इराण परमाणू कार्यक्रम काय आहे? जाने अमेरिका आणि इस्राईल नेहमी सतर्क असतात.

इराण आणि जगातील सहा प्रमुख ताखती यांनी इराण परमाणू समझोता केला होता. त्या मध्ये अमेरिका सुद्धा होती पण वर्ष 2018मध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा या समझोत्यातून अमेरिका बाहेर पडली.

त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण वरती पुन्हा आर्थिक प्रबधं लावले त्यामुळे इराण नाराज झाले. आणि इराण वरती सैन्य कारवाईची सुद्धा धमकी दिली.

तर इराण आणि अमेरिका, इस्राईल यांच्यात नेहमी वाद होत असतो त्या वादाचे मुख्य कारण आहे इराण परमाणू कार्यक्रम तर आज आपण बघणार आहोत इराण परमाणू कार्यक्रम विषयी या परमाणू कार्यक्रमा मुळे इस्राईल आणि अमेरिका नेहमी सतर्क असतात. या मध्ये इस्राएल च्या म्हणण्यानुसार जर इराण हा परमाणू संप्पन देश साला तर ते इसराईल च्या अस्तित्वासाठी खतरनाक आहे त्यामुळे नेहमी इस्राईल हा इराणच्या परमाणू कार्यक्रमा विरोधात असतो आणि त्या विरोधात कारवाई करत असतो. तर बघूया थोडक्यात काय आहे? इराण परमाणू कार्यक्रम ज्या मुळे इस्राईल आणि अमेरिका नेहमी सतर्क असतात.

इराण ला परमाणू बॉम्ब ठेवण्याची परवानगी का नाही?

इराण चे म्हणणे आहे त्यांचा परमाणू कार्यक्रम केवळ नागरी उद्देशासाठी आहे. इराण नेहमी सांगत असतो कि इराण परमाणू बॉम्ब विकसित करत नाही.पण संपूर्ण जगभरातील परमाणू कार्यक्रमावर नजर ठेवणारी संस्था ” आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजन्सी “(IAEA) इराण च्या या दाव्याला सहमत नाही.

वर्ष 2002 मध्ये जेव्हा इराण च्या गुप्त परमाणू ठिकाणाचा पत्ता लागला. तेव्हा पासून इराण हा येणाऱ्या काळात परमाणू बॉम्ब बनवेल असा संशय येत होता.

NPT नावाची अंतरराष्ट्रीय संस्था सैन्या साठी आणि बाकी गरजा साठी परमाणू तकनिक वापरण्याची अनुमती देते. यामध्ये शेती,ऊर्जा, चिकित्सा साठी अनुमती आहे. पण परमाणू बॉम्ब बनवण्याची कोणतीही परवानगी देत नाही.

वर्ष 2018 मध्ये जेव्हा अमेरिका JCPOA पासून दूर झाला तेव्हा पासून इराण ने अमेरिकेने लावलेल्या प्रतिबंधा विरुद्ध उ्लंघन करायला सुरवात केली.

इराण चा परमाणू बॉम्ब किती विकसित आहे?

इराण ने युरेनियम संवर्धणासाठी हजारो सेंट्रिंफ्युज मशीन विकसित केली आहे. आणि यावर सुद्धा JCPOA ने प्रतिबंध लावले होते.

परमाणू बॉम्ब साठी 90% शुद्ध युरेनियम ची आवश्यकता असते आणि JCPOA नुसार इराण ला केवळ 300किलो ग्राम युरेनियम ठेवण्याची आवश्यकता होती आणि एवढे युरेनियम बाकी कामासाठी पुरे आहे.

त्यानंतर IAEA च्या म्हणण्यानुसार 2025 पर्यंत इराण जवळ 275किलो ग्राम युरेनियम होते. ज्याला इराण ने 60%पर्यंत शुद्ध केले होते. आणि इराण ने या युरेनियम ला आणखी जास्त शुद्ध केले असते तर इराण ने नक्कीच परमाणू बॉम्ब विकाशित केला असता. काही अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार इराण त्या युरेनियम ला केवळ एका आठवड्यात परमाणू बॉम्ब बनवण्याच्या प्रमाणात बदलू शकतो आणि काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्या नुसार इराण एक ते दीड वर्ष्यात परमाणू बॉम्ब बनवू शकतो.

