Israil hamas war history :इस्राईल हमास युद्धाचा इतिहास

मध्य पूर्व म्हणजे युद्धाचे सर्वात मोठे क्षेत्र आहे मागील सात ते आठ दशका पासून ही जमीन युद्धाच्या आगीत जळते आहे. अरब आणि येहूदी लोकांचा हा संघर्ष काही नवा नाही हा संघर्ष मागील हजारो वर्षांपासून आहे.खरं तर आज ज्या जमिनी साठी अरब लढतायेत आणि संपूर्ण जगाला सांगण्याचा प्रयत्न करतात कि ही जमीन फक्त फिलिस्तींनी लोकांची आहे पण आपण थोडे मागे जर गेलो तर कदाचित तुम्हला सुद्धा कळेल कि ही जमीन खऱ्या अर्थाने तेथील येहूदी लोकांची आहे. मुस्लिम साम्राज्य जेव्हा मध्ये पूर्वेत सर्वीकडे आपले साम्राज्य सर्व दिशेला वाढवत होत तेव्हा त्यांनी आजच्या इस्राईल वरती सुद्धा कब्जा केला आणि तेथील येहूदी लोकांना त्यांच्याच जमिनीवरून हाकलून दिल.
आज इस्राईल झालेल्या अन्यायाच्या विरोधात लढतोय तर आज आपण बघू हमास आणि इस्राईल चा संघर्ष आणि त्या संघर्ष्याचा इतिहास.
Israel hamas war
19व्या शतकात ऑटोमन सम्राज्याच्या नकाशावर एक छोटा जमिनीचा हिस्सा होता. या भागात फक्त दोन शहर होते एक गजा आणि दुसरा खान युनूस.
त्या वेळी या भागात राहणारे काही अरब खेडे गावात सुद्धा राहत होते. हे गाव मिस्र आणि फिलिस्तीन ला जोडणाऱ्या रस्त्यावर होते.
गजा हे शहर समुद्राच्या किनाऱ्यावर होते. आपण त्या समुद्राला भूमध्य समुद्र म्हणून ओळखतो. पहिले महायुद्ध सुरु झाले तेव्हा तिथे अरब जास्त होती आणि येहूदी फक्त 6% होते त्यानंतर 1917 च्या सुमारास ऑटोमन साम्राज्य ऱ्हास झाले आणि तिथे ब्रिटिश साम्राज्य अस्तित्वात आले. आणि संपूर्ण गजा पट्टी ब्रिटिश सम्राज्याच्या आधीन झाली.
याच वेळेला बेलफोर्ड डिक्लिरेशन अस्तित्वात आले आणि हे डिक्लिरेशन आसा विचार होता कि या मुळे येहूदी लोकांमध्ये राष्ट्रवाद जन्माला आला. आणि याच जमिनिवर यहूदी लोकांसाठी देश स्थापन करण्याची चर्चा होऊ लागली.
1920ते 1940 च्या दशकात याच भागात यहूदी लोक येत होते.दुसऱ्या महायुद्धात हिटलर कडून यातना होत असताना या भागात येहुदी लोकसंख्या जास्त प्रमाणात पलायन करून येत होती.

1947 पर्यंत येहुदी लोकसंख्या या भागात 33%झाली आणि यानंतर अरब आणि येहूदी यांच्यात तणाव निर्माण होत होता आणि हा तणाव बऱ्याच वेळा हिंसक होत होता. काही अरबी लोक येहूदी लोकांच्या घरावर चालून जात असत आणि त्यांना मारहान करत असत. त्यांच्या घराला आग लावत असत. या मुळे येहूदी लोक खूप त्रस्त झाले होते आणि त्यांना आता हक्काचे घर पाहिजे होते.
यानंतर युनाटेडनेशन ने 1947साली फिलिस्तीन चे विभाजन केले आणि 55% जमीन येहूदी लोकांना दिली आणि 45%जमीन अरबी लोकांना दिली आणि या भागातील महत्वाचे शहर म्हणजे ‘येरुशा्लेम’ ला अंतराराष्ट्रीय शहर म्हणून घोषित केले.या निर्णयामुळे तेथील अरब लोक नाखुष होती.
