सिरियाई गृहयुद्ध ज्याने जग दोन भागात विभागले गेले होते. -भाग 1

मार्च 2011मध्ये सिरीयाच्या एका भागात लोकशाही मार्गाने विरोध प्रदर्शन सुरु झाले. प्रदर्शनाचे कारण होते असद सरकार बरखास्त करण्याची मागणी कारण असद सरकार हे सत्तावादी होते. आणि याची सुरवात 1971मध्य झाली जेव्हा ‘बशर अल असद ‘ चे वडील ‘हाफिज अल असद ‘ हे सिरियाचे राष्ट्रपती झाले.

हे प्रदर्शन दाबण्यासाठी सिरीयाई सरकार ने प्रदर्शनकारी लोकांसोबत हिंसा केली होती. ज्यामध्ये, पोलीस, सेना आणि अर्धसैनिक यांचा उपयोग केला होता.

नंतर हे प्रदर्शन गृहयुद्धात बदलून गेले. नोव्हेंबर 2024 च्या शेवटी सैन्य सहयोग समाप्त झाला.त्यामुळे सिरिया देशामधील विपक्ष आणखी मजबूत झाला. आणि असद सरकार हे कमजोर पडले. डिसेंबर च्या सुरवातीला ‘बशर अल असद ‘ देश सोडून पळून गेले आणि रशिया मध्ये त्यांनी आश्रय घेतला.

तर आज आपण पाहणार आहोत सिरिया देशातील गृह युद्ध आणि त्यामागील इतिहास.

सिरिया मध्ये विद्रोह

जानेवारी 2011मध्ये सिरियाचे राष्ट्रपती ‘बशर अल असद ‘यांना विचारले कि अरब जगतात जे सत्तावादी सरकार च्या विरोधात विरोध प्रदर्शन सुरु आहेत त्यामध्ये ‘ट्युनिशिया,’ आणि ‘मिस्र ‘या देशातील सत्तावादी सरकार संपले आहे आणि हे प्रदर्शन सिरिया पर्यंत पोहचेल का? तेव्हा असद यांनी सांगितले होते कि सिरिया मध्ये आर्थिक समस्या भरपूर आहेत. आणि ही समस्या सुधारण्यासाठी प्रगती खूप हळू आहे. पण त्यांना विश्वास होता कि सिरिया मध्ये असे कोणतेही प्रदर्शन होणार नाही कारण ते अमेरिका आणि इस्राईल चा विरोध करतात आणि ही मान्यता सिरीयन लोकांचीच आहे.

पण त्या नंतर काही आठवड्यातच सरकार विरोधात प्रदर्शन सुरु झाले. आणि त्यावेळी संपूर्ण जगाला समजले कि असद ने जे सांगितले त्या पेक्ष्या जास्त आर्थिक समस्या सिरिया मध्ये आहेत.

एकच घराणे सत्तेवर असल्यामुळे आर्थिक समस्या आणखी जास्त वाढतच गेली. जेव्हा ‘बशर अल असद’ यांनी पदभार सांभाळला तेव्हा वर्ष होते 2000 आणि ‘बशर अल असद ‘यांच्याकडे जनता सुधारक आधुनिकरन करणारा अश्या नजरेने बघत होती.

असं जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा जनतेमध्ये एक नवीन अशा निर्माण झाली होती पण ती काही पूर्ण झाली नाही पण पण त्या उलट असत ना त्यांच्या वडिलांसारखेच केले आणि असंच सरकार विरोधी जर कोणी जात असेल तर त्याला क्रूर मारल्या जात असे

सुरुवातीला असद अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फायदा जनतेला न मिळता देशातील पुंजीपतींना च भेटला . त्यामुळे सिरिया मध्ये आर्थिक असमानता जास्त प्रमाणात वाढू लागली.

सिरीयच्या विद्रोहामध्ये पर्यावरण संकटाची सुद्धा भूमिका होती. 2006ते 2010 पर्यंत सिरिया मध्ये दुष्काळ होता. त्यामुळे लाखो शेतकरी कर्जबाजारी होऊन गरिबी रेषेखाली गेले. त्यामुळे गावातील जनता शहरा कडे गेली. मार्च 2011 मध्ये सिरियाच्या दक्षिण भागात जिथे दुष्काळ पडला होता तिथे पहिले आणि मोठे विरोध प्रदर्शन झाले होते.

या विरोध प्रदर्शनामध्ये एक मुलांचा ग्रुप आला होता ते सुद्धा प्रदर्शन करत होते आणि असद विरोधी काही पोस्टर त्यांनाकडे होते. त्यानंतर तेथील पोलिसांनी त्या मुलांच्या ग्रुप ला अटक केली आणि त्यांना प्राताडित केले.

स्थानिक जनता राजनीतिक आणि आर्थिक सुधारणासाठी रस्त्यावर आले होते. तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. प्रदर्शन करणार्यांना अटक झाली आणि त्यांच्यावर गोळीबार सुद्धा केला. त्यामुळे संपूर्ण सिरिया भर विरोध प्रदर्शन सुरु झाले आणि ते काही प्रमाणात हिंसक सुद्धा झाले होते. तेव्हा प्रदर्शनकारी लोकांवर गोळीबार केलेल्याचे video सुद्धा आले होते.

सुरवातीपासून सरकार आणि विद्रोही यांच्यात एक संप्रदायिक तेढ होते. या मध्ये प्रदर्शन करणारे सुन्नी होते आणि सत्ताधारी असद हे ‘आलावी ‘पंथाचे होते. असद घराणे हे सिरिया मध्ये आल्पसंख्यक होते.

सुरवातीला संप्रदायिक विभाजन जास्त प्रमाणात न्हवते. जसा जसा संघर्ष होत गेला तसें संप्रदायिक विभाजन होत गेले. पण सुरवातीपासूनच काही कट्टरपंथी सिरिया मध्ये ‘आलावी’ पंथीयांना मारत होते.

त्यानंतर विरोध प्रदर्शन जास्त प्रमाणात होत गेले आणि सरकार सुद्धा या विरोधात कठोर कारवाई करत होते.

असद सरकार ने ज्या शहरात जास्त प्रदर्शन होत होते ते संपूर्ण शहर घेरायला सुरवात केली. त्यावेळी काही प्रदर्शन कारणाऱ्या लोकांनी सरकार विरुद्ध हाथीयार उचलायला सुरवात केली. त्यानंतर असद सरकार ने सुद्धा मोठे पाऊल उचलायला सुरवात केली आणि जून महिन्यात सिरियाई सेना ‘टॅंक’ घेऊन ‘जिस्र अल शुगर ‘ नावाच्या शहरात गेली. तेव्हा भरपूर लोकांचे पलायन झाले आणि ते लोक तुर्की मध्ये गेले.

siriyan civil war

2011च्या उन्हाळ्यापर्यंत सिरिया देश्यातील विद्रोह बद्दल संपूर्ण जगाला कळाले. आणि त्या वेळेला जग सुद्धा दोन भागात विभागले गेले काही देश असद सरकार कडून होते तर काही देश विद्रोही लोकांना पाठिंबा देत होते. अमेरिका आणि युरोपीय संघ असद सरकार ची आलोचना करत होते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा आणि काही युरोपीय राष्ट्रअध्यक्ष असद ला आपला पदभार सोडण्याचे सांगत होते. 2011च्या शेवटी कतर,तुर्की आणि सौदी अरब यांनी मिळून असद च्या विरोधात एक गट निर्माण केला. यामध्ये सिरिया देशाचे जुने मित्र इराण आणि रुस ने असद सरकार ला आपले समर्थन दिले.

siriya war

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *