आपण बघत आहोत सिरिया मधील गृह युद्ध भाग एक मध्ये काही भाग बघितला आता बघूया भाग 2
गृहयुद्ध
सिरियाई विद्रोह हा गृहयुद्धा मध्ये कधी बदलून गेला हे कोणालाच समजले नाही. जुलै महिन्यात सिरियाई सैन्या मधून काही विद्रोही पळून गेले होते आणि त्यांनी एक विद्रोह गट निर्माण केला त्याचे नाव होते ‘फ्री सिरीयन आर्मी ‘पण स्थानिक लोकांनी त्यांना मान्यता दिली नाही.
2011च्या शेवटी आणि 2012च्या सुरवातीला हा सत्तासंघर्ष थांबवण्यासाठी अंतरराष्ट्रीय संघटनानी भरपूर प्रयत्न केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. नोव्हेंबर 2011च्या सुरवातीला काही सिरीयन अधिकाऱ्यांनी एका समझोत्यावर सहमती दाखवली. अरब लीग ने सांगितले सिरियाई सरकार प्रदर्शन कारी लोकांवर हिंसा करते ती थांबवावी, शहरा मधून सैनिक आणि त्यांचे टॅंक हटवावे, प्रदर्शनकारी जे अटक झाले होते त्यांना सोडावे. डिसेंबर 2011मध्ये डिसेंबर 2011मध्ये सिरिया सरकार ने अरब लीग च्या अधिकाऱ्यांना सिरिया मध्ये येऊन निरीक्षण करण्याची अनुमती दिली.
दुसरा करार, संयुक्त राष्ट्र महासचिव च्या मध्यस्थीने झाला. कोफी अन्नान च्या नेतृत्वात संयुक्त राष्ट्र आणि अरब लीग यांच्या द्वारा एका प्रयोजित संयुक्त राष्ट्र महासभा 75व्या सत्रात एक युद्ध विराम झाला. पण त्यानंतर लवकरच पुन्हा एकदा सिरिया मध्ये हिंसा सुरु झाल्या आणि सुरवाती पेक्ष्या जास्त प्रमाणात ह्या हिंसा होत्या. आणि त्यामुळे अरब लीग आणि सयुक्त राष्ट्राची टीम यांना वापस बोलावण्यात आले.प्रदर्शनकारी आणि सरकार यांच्यात शांती स्थापित करण्यात सफलता भेटली नाही.
त्यानंतर संयुक्त राष्ट्र आणि अरब लीग ने या समाधानासाठी आंतरराष्ट्रीय संमेलन मध्ये जिनेवा विज्ञप्ती तयार केली. पण या साठी अमेरिका आणि रुस यावर सहमत न्हवते.कारण येणाऱ्या काळात सिरियाच्या सरकारात असद ला घ्यायचे का नाही हा विषय होता.
2012च्या सुरवातीला स्पष्ट झाले होते कि ऑगस्ट 2011मध्ये इस्ताबूल मध्ये गठीत विध्यार्थी समूह सिरिया राष्ट्रीय परिषद (snc)विपक्षाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खूप कमजोर आहे कारण त्यांच्यात अंतर्गत मतभेद होते.
त्यानंतर नोव्हेंबर मध्ये सिरियातील सर्व सरकार विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकार विरोधात एक गटबंधन तयार केले ‘सिरिया क्रांतिकारी आणि विपक्षा साठी’ राष्ट्रीय गठबंधन तयार केले. आणि केवळ एका महिन्यात भरपूर देशानी यांना मान्यता दिली. 2012च्या उन्हाळ्यात विद्रोही लोकांना काही प्रमाणात सफलता मिळवता आली. सिरियाच्या सैनिकांना उत्तर आणि पूर्व च्या इलाख्यातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे विद्रोहीना पहिली वेळ एका महत्वपूर्ण जागेवर नियंत्रण करता आले.

जैले महिन्यात सिरियाचे सर्वात मोठे शहर अलेप्पो वरती हल्ला केला आणि शहराच्या पूर्व भागात नियंत्रण केले.
2013च्या सुरवातीला सिरीयन सैनिकांनी विद्रोहीना बरेच मागे ढकलले विद्रोहीनी उत्तरी भागात आपली पकड मजबूत बनवली. पण त्यांच्याकडे सैन्याच्या विरोधात लढण्यासाठी हात्त्यार कमी होते त्या मुळे ते कमजोर पडले आणि सिरीयन आर्मी सुद्धा इथे कमी पडत गेली.
जे क्षेत्र विवादित होते त्या क्षेत्रात लढाया जास्त प्रमाणात होत होत्या. त्यामुळे सामान्य माणूस सुद्धा त्या मध्ये नहाग मारल्या जात होता. आणि या सामान्य माणसाच्या मृत्यू चा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला होता.
ही लढाई कोणत्याही निर्णयाकडे जात न्हवती ना सरकार जिंकले होते ना विद्रोही त्या मुळे ज्यांच्या त्यांच्या अंतरराष्ट्रीय सहयोगिनी समर्थन वाढवायला सुरवात केली. टर्की, सौदी अरब आणि कतर हे देश विद्रोहीना हत्यार देत होते. अमेरिकन सरकार हत्यार देण्यासाठी घाबरत होते कारण त्यांना भीती होती कि शस्त्र आतंकवाद्याच्या आणि कट्टर पंथी लोकांच्या हाताला लागतील. 2012च्या शेवटी हिजबुल्ला संघटनाने सुद्धा सिरिया सरकार ला मदत दिली.
त्यानंतर सिरिया गृहयुधाच्या दिशेने वाटचाल करू लागला.
युद्धात रासायनिक हत्त्यार

21ऑगस्ट 2013ला दमिश्क शहराच्या भागात रासायनिक हाथीयारांचा हल्ला झाला आणि हजारो लोक मारल्या गेले त्यानंतर सिरिया मध्ये अंतरराष्ट्रीय सैन्य कारवाईसाठी आव्हान करण्यात आले.
सिरियाच्या विपक्ष दलानि सरकार वरती आरोप केले कि हे हल्ले सरकार समर्थीत लोकांनी केले पण असद सरकार ने साफ नकार दिला आणि विद्रोही लोकांना जिम्मेदार ठरविले.त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या हाथीयार निरंक्षकांनी रासायनिक स्थळावर सबूत एकत्र केले आणि सिरीयन सरकार ची निंदा केली. अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स यांनी सांगितले होते ते असद सरकार च्या विरोधात कारवाई करण्या संबंधि विचार करत आहेत. त्यानंतर रुस, चीन आणि इराण यांनी सुद्धा असद सरकार ला उधड पणे पाठिंबा दिला. आणि पश्चिम देशा विरोधात लढण्याची ग्वाही दिली.
ऑगस्ट च्या शेवट पर्यंत अंतरराष्ट्रीय कारवाई होणार ही गोष्ट फिकी पडली. अमेरिका आणि इंग्लंड हे सिरियामध्ये सैन्य कारवाईच्या विरोधात होते. इंग्लंड संसदेत सिरिया मध्ये सैन्य कारवाई करण्या संबंधी मतदान झाले आणि विफल ठरले. अमेरिकी काँग्रेस मध्ये सुद्धा 10सप्टेंबर ला मतदान होणार होते पण ते स्थागित करण्यात आले. आणि त्याच वेळेला कुटनीती सर्वांच्या कामी आली. 14सप्टेंबर ला रुस सिरिया आणि अमेरिका यांच्या त एक करार झाला त्या नुसार सिरिया मधील संपूर्ण रासायनिक हत्यार आंतरराष्ट्रीय नियंत्रणात असतील असे ठरले या कराराला लागू केले 30जून 2014 साली आणि या कराराची समय सीमा पर्यंत सिरिया मधून रासायनिक हत्यार काढून घेण्यात आले.
नुसरा फ्रंट आणि isis चा उदय

2013साली इस्लामिक आतंकवाद्यानी महत्वाच्या जागी कब्जा करायला सुरवात केली. कारण तोपर्यंत विद्रोही सैनिक आणि सरकार यांच्यातील लढाईने त्यांचे सैनिक कमजोर झाले होते.
नुसरा फ्रंट (जबाहत अल नुसरा )सिरिया मध्ये सक्रिय असलेली संघटना अल कायदा सोबत मिळालेली होती. ही संघटना बाकीच्या आतंकवादी तुलनेत मोठी होती.
इकडे एप्रिल मध्ये isis चा ‘अबू बक्र अल बगदादी ‘ने घोषणा केली होती कि इराक मध्ये isis संघटना नुसरा फ्रंट सोबत मिळवेल. पण नुसरा फ्रंट आणि isis यांच्यात छोट्या मोठ्या लढाया होत राहिल्या. कारण isis ला सिरिया मध्ये आपले पाय रोवायचे होते. ज्याची सुरवात ‘अल रक्का ‘शहरातील ‘फरात’ घाटी पासून झाली आणि त्याचा विस्तार इराक सिरिया सीमा भागा पर्यंत झाला.

अंतराष्ट्रीय हस्तक्षेप आणि रुस चा प्रवेश
इराक मध्ये isis ची अचानक बढत झाली. ज्याच्या सोबत हिंसक आणि क्रूर प्रचाराची सुद्धा सुरवात झाली. त्यावेळी जागतिक पातळीवर isis विरोधात कारवाईची मागणी होत होती. त्यानंतर ही मागणी आणखी त्रिव होत गेली.
8ऑगस्ट ला अमेरिकेने isis ला उत्तरी इराक मध्ये रोकून धरले कारण समोर कुर्द क्षेत्र होते या भागात इसाई आणि यजदी समुदाय राहत होते. त्यामुळे अमेरिकेने isis वरती हवाई हल्ले सुरु केले. पण त्यानंतर isis च्या आतंकवाद्यानी काही क्रूर वीडियो पाठवायला सुरवात केली ज्यामध्ये पत्रकारांचे गळे कापले होते. 33डिसेंबर ला अमेरिका आणि अरब देश यांनी एक गठबंधन करून सिरिया मध्ये isis च्या ठिकाणावर हवाई हमले केले.
2015मध्ये रुस यामध्ये आणखी सक्रिय झाला.’लताकीया ‘मध्ये एका हवाई अड्डयावर रुसी सैनिकांना तैन्यात करण्यात आले.

सप्टेंबर मध्ये रुस ने पहिला हवाई हमला केला. रशियाच्या अधिकाऱ्यांनी दावा केला होता कि हवाई हमले isis ला निशाणा बनवत आहेत. पण त्यानंतर अमेरिकेने आरोप केला कि रशिया असद च्या विरोधात लढणाऱ्या विद्रोही लोकांवर हल्ले करत आहे. रुस ने सुद्धा अमेरिकेवर आरोप केला होता कि अमेरिका isis च्या ठिकाणावर हल्ला न करता सिरीयन आर्मी वर करत आहे.
सप्टेंबर 2016मध्ये रुस आणि सिरीययी सैनिक आणि पश्चिम समर्थीत विद्रोही मध्ये युद्ध विराम संपल्यानंतर रुस ने व सिरीयन सैनिकांनी विद्रोहीच्या कब्जात असलेले ‘अल्लेपो’ शहर आणि त्याचा पूर्वी हिस्सा वर आपले ध्यान केंद्रित केले. त्यानंतर रसियाने भरपूर हवाई हल्ले केले.
2016पर्यंत isis काही वर्ष उत्तरी सिरिया आणि पूर्वी सिरिया मध्ये अजेय होत होता. त्यानंतर कुर्द सैनिक, अमेरिकी सहयोगि, इराण रुस समर्थीत असद सैनिक यांच्यातील टाकरावणे isis कमजोर पडू लागला.
उत्तरेला कुर्द आणि तुर्की समर्थीत सैनिक यांनी तुर्की सीमा भागात आपली पकड मजबूत केली. त्यामुळे isis च्या हातून एक महत्वपूर्ण क्षेत्र गेले. आणि अमेरिकेने isis वरती हवाई हमले आणखी जास्त वाढवल्यामुळे isis खूप जास्त कमजोर झाले.
असद सरकार पडले
2024मध्ये एक नवीन विद्रोह झाला त्यावेळी असद सरकार ला आंतरराष्ट्रीय समर्थन जास्त मिळत न्हवते. रुस युक्रेन युद्धा मुळे रुस ची असद ला सहायत्ता खूप कमी होती. आणि इराण आणि इस्राईल यांच्यामध्ये तणावपूर्ण वातावरण होते. त्यामुळे असद ला इराण कडून सुद्धा जास्त समर्थन मिळत न्हवते. आक्टोबर मध्ये हिजबुल्हाने सुद्धा सिरिया मधून त्यांचे माणसं वापस बोलावले होते.
त्यानंतर hts एका आठवढ्यात ‘हामा’ पर्यंत आपला विस्तार करण्यात त्यांना यश मिळाले.त्यानंतर ‘दरारा आणि होम्स वरती 7डिसेंबर ला कब्जा केला. त्यानंतर विद्रोही सेना ‘दमिश्क’ शहरात आली आणि रातो रात त्यांनी ‘दमिश्क’शहरावर आपले नियंत्रण मिळवले. त्यावेळी त्यांना समजले कि असद हे देश सोडून पळून गेले होते. त्यानंतर सिरिया मध्ये नवीन सरकार चे गठन करण्यात आले आणि असद सरकार कायमचे कोसळले.असद यांनी रुस मध्ये राजकीय आश्रय घेतला आहे.
