7डिसेंबर 1941 प्रशांत महासागराच्या एका द्विप समूहावर दोन घंटे अशी बॉम्ब भेक झाली कि दुसऱ्या महायुद्धचे वारे फिरले.
जपान च्या या चुकीमुळे अमेरिका दुसऱ्या महायुद्धात उतरली आणि दुसऱ्या महायुद्धाची रूपरेखा पूर्ण पणे बदलली.
त्यानंतर अमेरिकेने जपान च्या हिरोशीमा आणि नागासाकी शहरावर परमाणू हमला केला. आणि दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाली.
चला तर आज आपण बघू जपान ने पर्ल हार्बर वरती केलेल्या हल्ल्याची थोडक्यात माहिती.

त्या दिवशी सकाळी सकाळी हवाई द्विप समूहावरील अमेरिकी नौसेनेच्या एका अड्डयावर जपान ने हमला केला. हा हमला एवढा मोठा होता कि पर्ल हार्बर वर तैनात असलेले अमेरिकेचे आठ जंगी जहाज नष्ट झाले. यामधून चार समुद्राच्या तळाशी गेले.
दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेवरती हा पहिला हमला होता या हमल्यापूर्वी अमेरिका दुसऱ्या महायुद्धा पासून दूर होती पण जपान ने केलेल्या आकस्मित हमल्या मुळे अमेरिका या महायुद्धात उतरली.
जपान च्या या हमल्या मध्ये 2400 पेक्ष्या जास्त अमेरिकी जवान मारल्या गेले आणि सर्व 19जहाज निकामी झाले. त्यामध्ये आठ जंगी जहाज होते. आणि 328अमेरिकी विमान सुद्धा नष्ट झाले.
एवढा सगळा विनाश करायला जपान ला एक घंटा पंधरा मिनिटापर्यंत बमबारी करावी लागली. या हमल्यात 100पेक्ष्या जास्त जपानी सैनिक सुद्धा मारले गेले. त्यानंतर अमेरिका सुद्धा मित्र राष्ट्राकडून या महायुद्धात उतरली.
7डिसेंबर 1941 च्या सकाळी पर्ल हार्बर वर जो हमला झाला ती केवळ एक घटना न्हवती तर तो जपान ने जाणीवपूर्वक केलेला हमला होता.
हा हमला अमेरिकेसाठी खूप आश्चर्यात टाकणारा होता. कारण त्याच वेळेला वॉशिंगटन मध्ये जपानी प्रतिनिधी अमेरिकेच्या विदेश मंत्र्या सोबत बातचीत करत होते. विषय होता जपान वरती अमेरिकेने लावलेले आर्थिक प्रतिबंध कमी करणे.
आणि त्याच वेळेला जपान ने अमेरिकेवर हमला केला. अमेरिकेने जपान वरती या साठी प्रतिबंध लावले होते कि जपान चीन मध्ये जास्त प्रमाणात हस्तक्षेप करत होता. त्यानंतर अमेरिकेने चीन ला सैन्य सहायत्ता देण्याचे ठरवले होते. याच कारणाने जपान ने अमेरिकेच्या पर्ल हार्बर वरती हमला केला.
त्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्र्पती फ्रँकलीन डी रुजवेल्ट ने सुद्धा जपान विरुद्ध युद्धाची घोषणा केली.
जपान अमेरिका संबंध
दुसरे महायुद्ध समाप्त झाल्यानंतर सुद्धा अमेरिका आणि जपान मध्ये संबंध बिघडलेले होते.
2016च्या मे महिन्यात तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्रपती यांनी यांनी हिरोशीमा शहरला भेट दिली होती.

बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते ज्यांनी हिरोशीमा शहराला भेट दिली.