इकडे दुसरे महायुद्ध संपले या मध्ये ब्रिटिश सम्राज्यचा सुद्धा ऱ्हास झाला आणि इंग्रजाना हा भाग सोडून द्यावा लागला. 1948 मध्ये येहूदी देश इस्राईल ची स्थापना झाली. आणि या नवीन झालेल्या देश्या विरुद्ध संपूर्ण अरब राष्ट्र एक झाले आणि इस्राईल विरुद्ध युद्ध सुरु केले.
या युद्धनंतर स्थानिक लोकांचा काहीच फायदा झाला नाही पण गजा पट्टी मिस्र देश्याच्या नियंत्रणात आली आणि ईस्ट जेरुसा्लेम जॉर्डन कडे गेल. आणि वेस्ट जेरूसलेम वरती इस्राईल चे नियंत्रण झाले.
1948च्या युद्धात गजापट्टी इस्राईल च्या हातात नाही आली पण त्यावेळचे इस्राईल कामंडर यीगाल अलोन म्हणतं होते या युद्धात इस्राईल ला जर फक्त दोन दिवस भेटले असते तर गजा आज इस्राईल च्या ताब्यात असते.

या युद्धात लाखो फिलस्तींनी लोकांचे विस्थापन झाले. या विस्थापनाला ‘नकाब’असे बोलले जाते. आणि या नंतर गजा मध्ये जागोजागी शरनार्थी दिसत होते. इस्राईल चे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गरियन यांनी 1955 साली गजापट्टीवर कब्जा करण्याचा प्रस्थावं ठेवला त्या मागचा उद्देश होता तेथील शरनार्थी लोकांना लोकांना जॉर्डन मध्ये पाठवणे.
1967 साली पुन्हा एकदा इस्राईल आणि अरब युद्ध झाले त्याला ‘सिक्स दे वार ‘ म्हणून ओळखल्या जात. या युद्धा नंतर मध्य पूर्व चा नकाशा भरपूर प्रमाणात बदलून गेला. इस्राईल ने या युद्धात ईस्ट जेरूसलेम आणि वेस्ट बँक जिंकून घेतले. या नंतर या विषयी भरपूर राजकारण झाले. खरं तर या फिलस्तींनी लोकांना उसकावण्याचं काम बाकी अरब आणि मुस्लिम राष्ट्रानी केल. आणि हमास सारख्या आतंकवादी संघटना जन्माला घातल्या.
1987साली पहिला ‘इतिफादा ‘झाला. इतिफादा हा एक अरबी शब्द आहे याचा अर्थ ‘विद्रोह आंदोलन’ करणे आहे. आणि याचा उद्देश होता वेस्ट बँक आणि पूर्वी जेरूसलेम इस्राईल च्या कब्जातून वापस घेणे. याच वेळेस ‘शेख अहमद यासिन’ ने हमास ची स्थापना केली. हमास चे पूर्ण नाव ‘हरकत अल मुकम्मा अल इस्लामिया ‘म्हणजे ‘इस्लामिक रजिस्ट्स मुमेंट ‘
हमास या संघटनेला भरपूर देशानी आतंकवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. त्या मध्ये अमेरिका, ब्रिटन,इजराइल,जपान,ऑस्ट्रेलिया, इत्यादी.
2004पर्यंत 7000 हजार इस्राईली नागरिक गजा मध्ये राहत होते आणि या लोकांसाठी वीज, पाणी, अन्न आणि इस्राईली फौज तैनात होती. त्यानंतर 2004साली इस्राईल चे पंतप्रधान एरियल शेरोन यांनी म्हटले होते.आता वेळ आली आहे कि गजा मधून सर्व इस्राईली नागरिक काढावे लागतील. आणि त्यानंतर गजा मधून सर्व इस्राईली नागरिक आणि फौज बाहेर काढली त्यानंतर हळू हळू गजा मधून इस्राईल ची ताकत कमी होत गेली. पण फिलाडेफी कॅरिडोर मिश्र आणि गजा मधून जातो तिथे आज सुद्धा इस्राईली आर्मी आहे.