अमेरिका इराण परामानु समाझोत्या मधून बाहेर का पडला?

संयुक्त राष्ट्र, अमेरिका आणि युरोप संघाने वर्ष 2010 मध्ये इराण वर आर्थिक प्रतिबंध लावले होते. कारण त्यांना संशय होता कि इराण परमाणू बॉम्ब बनवत आहे.

या आर्थिक प्रतिबंधमुळे इराण ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेल विकता येणार नव्हते आणि 100अरब डॉलर पेक्ष्या जास्त इराण ची विदेशी मुद्रा फ्रिज केली.

त्यामुळे इराणची अर्थव्यवस्था दाबघाईला आली आणि इराणी चलन खूप प्रमाणात कोसळले.यामुळे देशात प्रमाणापेक्षा जास्त महागाई वाढली.

वर्ष 2015 मध्ये इराण आणि जगातील प्रमुख सहा देश ज्यामध्ये अमेरिका, चिन, फ्रान्स, रुस, जर्मनी, ब्रिटन हे देश JCPOA वरती सहमत होते. या मध्ये इराण परमाणू कार्यक्रमा संबंधी जे काही करण्याची अनुमती या वरील देशानी दिली होती त्या सोबत काही अटी सुद्धा होत्या. ज्यामध्ये इराण परमाणू ठिकाणाची चौकशी होईल. आणि त्या बदल्यात इराण वरती जी आर्थिक पाबंदी लावली होती त्याला हटवण्याची सुद्धा अनुमती दिली होती.

JCPOA 15 वर्ष्या करता होता. त्यानंतर इराण वरती लावलेले आर्थिक प्रतिबंध संपणार होते.

त्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती पदावर डोनाल्ड ट्रम्प आले आणि 2018 साली त्यांनी JCPOA कायद्यापासून अमेरिकेला दूर केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार हा सौदा एकदम बेकार होता.

डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय आल्यानंतर इस्राईल ने या निर्णयचे स्वागत केले होते कारण सुरवातीपासून इस्राईल या विरोधात होता.

इस्राईल च्या म्हणण्यानुसार इराण हा गुप्त पणे परमाणू बॉम्ब बनवत आहे. आणि इराण ला जे अरबो डॉलर्स दिले आहेत ते पैसे इराण आपली सैने ताकत वाढवण्यासाठी वापरत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली होती कि इराण सोबत वार्ता करण्यासाठी अमेरिका तयार आहे. डोनाल्ड ट्रम्प नेहमी म्हणतं आले कि JCPOA पेक्ष्या चांगला सौदा करणार पण इराण ने या साठी नकार दिला होता.

अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा म्हणाले होते की इराण ने जर नवीन समझोता नाही केला तर इराणवर अमेरिका हल्ला करेल.

त्यानंतर इराणचे विदेश मंत्री “अब्बास आराघची ” यांनी सांगितले कि ते बातचीत करण्यासाठी तयार आहेत. पण अमेरिकेने कोणतीही सैने कारवाई करू नये आणि या साठी ते सहमत झाले पाहिजे.

इसराईल प्रधान मंत्री नेत्यांनाहू यांनी म्हटले आहे या मध्ये स्वीकार करण्यासारखे काहीच नाही फक्त एकच सौदा होईल तो म्हणजे इराण ने आपला परमाणू बॉम्ब बनवण्याचा कार्यक्रम बंद करावा.

नेत्यांनाहू हे सुद्धा म्हणाले होते कि जर इराण या साठी तयार नसेल तर आम्ही अमेरिकेच्या देखरेखी मध्ये इराण चे परमाणू ठिकाणे उडवून देऊ आणि जेवढे इराण कडे परमाणू उपकरण आहेत त्यांना सुद्धा नष्ट करू.

इराण ला सर्वात मोठी भीती ही आहे कि अमेरिका इराण वरती त्यांना जे वाटेल तो समझोता करेल आणि जागतिक राजकारणात अमेरिकेची कुटणिती जीत झाली हे सांगतील.

इकडे इसराईल चे म्हणणे आहे जर इराण कडे परमाणू बॉम्ब आला तर तो इसराईल च्या अस्तित्वासाठी खतरा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *