आज रशिया आणि युक्रेन युद्ध चालू आहे या युद्धात अनेक लोक बेघर झाले भरपूर लोक या युद्धात मारले गेले. एकीकडे रुस आणि युक्रेन युद्ध चालू आहे तर दुसरी कडे पॅलेस्टिन आणि इस्राईल युद्ध चालू आहे. संपूर्ण जग या युद्धच्या काळ्या गर्द छायेत गेले आहे. अश्याच प्रकारे साठ वर्ष्यापूर्वी अमेरिका आणि सोवियत रुस मध्ये परमाणू युद्ध होण्याची शक्यता होती. पण ती घटना टाळाली गेली.
60वर्ष्यापुर्वी जग परमाणू युद्धच्या संकटात गेलं होत.
आणि या संकटाला ‘क्यूबा मिसाईल संकटा ‘च्या नावाने ओळखले जाते. क्यूबा मिसाईल संकटाची सुरवात 1962 मध्ये झाली होती.
14आक्टोबर ला अमेरिकन ‘टोही’ विमानाने बघितले कि अमेरिकेच्या फक्त काही किमी दूर अंतरावर क्यूबा मध्ये सोवियत संघाने परमाणू मिसाईल तैनात केली होती.
तेव्हा अमेरिकेला येणारा खतरा समजला त्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती यांना सोवियत संघा कडे शांततेचा प्रस्ताव पाठवावा लागला.
रुस ने बदला घेतला
क्यूबा एक लहान द्विपीय कम्युनिस्ट देश ज्याची अमेरिकेसोबत दुस्मनी होती. कारण क्यूबा हा देश कम्युनिस्ट असल्या कारणाने अमेरिकेचा वैचारिक विरोधी होता. आणि अमेरिकेने सुद्धा क्यूबा देश्याच्या राजकारणात हस्तक्षेप केला होता. क्यूबा हा अमेरिकेचा शेजारी देश आहे.
सोवियत संघाने सुद्धा क्यूबा देशाचा वापर आपल्याच फायद्या साठी केला होता. कारण सोवियत संघाला सुद्धा अमेरिकेच्या शेजारी आपल्या विचाराचा देश पाहिजे होता. म्हणजे त्या देश्याच्या आडून अमेरिकेत लक्ष ठेवता येत होते.
1962मध्ये शीत युद्ध हे चरम वरती होती. आणि त्याच वेळेला रुस ने अमेरिकेच्या जवळ क्यूबा मध्ये परमाणू मिसाईल ठेवायला सुरवात केली.
पण ही रुस ची एकतरफा कारवाई न्हवती. अमेरिकेने सुद्धा ब्रिटन, तुर्की आणि इटली मध्ये 100पेक्ष्या जास्त परमाणू मिसाइल ठेवल्या होत्या.
आणि रुस ने सुद्धा क्यूबा मध्ये मिसाईल ठेऊन बदला घेतला होता.
ह्या मिसाईल जिथे ठेवल्या होत्या तेथून फ्लो्रीडा तट फक्त 150km दूर होता.
शीत युद्धा मध्ये क्यूबा मिसाईल संकट एक तणावपूर्ण घटना होती. आणि कोणत्याही क्षणात युद्धाची ठिणगी पडली असती.
14आक्टोबर ला अमेरिकेच्या एका जासूसी विमानाने क्यूबा मध्ये जाऊन 928 फोटो घेतले. त्या मध्ये रुसी परमाणू मिसाईल दिसल्या होत्या.
युद्ध टळले

अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन एफ कॅनडी ने क्यूबा ची नौसैनिक नाकाबंदी सुरु केली होती. त्याच्या मागचा उद्देश होता रुसी मिसाइल जी क्यूबा मध्ये रुस आणत होते त्याला अडवणे.
28आक्टोबर ला अमेरिकी राष्ट्रपती ने सोवियत संघाला एक संदेश पाठवला आणि येणारे संकट टळले.

सोवियत संघांचे नेता निकिता खुर्चेव्ह यांनी क्यूबा मधून मिसाइल हटवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अमेरिकाकडे दोन शर्ते ठेवली एक तर अमेरिका क्यूबा वरती हल्ला करणार नाही आणि दुसरी म्हणजे तुर्की देश्यातील मिसाईल काढून घेणे.