोल्डा मेयर यांच्या हत्तेचा सुद्धा प्रयन्त झाला होता. पण मोसाद आतंकवाद्याच्या या प्लान वरती पाणी फिरवले. पंतप्रधान गोल्डा मेयर यांच्या हत्येचा प्लान बनविणारा आतंकी ‘आली हसन सलामेह ‘होता तो भरपूर दिवस मोसाद ला चकमा देत होता पण शेवटी 1979ला मोसाद ने त्याच्या गाडीत बॉम्ब ठेवला आणि त्याचा सुद्धा खात्मा केला.