इस्राईल ने सांगितले होते आम्ही गजा मध्ये स्थाई बेस ठेवणार नाही पण एअर स्पेस इस्राईलचाच असेल आणि कोस्ट लाईन वरती इस्राईल ची नजर असेल.त्या वेळेस इस्राईल ने हे सुद्धा बोलले होते कि गजा ही इस्राईल ची अधिकृत जमीन नाही पण आम्ही गजा वर नजर ठेवणार.
इस्राईल आणि गजा भुराजनीती
इस्राईल मागील सात दशकापासून एक देश आहे त्याच्या पूर्वेला आणि दक्षिणेला जमिनीचे दोन भाग आहेत. याला फिलिस्तींनी टेरीटरीज म्हणतात. पूर्व दिशेला वेस्ट बँक, दक्षिण मध्ये गजा पट्टी (या भागाला जमिनीचे दोन भाग यासाठी म्हटले आहे कि यांना देशाचा दर्जा नाही. )
वेस्ट बँक वरती फिलिस्तीन आथॉरिटी म्हणजे PA सरकार चालवते. त्यामध्ये फतेह मुमेंट चा दबदबा आहे. पण वेस्ट बँक वरती त्यांचा दबदबा नाही. कारण तिथे इस्राईल चा दबदबा दिसून येतो.
दुसरी टेरीटरी आहे गजा पट्टी जवळपास 41किमी लांब एक जमिनीचा तुकडा आहे त्याची चौडाई 6ते 12 किमी आहे. त्याची पश्चिम सीमा भुमध्य समुद्राला मिळते आणि उत्तर पूर्व सीमा इस्राईल ला लागून आहे.
2007 पासून गजा पट्टी चा कंट्रोल हमास कडे आहे. या भुभागाविषयी थोडक्यात माहिती आपण बघितली आता आपण जाऊया 7आक्टोबर 2023 कडे. याच दिवशी हमास ने आणि काही फिलिस्तींनी गटांनी इस्राईल वर हमला केला. आतंकवादी इस्राईल च्या सीमा भागात आले आणि इस्राईल चे 1200 पेक्ष्या जास्त नागरिक मारले आणि 250पेक्ष्या जास्त लोकांना बंधक बनविले. त्यानंतर इस्राईल ने गजा विरुद्ध युद्ध सुरु केले.
हे युद्ध 15महिने चालू होते. 15महिन्याच्या युद्धनंतर 17जानेवारी 2025 ला तीन चारणात युद्ध विराम लागू करण्यासाठी इस्राईल आणि हमास तयार झाले. 19जानेवारीला पहिले चरण चालू साले ते 1मार्च पर्यंत संपले पण युद्ध समाप्त न्हवते झाले.
पर्ल हार्बर :जपान च्या या चुकीमुळे, हिरोशीमा आणि नागासाकी घडले
कारण हमास चे आतंकवादी इस्राईली बंधकांना सोडायला तयार न्हवते इस्राईली सरकार ने विनंती करूनही हमास चे आतंकवादी बंधकांना सोडायला तयार न्हवते. त्या मुळे इस्राईल सुद्धा म्हणतं होते जो पर्यंत युl हमास ला संपवणार नाही तोपर्यंत युद्ध थांबणार नाही.
साहजिकच या युद्धामुळे गजा मध्ये संपूर्ण जणजीवन विस्कळीत झाले आणि या युद्धा मुळे इस्राईल चे सुद्धा भरपूर नुकसान झाले. पण कदाचित हे युद्ध बंद होणारच नाही किंवा एक दिवस इस्राईल संपूर्ण गजावर आपले नियंत्रण आणेल.