नमस्कार मित्रानो मी अविनाश मी आपल्याला geopolitics मध्ये घडलेल्या महत्वपूर्ण घटना विषयी सांगत असतो.
आज आपण बघणार आहोत इराक या देशाचा तानाशहा सद्दाम हुसेन याला पकडण्याची संपूर्ण कहाणी.
सद्दाम हुसेन याला एका मिशन द्वारे पकडेल त्या मिशन चे नाव होते ऑपेरेशन रेड डॉन.
30मार्च 2003 ला गठबंधन सैनिकांनी सद्दाम हुसेन ला सत्तेपासून बाजूला केले आणि इराकि लोकांना सद्दाम हुसेन च्या जाचापासून वाचवले.
दोन ते तीन आठवड्यामध्ये अमेरिकी जवानांनी इराकची राजधानी बगदाद आपल्या ताब्यात घेतले. पण सद्दाम हुसेन राजधानी बगदाद सोडून पळून गेला.

त्यानंतर इराक च्या सत्तेवर कोणीही न्हवते त्या मुळे सत्तेवर राष्ट्रपती असणे आवश्यक होते आणि ह्यासाठी अपदस्त राष्ट्रपती राष्ट्रपती ठरवण्यासाठी अमेरिकेचे नऊ महिने गेले.
हुसेन यांच्या सत्ते नंतर 4th इन्फेन्ट्री डिव्हिजन ने हुसेन यांचे राहते घर आणि आसपास त्यांची प्रॉपर्टी वरती छापा टाकला.
2003 च्या उन्हाळ्यात अमेरिकी सेना ने गुप्त एजेंट आणि दुभाषिक, HUMINT टीम यांना तैनात केले.
या लोकांनी स्थानिक लोकांची पूछताछ केली आणि सद्दाम हुसेन यांच्या परिवाराची माहिती काढली..
सुरावतीला त्या लोकांचा शोध घेण्याचे ठरवले ज्या लोकांचे नाव “ब्लॅक लिस्ट “मध्ये होते किंवा मोस्ट वांटेड “डेक ऑफ कार्ड्स ” मध्ये होते. त्यांनी सुरवातीला हुसेन चे राष्ट्रपती सचिव आणि काही इराकी नेत्यांना पकडले.
जेव्हा अमेरिकी या लोकांना पकडत होते तेव्हा दूरदूर पर्यंत सद्दाम हुसेन चा पत्ता न्हवता.
तेव्हा त्यांच्या लक्ष्यात आले कि सद्दाम ला पकडण्यासाठी त्यांचे राजकीय सहकारी काहीच कामाचे नाहीत.
त्याउलट सद्दाम हुसेन यांचे वेक्तिगत संबध ज्यांच्या सोबत आहेत त्यांनाच पकडावे लागेल.
4th इन्फ्रेन्ट्री डिव्हिजन, 1st ब्रिगेड चे गुप्त एजेंटांनी हुसेन यांच्या जवळ असलेले परिवार यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांची विचारणा करण्यासाठी एक ‘तीन स्तरीय ‘ रनणिती नेमली.
त्यांनी सद्दाम हुसेन यांच्या जवळच्या परिवारा सोबत व्यक्तिगत संबंध वाढवले. त्यांची विचारणा केल्यानंतर सद्दाम हुसेन विषयी भरपूर माहिती समोर आली.
वेगवेगळ्या स्रोता मधून जी माहिती समोर आली त्यानुसार गुप्त कर्मचाऱ्यांनी अल -मुसलीत नावाच्या बंधुवर लक्ष केंद्रित केले. हे भाऊ म्हणजे हुसेन यांच्या अंग रक्षकापैकी एक होते.
मुसलीत परिवार हा हुसेन यांचा सर्वात विश्वासू आणि जवळचा परिवार होता. कारण त्यांनीच हुसेन यांचे अगरक्षक ठरवले होते आणि ठरवत होते.
11आक्टोबर ला अल मुसलीत च्या सर्वात लहान भावाला पकडले.आणि त्याला 4th id मध्ये नेण्यात आले त्याची विचारणा करताना इब्राहिम अल मुसलीत चा ड्राइवर आणि त्याचा जवळचा मित्र बसीम लतीफ विषयी माहिती मिळाली.
बसीम लतीफ कडून जी माहिती मिळाली ती माहिती खूप महत्वाची होती कारण त्यानंतर हुसेन कोठे आहे याचे धागे दोरे मिळायला सुरवात झाली.
लतीफ याला पुन्हा एकदा पूछताछ करण्यासाठी बोलावले,त्याने यावेळी इब्राहिम अल मुसलीत चा पत्ता सांगितला.
लतीफ याची चौकशी झाल्या नंतर समोरचा घटनाक्रम खूप वेगाने होत होता.
13डिसेंबर ला सकाळी सकाळी टास्क फोर्स 121ने लतीफ द्वारा जे स्थान सांगितले त्या सर्व जागेवर छापे मारले आणि इब्राहिम अल मुसलीत ला पकडले.
इब्राहिम ची जेव्हा चौकशी झाली तेव्हा त्याने सांगितले सद्दाम हुसेन तकरिक च्या दक्षिण भागात ‘एड डावर ‘पाशी एका एका शेतात लपला आहे.
त्यानंतर सायंकाळी सहा च्या सुमारात operation रेड डॉन च्या साहाय्याने ब्रिगेड 1,टास्क फोर्स 121,ने टीगारस नदी पासी दोन फार्महाउस वरती छापा मारला पण त्यांना हुसेन सापडला नाही.
त्यानंतर MUMINT ने तो जिथे लपला आहे त्याचा शोध लावला. त्यानंतर 121फोर्स ने ज्या जागी लपला होता त्या जागी जाऊन पकडले.
हुसेन जमिनीखाली एका गड्ड्यात लपला होता जेव्हा टीम तिथे गेली तेव्हा त्या गड्ड्यात सद्दाम हुसेन होता. आणि त्यांतर टीम ने त्याला पकडले.
